सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत!
हे निकष कुठे, कसे तपासता येतील ? म्हणजे कंपन्या शॉर्टलिस्ट करण्याकरता नेमके निकष काय असावेत (फंडामेन्टल्स) हे जरा विषद करून सांगा ना तात्या ! थोडक्यात या वर उल्लेखलेल्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केलात तर शेअरबाजारात लुडबुडणा-या समस्त मिसळपावकरांना मौलिक मार्गदर्शन होईल.
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
श्रेया,
http://www.religareonline.com/ या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक कंपनीची वरील सर्व आणि इतरही अनेक माहिती पहावयास मिळेल... खास करुन प्रत्येक वर्षाचा नफा येथे दिलेला आहे त्यामुळे निर्णय घेणे सोपे आहे.....
(शेअर्स खरेदी विक्री प्रेमी)सागर
बरोबर आहे तात्या तुमचे विश्लेषण
पण.....
साला हा पण फार वाईट आहे हो...
मे महिन्यापर्यंत अजुन दोलायमानच राहील.
कदाचित अमेरिकेत बैंकाचे राष्ट्रीयीकरण करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल
पण २००५ च्या घरांच्या किंमती आज २०-४० टक्के उतरल्याने सगळा घोळ झालेला आहे तो अनेकांना कफल्लक करुनच शांत होईल
साला भारतात पण स्थावर बाजार असाच गडगडेल काय असे वाटत आहे...
तसे झाले तर हे राम
(किंमती कमी झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पहाणारा) नाना
तुम्हाला खरंच वाटते की अमेरिकेत बॅकांचे राष्ट्रियीकरण होईल?
तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्हाला काही अधिक माहिती आहे जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही. कृपया अधिक स्पष्टीकरण कराल काय?
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.
>>तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या.......कारण आत्ता नेमक्या बर्याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून ....आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून रहा! ...
जरा ह्या मोकळ्या गाड्यांचे नंबर द्या की..[निशुल्क] अगदी १२ च्या १२ नको ४ ते ५ सांगा. :-)
आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)**
**हे वाक्य उपहासाने लिहिले आहे! :)
जन्म, मृत्यू आणि शेअरबाजार या तीन गोष्टींची निश्चितता कुणीही सांगू शकत नाही! :)
>>आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल!
हे वाचल्यामुळे २५०००-३०००० शक्य आहे असे तुम्ही म्हणताहात असा (गैर) समज झाला होता.
तात्या,
एकदम मस्त लेख लिहिलेला आहे. शेअरबाजारात कोठेही गुंतवणूक करुन मोठ्या कमाईचे स्वप्न पाहणार्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम तुमच्या लेखाने केले आहे यात शंका नाही....
लवकरच तुमचे फेवरेट समभाग आम्हाला सांगा, म्हणजे तुमच्याबरोबर आम्हालाही वाहत्या गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल
(लोभी? असे समजू नका...)सागर
प्रतिक्रिया