आमी येतो मिसळपाववर
आन, चाळा म्हणून
क्लिक करतो,
लेख,कविता, आन पाककृतीवर.
आवडलेल्या वळींवर फिरत
राहतो कितीतरी येळ,
आलटून-पालटून
शांतपणे.
आन बांधाबांध करतो
मनातल्या प्रतिसादाची.
असह्य कोंडमारा होऊन
टाकता आला नाय प्रतिसाद तर,
लॉगऑफ करुन,
पाहत बसतो मॉनिटर
कितीतरीवेळ अस्वस्थपणे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1564
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरं वा!
कोंडमारा
प्र - प्रयत्नाचा