बापरे!!
मला अश्या प्रकारच्या गोष्टींची फार भिती वाटते!
घरी नातेवाईक जमल्यावर रात्री जेवणखाण झाल्यावर सगळेजण असल्याच गप्पा मारतात. खरंतर त्या ऐकाव्याश्या वाटतात पण त्याचवेळेस भितीही वाटते.
आजी, काकू, मामी अश्या गप्पा बिनधास्तपणे मारायच्या. " काय सांगू वहिनी, मला अक्का अगदी इथे पायरीवर बसलेल्या दिसल्या." मला दिवसाही तिथे जायची भिती वाटायची. माझी आजोळची आजी गेल्यावर तर माझ्या आईला ती तीन रात्री तिच्या उश्याशी बसलेली दिसायची. हे आईनं सांगितल्यावर मी भितीनं पांढरी पडले होते.
रेवती
अरे बा प रे ! ! ! एकदम ख त र ना क....
आता मला हल्लीच आलेला अनुभव सांगतो...
ऑफिस मधुन नाईट शिफ्ट करुन निघालो,गाडी सुसाट वेगाने धावत होती,मी आणि ड्रायव्हर अधुन मधुन गप्पा मारत होतो (तसं नाही केल तर बर्याच वेळा ड्रायव्हर गाडी चालवता चालवता झोपतो,हा अनुभव गाठीशी आहे.)गाडी ऐरोली-मुलुंड यांच्या मधे असलेल्या पुलावर धावत होती... मुलुंडच्या दिशेला असलेला टोल नाका आता दिसायला लागला होता...मी आणि ड्रायव्हर असे दोघेच जण होतो...गाडी दुसर्या लेन मधे अंदाजे ८०-८५ किमी/तास च्या वेगाने होती,तेव्हढ्यात अचानक मला एक पांढरी साडी घातलेली अगदी पांढरी फटक म्हातारी बाई त्या रस्त्याच्या पहिल्या लेन मधे रस्त्यावर आडवी बसलेली दिसली...नशीब आम्ही त्या लेन मधे नव्हतो नाहीतर उडवली गेली असती असेच वाटले.क्षणभर मला असे वाटले की मला भास झाला असावा,आणि उगाचच काही तरी दिसल्या सारखे झाले असेल म्हणुन मी ड्रायव्हरला विचारले की तुला ती बाई दिसली का ? तो म्हणला हो तर !!!
गाडी टोलनाक्यावर आल्यावर मी तिकडच्या पेंगत असलेल्या सुरक्षा रक्षकाला ओरडुन हाक मारली आणि सर्व काही सांगितले तर त्यांची त्या बाजुला जायची हिंम्मतच झाली नाही...सांगितलेल ऐकुन त्याची तंतरली (फाटली). मी विचार केला...ती म्हातारी तिथे का बसली असावी? जिवाला कंटाळली असेल म्हणुन आत्महत्या करण्यासाठीच अशा पद्धतीने रस्त्यात बसली असेल का ? किंवा जे पाहिले होते ते भूत होते का ?.... :SS
(अनेक अपघातातुन बचावलेला)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
मराठे आणि मदणबाणाचा किस्सा तर रोमांचकारीच !!
आमच्या शेजारी एक सार्थक नावाचा छोटासा मुलगा राहातो. त्याची छोटीशी सायकल आहे. ती घेतली की तो ही असाच ओरडतो. इतकेच नव्हे माझा लॅपटॉप पण तो त्याचा आहे असे म्हणतो.
ह्याची आठवण झाली !
मराठे साहेब अजुन किस्से येऊन द्यात !!
बाकी बाजेचे लाकूड वापरून पैसे खर्च करून नविन सामान बनवून दाखवलेल्या धाडसाचे कौतुक (आश्चर्य) आहे.
मी तिसरी - चौथी मधे असे पर्यन्त मला हा त्रास होता.
रात्री गाढ झोप लागल्यावर, कहितरी स्वप्न पडत. ही सगळी स्वप्ने एक ठराविक प्रकार्ची होती. स्वप्नात मी काही तरी काम करत असे आणि नंतर नंतर त्या कामात मी इतका अडकुन जात की मग तिथुन बाहेर पडणं शक्यच नसायचं. मग पुढच्या परीणामाची चिंता करत करत इतका घाबरुन जात की मग खुप घाम येत व जागा होत. जागा झाल्यावर पण इतका जोरात रडत असे की माझं मला पण कळत नसे. मग आईच्या कुशीत झोपत असतं. सकाळी उठल्यावर मला कळत असे की रात्री काहितरी झाले आहे, पण नक्की काय झाले ते मात्र कळत असत. खरी गम्मत तर पुढेच आहे. जेव्हां जेव्हां मी रात्री उठुन जोरात रडलो, तेव्हां तेव्हां घरात कोणाला ना कोणाला देवाज्ञा झाली.....
पण नंतर आइने काही तरी देवाचं नियमित पणे केलं, अन माझा हा त्रास बंद झाला.....
जुन्या वाड्यात वरच्या बाजूला पाचखणी म्हणून भाग होता. तिथे दुपारच्या शांत वेळी सुद्धा जायला मला भीती वाटत असे कारण तिथे कधी मूळपुरुष दिसतो असे माझ्याहून वर्षाने मोठा असलेला मामेभाऊ म्हणाला होता! एके दुपारी आम्ही सगळी आत्ते, मामे, मावस भावंडं वर पुस्तकं वाचत बसलो होतो. वाचता वाचता माझा डोळा लागला, थोड्या वेळाने जाग आली पाहतो तर कोणीच नाही सगळे खाली निघून गेले होते. वरच्या माळ्यावरुन कोणीतरी चालल्यासारखा आवाज आला, छताच्या लाकडांच्या फटींमधून माती पडली! जाम घाबरलो. दोन उड्यात पाचखणी ओलांडली तिसर्या उडीत संपूर्ण दहा पायर्यांचा जिना धाडकन उतरला आणि थेट चौकात उडी!!
धावत धावत स्वयंपाकघरात गेलो जिथे सगळे कलत्या दुपारची चहा-दुधं प्यायला बसलेले. त्यांना बघून जिवात जीव आला.
(ऊर धपापणारा)चतुरंग
प्रतिक्रिया
बापरे!!मला
अरे बा प रे
मराठे आणि
माझा बै
कंदील्या
स्वानुभव
....
ज्यांचा
भय ईथले संपत नाही.
माझ्या आजोळी
अरे वा!
मस्त