माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे.
आम्ही दूध पितो.
मांजरही दूध पिते.
पण मांजराच्या ते अंगी लागते.
आम्ही मरेस्तोवर जगतो,
मांजरही मरेस्तोवर जगते पण
मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते.
आम्हाला देव माहित आहे.
मांजराला ते ही कळत नाही...
पण त्याचा आत्मा भटकत
राहिल्याचे कोणी ऐकले नाही.
पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणी
माणूस असेलही
पण त्यानेही कधी तरी निवांतपणे
म्यँव म्हणायला हरकत नाही.
खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत. म्हणूनच येणारा सप्ताहांत आणि नवे वर्ष निवांतपणे घालवा...
आम्ही दूध पितो.
मांजरही दूध पिते.
पण मांजराच्या ते अंगी लागते.
आम्ही मरेस्तोवर जगतो,
मांजरही मरेस्तोवर जगते पण
मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते.
आम्हाला देव माहित आहे.
मांजराला ते ही कळत नाही...
पण त्याचा आत्मा भटकत
राहिल्याचे कोणी ऐकले नाही.
पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणी
माणूस असेलही
पण त्यानेही कधी तरी निवांतपणे
म्यँव म्हणायला हरकत नाही.
खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत. म्हणूनच येणारा सप्ताहांत आणि नवे वर्ष निवांतपणे घालवा...
वाचने
6067
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी टू
मस्त आहे..
खरच सुंदर मराठी शुभेच्छापत्र !!!!!
मनीमाउ ची पोझ
In reply to खरच सुंदर मराठी शुभेच्छापत्र !!!!! by मदनबाण
आहाहा... उद्
In reply to मनीमाउ ची पोझ by ध्रुव
मला वाटलच...
In reply to आहाहा... उद् by धमाल मुलगा
आईच्चा घो रे !!!!!
In reply to मला वाटलच... by ध्रुव
मस्तच!
म्यँव
व्वा... मस्तच.....
१००% सहमत
मांजरी आणि कुत्री