Skip to main content

मत्सर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/12/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्याने ओंजळ भरली चंद्र नयनी सामावला मत्सराने धुमसणारा, तो... सुर्य सखे मी पाहीला पसरले पंख मयुराने उन्मुक्त सुखे तो नाचला थांबला नभी खगराज पाहता नर्तन कोमेजला विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी भागवतींचा हर्ष गर्जला कमरेवरती हात ठेवूनी विठू सावळा हिरमुसला तुझे आहे ते तुझ्याचपाशी हेवा मना हवा कशाला? तुझ्यासारखा तुच राजा मत्सर का मनी आला ? विशाल. ०२/१२/२००९
लेखनविषय:

वाचने 2419
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

सूंदर कविता... छान झालीये..!

कविता आवडली. आणि त्यातला मेसेजही. विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी भागवतींचा हर्ष गर्जला कमरेवरती हात ठेवूनी विठू सावळा हिरमुसला हे समजले नाही. विठू का हिरमुसला?

In reply to by ज्ञानेश...

विठू का हिरमुसला? असो, तरीही कविता आवडलीच. -दिलीप बिरुटे

विठू का हिरमुसला? मला वाटतं, हर्षभराने नाचणार्‍या , गाणार्‍या भक्तांना पाहून-- आपल्याला मात्र २८ युगांपासून एका विटेवर नुसते उभे रहावे लागते अशा विचाराने विठू हिरमुसला .. असे असावे .

In reply to by मनीषा

हर्षभराने नाचणार्‍या , गाणार्‍या भक्तांना पाहून-- आपल्याला मात्र २८ युगांपासून एका विटेवर नुसते उभे रहावे लागते अशा विचाराने विठू हिरमुसला .. असे असावे अरे वा ! एकदम पटण्यासारखे. थँक्स.......! -दिलीप बिरुटे

In reply to by मनीषा

धन्यवाद मनीषा ! अगदी हाच अर्थ अभिप्रेत आहे मला. देवाची भक्ती करणं, त्याच्या ठायी सर्वस्व अर्पण करणं यासारखा आनंद, समाधान, त्यातली तृप्ती आणखी कशातच नाही. तो आनंद फक्त भक्तांनाच मिळतो, प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. या भावनेने देवही हिरमुसला. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मस्त ..आवडली --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

कविता आवडली. मनीषाताईंच्या स्पष्टीकरणामुळे समजायला मदत झाली. अदिती

पसरले पंख मयुराने उन्मुक्त सुखे तो नाचला थांबला नभी खगराज पाहता नर्तन कोमेजला वा!