श्री राजे-जी,
आपण या क्षेत्राची ओळख करुन दिल्याबद्दल आपले आभार!
परंतु आपण आजकाल मिपावर लिहीलेल्या प्रतिसादांची इतर संस्थळांवर खिल्ली उडवित असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल आपला जाहीर निषेध!
मी या निषेधार्थ मिपा प्रशासनास एक विनंतीवजा तक्रारपत्र लिहीण्याच्या विचाराधीन आहे!
योग्य वेळेस ते पत्र मिपावरदेखील जाहीर केले जाईल!
*****
ब्रिटिश टिंग्या, सध्या धायरी, पुणे येथे मुक्काम
धन्यवाद शिप्रा -जी.
अजून काही फोटो तयार करत आहे तयार झाले की येथे चिटकवेनच नक्की.
असो,
प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
सुंदर फोटो. खांबावर कोरलेली नावे बघुन वाईट वाटले. ठाणे-पुणे-सातारा-कोल्हापुर भागात बौद्ध संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार फिरत्या व्यापारी व भिख्खुंनी केला होता त्यामुळे अशी लेणी बरीच आहेत असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.
श्री पुनेरी -जी,
ह्या संदर्भात आपण कालच बोललो होतो व्यनीतून.
असो,
आता ह्या शनीवारी जवळपास कुठे भटकता येते का पाहतो.
प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
या शनिवार साठी पुणे मुळशी, माले, पिंप्रीची दरी, सिक्रेट लेक, तेलबैला पायथा, कोराईगड, लोणावळा, पुणे असा बेत मी सुचवू शकतो.
(बाकी वरती अजून एक प्रतिसाद लिहिला आहेच).
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
श्री झरेकर -जी,
तुम्ही चांगला मार्ग सुचवलात.
आताच मॅप शोधतो व प्रवासवर्णान पुस्तकांचा गठ्ठा अजून घरी पडलाच आहे तो देखील बाहेर काढतो एखादे पुस्तक वाचून जावे म्हणतो तेवढाच आधार.
असो,
तुम्ही आपुलकीने दिलेल्या नावांबद्दल आभार.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
राजे -जी
छान दर्शन घडवलेत बौद्धलेण्यांचे. मागे लेण्याद्रीला गेलो होतो त्याची याद ताजा केलीत. पुढेही तुम्ही असेच महाराष्ट्रातील चांगल्या ठिकाणांचे वर्णन आणि चित्रांचे दर्शन घडवाल अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या पुढील भटकतींस शुभेच्छा.
श्री दिपक -जी,
तुमचा प्रतिसाद वाचून अजून हुरुप वाढला आहे माझा.
मी लवकरच एखादा गड अथवा डोंगर चढाई करेन व त्याचे फोटो येथे चिटकवेन.
असो,
प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
श्री कुंदन -जी,
अहोभाग्य माझे तुम्ही आपला अमुल्य वेळ खर्ची घालून माझ्या लेखावर प्रतिसाद लिहलात हे पाहून अमंळ हळवा झालो.
असो,
प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
एका दुर्लक्षित स्मारकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद राजे!
बाकी पहिला मार्गदर्शक फलक टारझनने तयार केला असावा, असे वाटायला जागा आहे. ("बुद्धकालीण" लेणी)
आणि स्मारकापेक्षा, "हे स्मारक संरक्षित आहे" असे सांगणारा फलकच जास्त सुरक्षित दिसत आहे...
>>("बुद्धकालीण" लेणी)
आमचे परममित्र श्री टारझन-जी हे इतके छुपे रुस्तम-ए-हिंद निघतील असे वाटले नव्हते!
त्यांनी तयार केलेला मार्गदर्शन फलक पाहुन डोळे अंमळ पाणावले!
श्री टारझन-जी यांचे जाहीर आभार!
धन्यवाद!
- फलकवडी
ह्या लेण्यांच्या बद्दल माहीती देणारा कुठला ही फलक येथे नसल्यामुळे व कुठलाच मानवप्राणी मी सोडून आसपास नसल्यामुळे काहीच माहीती गोळा करता आली नाही
पुरातत्व खात्याचा बोर्डच संरक्षित दिसतो. खर तर लेण्यांची माहिती अशाच बोर्डावर असायला हवी होती. अशा उपेक्षित ठिकाणी अचानक जाण्याचा योग उत्साही असतो.
बाकी जखीणवाडी अस्ती तशी हडळवाडी बी आसन कुटतरी!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रत्येक प्रतिसादाला आपण दिलेला उस्फुर्त प्रतिसाद वाचुन मन अगदी भरुन आले. एव्हढी वाचकाची काळजी आजकाल कोण घेत नाही.आपला लेख सतत चर्चेत राहावा म्हणुन केलेला हा हट्टाहास आहे किंवा काळेकाकाची कॉपी करता असे जर कोणी म्हनत असेल तर त्या कडे कानाडोळा करावा.
भावी लेखनाला शुभेच्छा.
वेताळ
श्री वेताळ -जी,
तुम्हाला माझी कळकळ पोहचली हे पाहून आनंद झाला.
आम्हा लेखकांना कोणी आजकाल समजावूनच घेत नाही त्या काळात तुमच्यासारखा प्रतिसाद म्हणजे वळवाचा पाऊसच.
असो,
प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
श्री रा रा राजेजीसाहेब,
आपण स्वतःच्या दुचाकीवर स्वखर्चाने प्रवास करुन एवढा खटाटोप केलात. आपल्या एकूणच कष्टाबद्दल आम्ही आपले आभार मानतो.
भारतीय संस्कृतीतील मैलाचा दगड (मैला : योग्य अर्थ घ्यावा) ठरलेल्या अश्या पुरातन वास्तुंना भेट देऊन त्यांची सामान्य जनांना ओळख करुन द्यावी, ही तुमची कळकळ सरकार दरबारी पोचली असेलच. नसेल तर मारा फाट्यावर...
पुरातव्त खाते हे शेवटी एक खातेच असल्याने त्यांची नाराजी मनावर घेऊ नये.
शुध्दलेखन..भाषा..सर्वस्वी बाझवताना आपण आपल्या भावना (!) कमीत कमी शब्दात मांडुन आम्हाला कृतार्थ केले आहे, तसेच त्या प्रेमवीराचे नाव तुम्ही पुसुन टाकले असते, तर आम्हास आपला अधीक अभिमान वाटला असता, पण असो.
छायाचित्रण आवडले हे वेगळे सांगणे न लागे.
पुढच्या वाटचालीस शुभेच्छा..
तुम्ही मलेशियात नसुन महाराष्ट्रात आहात याचे भान ठेवुन दुचाकी चालवावी. ईथे माणसे फार स्वस्त आहेत.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
२-३ दिवसच झालेत मिपा'वर येऊन. मी कदाचित नवीन असेन इथे. किंवा हीच इथली रीत असेल. पण इथे काही सुंदर आणि उपयोगी माहिती दिली आहे, काहीतरी अनुभव शेअर केला आहे. फोटोचाही प्रयत्न स्तुत्य आहे. पण ती माहिती आत्मसात करणे आणि माहिती स्त्रोताचे आभार मानणे किंवा काही constructive feedback देणे यापेक्षा इतर गोष्टींवरच चर्चा अधिक झालेली/केलेली आढळते. थोडेफार गमतीदार प्रतिसाद समजू शकतो आपण. पण इथे काही सन्माननीय अपवाद वगळता बरेचसे प्रतिसाद लेखकाची (या लेखाच्या किंवा अन्य कुठल्याही) टर उडवणे या हेतूने टाकलेले दिसतात. त्याबद्दल काही सदस्यांना मी बोललोही होतो. दोन दिवसापासून कुठे लिहावे असा प्रश्न होता, पण ही पोस्ट अधिक 'हिट' आहे म्हणूनच इथे लिहिण्याचे प्रयोजन.
वाचकांची भूमिका राजहंसाची असावे असे माझे प्रामाणिक मत आहे. नीर-क्षीर विवेक जागृत ठेवून हवे ते घ्यावे, नको ते सोडून द्यावे. देणारानेही माहिती पुरवत राहावी, म्हणजे ज्या अपेक्षा घेऊन आम्ही या संकेतस्थळावर प्रवेश घेतला आहे त्या पूर्ण होतील याची खात्री वाटते. (ज्याअर्थी अगदी शुद्धलेखनापर्यंत वाचन झाले आहे त्याअर्थी) माहिती देणे आणि मिळवणे हे दोन्ही उद्देश इथे सफल झालेले आहेत. त्यामुळे या चर्चेबद्दल अजिबात खिन्नता न बाळगता पुढील पोस्ट देत राहणे. आम्ही (किमानपक्षी मी तरी) वाट पाहत आहोत.
आपलाच,
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
ता.क.: बिनकामाच्या किंवा अवांतर प्रतिसादांना (या प्रतिसादालासुद्धा) कचऱ्याचा डबा दाखवावा.
प्रतिक्रिया
आभार - निषेध!
१५३
राज जी
धन्यवाद
छान सफर घडवुन आणली
श्री
या शनिवार
श्री झरेकर
वाह
श्री दिपक
सुंदर वर्णन..
श्री कुंदन
एका
+१
फोटो आवडले.
माहिती
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख.
फोटो व वर्णन दोन्ही सुरेख.
फोटो व वर्णन आवडले.
श्री वेताळ
वा वा
आभार आणि (थोडा खेदही).
भटकंती,
सुन्दर फोटो.
दुनिया
Pagination