१. कर्णपिशाच्चं:
लेखकः बाळा फोंडके.
लेखन प्रकारः डिटेक्टिव्ह रहस्य कथा.
बाळूने साफ निराशा केली. कथा अतिशय टुच्च्या आहेत. दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत.
पुस्तकाच्या कव्हर वर काळ्या बॅकग्राउंड वर एका कवटीच चित्र आहे. त्याच प्रयोजन आजूनही समजलेल नाही. मला
पुस्तक हातात घेतल्यावर लय भारी वाटल होत. पण मी चू*त निघालो. २५० रुपयांना चूना !!!
२. आवरण:
लेखक: एस. एल. भैरप्पा. (कन्नड- अनुवादित)
प्रकारः कादंबरी-वैचारीक, ऐतिहासीक .
विस्मरणाने सत्य झाकोळलं जातं. त्याला आवरण म्हणातात. या थीम वर भैरप्पांनी सुंदर कादंबरी रचली आहे.
रझिया-पूर्वीची लक्ष्मी. आमिरशी लग्न करते. अधुनिक विचारांचा तिच्यावर पगडा असतो. त्यामुळे हिंदू काय किंवा
मुसलमान काय- काही फरक पडत नाही, तसेच हिंदू धर्मातील भोंगळपणाचा, जातीव्यवस्थेचा, कर्मठपणाचा तिरस्कार
म्हणून लग्नावेळी मुसलमान होते.
दोघांचा व्यवसाय: माहीतीपट, आर्ट मूव्हीज बनवणे.
तिला सतत प्रश्न पडत असतो की हंपी मधील देवळे भग्न का झाली? कोणी केली ? त्यावर एखादी डॉक्यूमेंटरी बनवता येइल का?
"शैव-वैष्णव युध्दामधे एकमेकांनी ती पाडली", "मुसलमानांना बदनाम करण्यासाठी त्याचे खापर मुसलमानांवर फोडले
जाते" अशा विचारांच्या "आवरणा" खाली वावरणा-या इंटलेक्चुअल ग्रूप मधे ती देखील असते.
नक्की सत्य काय आहे? कोणी पाडली ती देवळं ? मूर्ती कोणी फोडल्या ??
पुढे सांगत नाही. तुम्ही कादंबरीच वाचा. बरीच सरप्राईजेस मिळतील.
साहित्यीक द्रुष्ट्या देखील कादंबरी सशक्त आहे. लक्ष्मी च्या कथेमध्येच - वेगळ्या काखंडातल्या आणखी ३ वेगळ्या कथा गुंफून भैरप्पांनी
बाजी मारली आहे !! अशा पध्दतीने लिहिलेली कादंबरी मी तरी पहिल्यांदाच वाचली. त्यामूळे मजा आली.
वाचने
2538
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक
भेंड्या भाडखाव .. विकत घे की ...
In reply to ठीक by चिरोटा
चांगली
असेच म्हणतो
In reply to चांगली by बिपिन कार्यकर्ते
अ-रहस्यमय
आवरण
आवरण
आवरणची ओळख