संपुर्ण भारताचा (पाकव्याप्त-काश्मीर सह) नकाशा घेऊन
हा फोटो सगळ्यात जास्त आवडला. असचं झाल पाहिजे !!! माजुरड्या पाकड्यांना कायमची अद्दल घडवलीच पाहिजे.वन टाईम कंबरड मोडल यांच की वळवळ थांबेल कायमची.
आता वेळ होती श्रध्दांजली ची. (२० रु. एक मेणबत्ती घ्या, भाउ आज धंदा होणार वाटतं)
हा.अगदी बरोबर,,, आज कालचा हा ट्रेंड झाला आहे .आली श्रध्दांजली वेळ की लाव मेणबत्ती !!!,आली श्रध्दांजली वेळ की लाव मेणबत्ती !!! हा मेणबत्तीचा धंदा जोरात चालणार कारण अशा घटना घडणार नाहीत याची कुठलीच खात्री कोणही देऊ शकणार नाही आणि भारनियमन आहेच खप वाढवायला.
"वंदे मातरम आणि भारत माता कि जय" नारे देत एकीकडुन हे टोळक आलं
ए मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी हे गाणं आता इतक्या वेळेला ऐकतोय, की मनात विचार येतो... अजुन किती दिवस आणि का म्हणुन डोळ्यात पाणी आणायच ??? शहीद होण्यासाठीच इथले लोक जन्माला येतात काय? अजुन किती दिवस असचं होत राहणार?
या सगळ्या मंत्री-संत्री लोकांची सुरक्षा व्यवस्था काढुन टाकली पाहिजे...इथे जर जनताच सुरक्षित नसेल तर यांना का म्हणुन सुरक्षा पुरवायची?
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
बाणा लेका प्रत्येक वाक्याशी सहमत रे भावा
ह्या मंत्री संत्री लोकांची सगळी सुरक्षा काढुन घेतली पाहिजे
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
कल्पकतेने काढलेली छायाचित्रं. धन्यवाद. खवळलेला मारूतराय जास्त आवडला आणि पटला.
मात्र, काल काही वृत्तपत्रात वाचेलेले... लोक अगदी पिकनिक मूडमधे होते. प्रसंगाचे गांभिर्य हरवले होते. वगैरे... परवाच ही छायाचित्रं पाहताना कुठे कुठे जाणवत होते. कालाय तस्मै नमः ... बहुधा एखाद वर्षा नंतर २६ नोव्हेंबर येईल आणि जाईल... किंवा त्याचे महत्व फक्त 'संविधान दिवस' म्हणून राहिल. असो.
बिपिन कार्यकर्ते
२६/११ च्या हल्ल्यात कामी आलेल्या सर्व जवानांना, बळी पडलेल्या सर्व नागरीकांना आदरांजली परंतु हा धागा पाहताना लाजही वाटली..
नाकर्त्या शासनकर्त्यांमुळे अवघ्या दहा-पंधरा ट्रेन्ड पोरांनी मुंबै ६० तास दहशतीखाली ठेवली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही..
ते १०-१५ दहशतवादी सतत ६० तास कमांडोंशी लढू शकतील एवढा दारूगोळा मुबैत आला केव्हा याचाही आम्हाला पत्ता लागला नाही. हे काही एका दिवसात होणारे काम नाही. अगदी पद्धतशीरपणे, पूर्वनियोजित असा हा हल्ला होता आणि याला आपली अत्यंत ढिली सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे..
आम्ही मात्र आजही मेणबत्त्या पेटवण्यात धन्यता मानतो आहोत..
असो, या मेणबत्त्या केवळ शहीदांसाठी. परंतु एका अर्थी पाकिस्तानने भारतावर लादलेल्या ६० तासांच्या त्या छोटेखानी युद्धात भारताचा पराभवच झाला आहे असे खेदपूर्वक म्हणावे लागेल..
तात्या.
मेणबत्त्या पेटवणार्यांचीही लाज वाटली. असो. ते सोडून लोक अजून काही करु तरी काय शकतात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
>>>एवढा दारूगोळा मुबैत आला केव्हा याचाही आम्हाला पत्ता लागला नाही. हे काही एका दिवसात होणारे काम नाही. अगदी पद्धतशीरपणे, पूर्वनियोजित असा हा हल्ला होता आणि याला आपली अत्यंत ढिली सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे..<<<
नुसती ढिली आणि ती पण सुरक्षा यंत्रणाच? अहो जेंव्हा आपण लाच घेयची सवय लावतो आणि लाचे शिवाय काम होऊ शकत नाही म्हणत चलता है करत लाच देत कामे करवून घेतो तेंव्हा त्याच्या पुढच्या पायर्या अशाच असणार...
रेशन कार्ड हवे आहे? ड्रायव्हरचे लायसन्स? कस्टम मधून सामान बाहेर आणायचे आहे? कुठलाही दाखला? अॅडमिशन्स? इत्यादी इत्यादी... इतकेच कशाला खाजगी क्षेत्रात काय चालते? हे काय सगळे एका दिवसात होत नाही. पण त्याचे परीणाम मात्र दूरगामी होत असतात. कोण कुठून काय आणते आहे (आठवते का १२ मार्च १९९३ च्या आधी श्रीवर्धनला असेच आरडीएक्स उतरवण्यात आले होते ते?), तर कुणाला रेशन कार्डे सहज मिळतात ते... तो हॅडली काय केवळ ढिली यंत्रणा म्हणून येथे राजरोस येऊ शकतो? तो केवळ काय सरकारचाच दोष आहे? राहूल भट्ट आणि बॉलीवूड काय करत होते? इतकी त्या हॅडलीची काय गरज होती या लोकांना? आणि तो महेश भट्ट बघा आता कसा ओरडत बसला आहे ते...
अहो, ब्रिटीशांनी अथवा त्या आधी मोगलांनी जितका आपला देश लुबाडला नसेल तितका आज आपणच लुबाडत आहोत - पैशाने आणि नैसर्गिक साधन संपत्तीने आणि त्याहूनही अधिक स्वतःचे इमान विकत... सर्व काही आम्ही विकू शकतो... जेंव्हा सगळेच विकाऊ असते तेंव्हा देश म्हणून आपण टिकाऊ कसे ठरणार? असो.
मला ती पहाट आठवली.
पहाटे ४ वाजता फोन आला म्हणून टिव्ही लावला आणि ७ पर्यंत तसाच बसून होतो . विश्वास बसत नव्हता हे असं होतय यावर.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
चांगले फोटो......त्यादिवशीचे प्रसंग परत डोळ्यासमोर उभे राहिले....
यापुढे मेणबत्त्या पेटवायची वेळ येणार नाही अशी आशा करतो..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
लेख ठिक झालाय
हू किल्ड करकरेः द रिअल फेस ऑफ टेररीझम इन इंडीया ’ हे राज्याचे माजी इस्पेक्टर जनरल एस.एम. मुश्रीफ यांनि लिहलेली मुक्ताफळे ही वाचा
(उद्विग्न) चेतन
"शहीद होण्यासाठीच इथले लोक जन्माला येतात काय? अजुन किती दिवस असचं होत राहणार?"
पॅटन नांवाचा एक सिनेमा पाहिला होता. त्यात जनरल पॅटन त्याच्या सोजिरांना सांगतो "तुम्ही देशासाठी बलिदान करावं अशी माझी अजिबात इच्चा नाही. त्या ***ना त्यांच्या देशासाठी मरुदे."
चिंतामणराव
प्रतिक्रिया
गुड फोटोज
विचारांच्
संपुर्ण
+१
......... सू हा
काही
धन्यवाद!
उत्तम
हम्म!!!
फोटो सुरेख
सूचक आणि नेमके
२६/११ च्या
+१ सहमत.
+२ सहमत
+१
एका दिवसात...
...
नेमकी..
मला
श ब्द सं प ले............................
शहिदाना प्रणाम !!!!!!!!
चांगले
फारच छान...
लेख ठिक
शहीद होण्यासाठीच इथले लोक जन्माला येतात काय?
सुरेख