Skip to main content

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

लेखक पावसाची परी यांनी गुरुवार, 17/07/2008 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक अबोल प्रेम फुललेच नाही !! दोघांच्याही मनात होतं, दोघांनाही ते ठाऊक होतं कुनी कधी काही बोललेच नाही….. एक अबोल प्रेम फुललेच नाही !! जाण्या-येण्याच्या वेळाही एक, ठरुनच गेल्या होत्या बहुतेक वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! नजर भिरभिरते,एकमेंका शोधते; दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते नजरेपलिकडे काही घडलेच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! नसेना का घडले मिलन परि… आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही! -अज्ञात
लेखनविषय:

वाचने 6242
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडली कविता. नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही! -अज्ञात हे, मिपाच्या नियमात बघा जरा. सखाराम गटणे

.सुंदर कविता

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते; दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते नजरेपलिकडे काही घडलेच नाही एक अबोल प्रेम फुललेच नाही !! सुंदर आहे... कविता कळत नसल्याने त्या क्वचितच भावतात .... तुझी कविता आवडली... कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

ही कविता क्दाचित माझ्यावर तर बनवलि नहि ना.........

अरे वा .... ही कविता वाचनातच आली नाही कधी. तू अज्ञात नावाने लिहितेस हे यंदाचे दिवाळी अंक वाचल्यावर कळाले. अशीच लिहीत रहा.

काय इजुभाउ.. आज आपल्या परीने लॉगिन केलेत ? =)) बाकी आमची मिसळपाव वरची पहिली सही आठवल्याने अंमळ सुखावलो ! - टारझन तु भारी ... तर मी लै भारी

सगळ नुसत मनातल्या मनात. परिराणी आठवणींच्या पावसात चिंब भिजवलस. धन्यवाद *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अतिशय तरल आहे. आवड्ली कविता.

कविता आवडली...धागा वर आणणार्‍याचा मी आभारी हाय... ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia