एक उत्त्म लेखमालिका वाचायला मिळते आहे याचा आनंद आहेच पण तिला पूर्णविराम मिळणार याचे दुखःसुद्धा झाले.
वेगळ्या शैलीने गोलंदाजी करणार्यांबद्धल तुम्ही काही लिहावे अशी खरं तर विनंती करायची होती...
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक... :)
(मलिंगाला नमस्कार करणारा... ;) )
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia Malinga 4 wickets in 4 balls (almost 5!)
http://www.youtube.com/watch?v=r3CZB2zNo9g
>>'ओव्हर द विकेट' ने मिळणारा अँगल वापरून फलंदाजाला मोहात पाडणारा.... आणि दगाबाज प्रेयसीप्रमाणे त्याच्या धारदार 'इनकटर' ने त्याचा खून करणारा वसीमभाई.
स्सही रे...!
-दिलीप बिरुटे
वसीम अक्रमबद्दल आपण लिहिता....कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक काढणारा तो एकमेव "ऑलराऊंडर"..
पण अष्टपैलू खेळाडुंचा अनभिषिक्त बादशहा अशा सोबर्सच्या नाबाद ३६५ धावा कशा विसरू शकता राव?
विनू मांकडनेही २३१ धावा काढलेल्या आहेत.
बॉथम २०८
प्रमोदजी, मला "मी पाहिलेल्या" ऑलराऊंडर्सपैकी म्हणायचं होतं. सोबर्स, मंकड तर नाहीच पण बोथमदेखील मला फक्त १९९२च्या वर्ल्डकपचा आठवतो. बोथम, कपिल, इम्रान, गावसकर इत्यादींचा खेळ फारसा बघायला नाही मिळाला हो! ह्या मालिकेतही ज्यांची बहुतेक कारकीर्द मला व्यवस्थित आठवते त्यांच्याच बद्दल लिहीले आहे. ऐकीव अथवा वाचलेल्या माहितीच्या आधारे लिहीण्यापेक्षा मला आठवणार्या खेळाडूंबद्दल लिहीणं मला सोपं वाटतं.
अर्थात तपशीलातली चूक दाखवून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
प्रमोदजी, मला "मी पाहिलेल्या" ऑलराऊंडर्सपैकी म्हणायचं होतं
मॉर्गनसाहेब, असं असेल तर मग मी माझे शब्द मागे घेतो. :)
आधीचा प्रतिसाद देताना "तुमची लेखनशैली बहारदार आहे"....हे मात्र सांगायचं राहिलं होतं. आवडतंय लेखन,तेव्हा थांबू नका.
ह्यापुढेही असेच लिहिते राहा.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
प्रदीर्घ काळानंतर इथे एक अत्यंत वाचनीय लेखमालिका दिल्याबद्दल, जेपी, तुमचे आभार मानतो.
सर्वच खेळाडूंचे वर्णन आवडले. =D>
अगदी लिली-थाँप्सन, मार्शल-होल्डिंग, वसीम-वकार, वॉर्न-मॅक्ग्रा ह्यांच्याबरोबर नाव घ्यावं इतका...
"बॉलर्स हंट इन पेअर्स" हे खरे आहे, मात्र वॉर्न-मॅक्ग्रा ही त्या अर्थाने 'पेअर' खचितच नव्हती.. :)
वकारभाई बाकी जंटलमन होता ह्यात वाद नाही. आपल्याला आवडतो तो त्याचा यॉर्कर. हातातून सुटलेला चेंडू स्विंग होत होत फलंदाजाला लाईनचा अंदाज येऊच देत नाही आणि त्याच वेळी वेगाने बॅटच्या तळाचा वेध घेत तो लेंग्थचा अंदाजही चुकवत जातो. "आयला, हा यॉर्कर आहे!" ही ट्यूब पेटेपर्यंत यष्ट्या उध्वस्त झालेल्या असतात. मी नेमकं काय म्हणतोय ते इथे कळेल. बिच्चारा स्लेटर!
जाँटीचा तर मी भक्तच आहे. हा माणूस मैदानावर मांडी घालून जरी बसला ना तरी त्याच्या जवळून बॉल मारायची हिंमत होणे अवघड आहे! एखाद्या प्रचंड मोठ्या चुंबकाचं जसं अदृश्य चुंबकीय क्षेत्र असतं ना तसं ह्याच्या फील्डिंगचं अदृश्य क्षेत्र असतं. त्याच्या आसपास कुठेही चेंडू आला की ओढला गेलाच.
और भी आने दो यार! बहुत तारे बाकी है!
चतुरंग
जाँटी आणि वसीमभाईचा मी पण भक्त आहे. मस्त लेख ! धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
आता तो जेसीबी ब्रेक मारून, उलटा फिरून, परत अॅक्सिलरेटर मारून, पिकप घेऊन पोहोचेपर्यंत
हे वाचतान जाम हसलो. =))
ह्यावरुन आठवले.श्रीलंकेच्या कुठल्याश्या मॅचमध्ये अर्जुन रण्तुंगाही असाच रनआऊट झाला होता.(क्रिझच्या मध्यातुन त्याला समोरच्या फलंदाजाने परत जायला सांगितले होते.)त्यावेळे सिध्दुने कॉमेंट्रे केली
"It was as difficult for Rantunga as turning a heavy duty truck!"
मस्त लेख आणि सुंदर लेखमाला.
कृपया पूर्णविराम न घेता वाटल्या लंबी छुट्टी घेऊन लेख लिहिणे चालुच ठेवावे.
- कानडाऊ योगेशु
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
क्रिकेट हा मुळात आपल्यासाठी खेळ आहेच कुठे? ती तर गायन, वादन, काव्याइतकीच महत्प्रयासानी साध्य होणारी आणि तितकाच आनंद देणारी कला आहे. "अहाहा" "क्या बात है" अशी दाद मैफिलीत आणि क्रिकेटच्या मैदानावरच मिळू शकते !
प्रश्नच नाही !!!
बहुतेक इंग्लिश खेळाडू जसे आपआपल्या "ऑल टाईम ११" मध्ये सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर म्हणून जॉन एंबुरीचं नाव घालतात तसंच क्रिकेटच्या जन्मदात्यांची अगदीच आबाळ होऊ नये म्हणून ह्याचं नाव घातलंय. अर्थात फ्लिंटॉफ ह्या यादीत बसतच नाही असं मुळीच नाही हा.
एका वाक्यात इतक्या विकेट काढल्यात... अहाहा
लै ब्येस्ट..
लिखाणाची शैली भन्नाट राव~!!
या सर्व क्रिक-कलेच्या दिग्गजांसोबत मी आपल्या सुंदर लिखाणाचाही पंखा बनू लागलोय!!
बाकी 'जेसीबी'चं आणि 'इंग्लिश' क्रिकेटचं वर्णन लई झ्याक!!!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
प्रतिक्रिया
एक उत्त्म
नेहमीप्रम
मधुमेह
वाचतोय...मस्त लेख.
सोबर्सच्या नाबाद ३६५ विसरलात राव.
तपशीलातली चूक
मग माझे शब्द मागे घेतो.
सुरेख.
सुंदर
मस्तच!
जाँटी आणि
गुड
आता तो
मस्त
लिहिते रहा...
सही लिहलय
लान्स क्लुस्नरचं नाव पण हवं होत.......
नेहेमीप्रमाणे झ्याक !!
बहुतेक
आज कळलं की हा भाग प्रकाशित झाला आहे!
मस्त लेख