चांदण्याने ओंजळ भरली
चंद्र नयनी सामावला
मत्सराने धुमसणारा, तो...
सुर्य सखे मी पाहीला
पसरले पंख मयुराने
उन्मुक्त सुखे तो नाचला
थांबला नभी खगराज
पाहता नर्तन कोमेजला
विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी
भागवतींचा हर्ष गर्जला
कमरेवरती हात ठेवूनी
विठू सावळा हिरमुसला
तुझे आहे ते तुझ्याचपाशी
हेवा मना हवा कशाला?
तुझ्यासारखा तुच राजा
मत्सर का मनी आला ?
विशाल.
०२/१२/२००९
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2419
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
छान.
सहमत
In reply to छान. by ज्ञानेश...
आवडली
सुरेख, अर्थपूर्ण कविता ..
सही...रे सही...!
In reply to सुरेख, अर्थपूर्ण कविता .. by मनीषा
सगळ्यांचे आभार !
In reply to सुरेख, अर्थपूर्ण कविता .. by मनीषा
मस्त ..
कविता
पसरले पंख