मनात माझ्या विचार आले,
अफाट वेगामधे पळाले,
कुठून आले, कुठे निघाले,
कळे न काही...
मनात माझ्या उरे न जागा,
लगाम नाही विचारवेगा,
हजार घोडे लहान पागा,
कळे न काही...
मनात माझ्या अनेक वाटा,
दिशादिशांना अनेक लाटा,
जिथे बघावे नवीन फाटा,
कळे न काही...
मनात माझ्या विचार आले,
सुसाट वेगे नभी उडाले,
विहार केला, उडून गेले,
कळे न काही...
वाचने
1794
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
मस्त. कविता आवडली. भारतिय संस्कृती मधे सगळ्यात जास्त वेगवान असे सांगायचे असते तेव्हा 'मनोवेग' असे विशेषण वापरतात.
बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद!
In reply to मस्त. by बिपिन कार्यकर्ते
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, बिपिन.
अजिंक्य.
बिका
In reply to मस्त. by बिपिन कार्यकर्ते
बिकांशी पूर्ण सहमत. रेसींग थॉट्स ही मानसोपचारशास्त्रामधील टर्म आहे.
कविता खूप छान आहे. विशेषतः "लहान पागा" हा सन्दर्भ फार चपखल. मनाला घोड्याची उपमा दिली जाते आणि विवेकरूपी लगाम त्याला लावावा असं सुचवल जातं.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
छान कविता
छान कविता आहे अजिंक्य! येऊ दे आणि!!!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
मस्त
मस्त कविता..!
आवडली.
- प्राजक्ता
https://www.praaju.com/
मस्त!
मनात माझ्या उरे न जागा,
लगाम नाही विचारवेगा,
हजार घोडे लहान पागा,
कळे न काही...
खूपच छान.
क्रान्ति
अग्निसखा
मनःपूर्वक आभार!
शुचि, मेघवेडा, प्राजुताई, क्रान्तिताई -
मनःपूर्वक आभार!
(शुचि आणि मेघवेडा यांचं वय माहित नसल्याने, ताई किंवा दादा असं म्हटलेलं नाही - राग मानू नये!)
अजिंक्य.