बाय दं वे, कधी असतो बरं आपला वार्षिक दंतदिन ?
तसा दंतदिन किंवा दाढ दिवस हा दर सहा महिन्यांनी असतो त्याला आपण दंतस्वच्छताही म्हणतो. तरी वर्षातून एखाद्यावेळेस आमचे दंतवैद्य जी काही किरकोळ दंतदुरुस्ती करतात ती अनेक वर्षे आठवते.
गेल्या शनिवारी दंतस्वच्छता कार्यक्रमाच्यावेळेस एकदा क्ष-किरण भेटीसाठी जानेवारीतील भेटसमय ठरवून आले आहे.
रेवती
शिर्षक वाचुन एक मिनिट, काकांच्या 'वाढ'त्या गोच्यांचा बंदोबस्त करण्याकरता काकुंनी 'दाढे'ला हात घातला की काय असे वाटले! ;)
पदार्पण (हो ना?) मस्त झालंय. घरची स्पर्धा दर्जेदार खेळाडु निर्माण करते या न्यायाने एक-से-बढकर-एक विडंबनं वाचायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. :)
काव्यात....असा एक विसुभाऊ बापटांचा कार्यक्रम आहे.
त्याच चालीवर रंगाशेठ आणि कुटुंबियांचा कार्यक्रम करायला हरकत नाही आता......
कुटुंब रंगलंय...विडंबनात. :D
पदार्पणालाच शतक! रेवतीताई,मस्त जमलंय विडंबन!
येऊ द्या असेच....भरभरून!
माननीय रेवतीजी,
आपले पदार्पणातील विडंबन वाचले. अतिशय छान केले आहे. मिपावर अनेक छुपे गुणी कलावंत आहेत याची आम्हास शंका होती, आज खात्री पटली. ज्याप्रमाणे श्री गणपा विविध पाककृती टाकुन लोकांची वाहवा मिळवत होते पण घोसाळे की दोडके या सामान्य प्रश्नामधे त्यांची उडालेली दांडी आमच्या एका गृहितकास (गृहितक - श्री गणपा आपल्या सौभाग्यवतींच्या कामाचे श्रेय घेत आहेत) पुष्टी देणारी ठरली. त्याचप्रमाणे आपले विडंबन वाचुन आम्हास श्री चतुरंग यांच्या पुर्वीच्या विडंबनांविषयी खात्री वाटत नाही. आमची शंका अशी आहे की ती विडंबने आपणच केलेली असुन श्री चतुरंग यांनी केवळ टाळ्या मिळवल्या आहेत. तरी आपण या गोष्टीचा खुलासा करावा ही विनंती.
धन्यवाद.
--अवलिया
माननीय नाना,
आपल्या प्रतिसादाने प्रथम मूक (सभ्य भाषेत: गपगार) झाल्यामुळे खुलासा करण्यास उशीर झाला आहे. आपण मोठ्या मनाने क्षमा करालच (नाही केलीत तर दुसरे विडंबन टाकीन). सांगावयाचा मुख्य मुद्दा असा की आपण अतिषय हुषार आहात. 'त' वरून जसा ताकभात ओळखता तसेच 'वि' वरून विडंबन कोणाचे असू शकेल? ही प्रतिभा कोणाची? हेही ओळखता. आमच्यासारख्या अबलांचा आधार बनून मिपावर आल्याबद्दल मी देवाचे (आकाशातल्या) आभार मानते. आजकाल आपले प्रतिसाद वाचून आम्हास गलबलून येते हे सांगणे न लगे.
रेवती
म्याडम, एकदम झबर्डस्ट!!! मला तर शीर्षक वाचून क्षणभर रंगोपंताची काळजी वाटली. पण असो. आणि ढवळ्या शेजारी पवळ्या बांधलाय तर त्याचे रिझल्ट्स असे उत्तम आले आहेत.... बेष्ट!!!
बिपिन कार्यकर्ते
मी साधारणपणे कवितांच्या वाटेस जात नाहीं, पण या वेळी गेलो आणि खूप छान कविता वाचायला मिळल्या. "ढदिवस" या चार शब्दांत कांहीं तरी जादू असावी.
मुख्य म्हणजे चतुरंग-जी व रेवतीताईंच्या कवितेत "वृत्त"शिस्त, ज्यामुळे कवितेला एक तर्हेचे 'सौष्ठव' मिळते, ती काटेकोरपणे पाळली गेली आहे. मुक्तछंदातल्या कविता 'पोट सुटलेल्या' व्यक्तीसारख्या वाटतात.
मस्त!
------------------------
सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम
एक से एक !!
बाय दं वे,
शिर्षक
हा हा
एकापेक्षा
कुटुंब रंगलंय....
माननीय
+१
माननीय
माननीय
कधी
यावे...
अरे वा
स्वगत
हाहा
काटा
रेवती,
लै भारी
खणखणीत!!!!!
मस्तंच! -अन
हाहाहा सह्
एकदम ब्येष्ट...
मस्त
ह्म्म
वा वा वा
मस्तये. आधी
धन्यवाद
वाह वाह !! (मुद्दामून धागा वर
सुडकेश्वर.... मस्त उकल काढलीत
अजमावुनी बदामा जोरात
हाहा: हाहौ हाहा:!!!!!!!
अच्छा हे पण आहे काय =))
जौ द्या ना राव! तुम्हीपण.....
:-D .. :-D .. :-D
रम्य
रेवाक्का!!येतेस का परत
=))))))
दात नाही, दाढ, दाढ !
=))
तुमसे दुष्मनी मोल लेना मेरेकू
काय चावट झालेत सगळेजण! ;)
:D
ए चावू नका रे. :-)
दंतवैद्य ह्या प्रकाराबद्दल
आवडले.
अरेच्चा! हे पहायचं राहूनच गेलेलं होतं!
अच्छा, म्हणजे तुम्हीही सामील
स्वारी जी!