कृष्णकमळ

चन्द्रशेखर गोखले विशेष
श्यामल सुंदरी रूप मनोहारी लोभस गोजीरी हाय हाय ! ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! अबोल अबोल उमल उमल हे कृष्णकमल फुलेलना...?
वर्गीकरण

7 टिप्पण्या 6,131 दृश्ये

Comments

ज्ञानेश... नवीन

कविता तशी ठीक वाटली. पण ते 'हाय हाय' आणि 'चुंब चुंब' वाचतांना शरदिनीतै आठवल्या! 8}

प्रशांत उदय मनोहर नवीन

सुरेख कविता. देवद्वार छंदात मस्त जमली आहे. आपला, (छंदप्रेमी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! मस्त रे...!!! -दिलीप बिरुटे

मदनबाण नवीन

सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! झकास्स्स्स... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia