ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;)
कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे...
हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे?
'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे..
रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे?
तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे
मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे?
लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा
असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी.. अशाने गुटुर्गू करावे कुठे?
तुटे पाठ माझी सुजे तोंड भलते व्रणाच्या मिषाने उरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... दिसावी कुणी, पाघळावे कुठे !
घराच्या तिच्या चोरट्या पायवाटा बुजू लागल्या रोज रात्रीमधे..
अशा काळरात्री पहार्यात 'वासू', तुझ्या डाळिने त्या शिजावे कुठे?
मला आकळेना हिला प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे मिळाले कुठे?
(गुन्हे जे कधीचेच केले तयाचे हिने शोधले हे पुरावे कुठे?)
नवा माल असली दिसे आजच्याला अनिर्बंध आनंद 'रंग्यास' दे
उडावे कवीने? उडावे कशाला? उडावे किती अन् उडावे कुठे...
-चतुरंग
काव्यरस
वाचने
5302
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!!
+१
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
जरा
In reply to +१ by श्रावण मोडक
छान
अहाहा..मजा
भावजी....
रंगाभावजी,
In reply to भावजी.... by बिपिन कार्यकर्ते
श्री.
In reply to रंगाभावजी, by टारझन
हॅहॅहॅ ...
श्री.
In reply to हॅहॅहॅ ... by टारझन
एक्दम रम्पाट !!
आई
हेच म्हणतो
In reply to आई by प्राजु
रंगाशेठ,
रंग्या सुटला रे
अरे, काय
गृहमंत्री...
In reply to अरे, काय by रेवती
अवघड आहे!
चलो इस बात
In reply to अवघड आहे! by ज्ञानेश...
हा हा हा
फर्स्ट क्लास!
अरे बापरे