Skip to main content

प्रकाशाच्या उंबरठ्यावर - एक ढकलपत्र

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 12/11/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
एका ढकलपत्रातून आलेला मजकूर, अनेकांना माहिती व्हावी असं वाटलं म्हणून इथे चढवत आहे. "प्रकाशाच्या उंबरठ्यावर" या भाऊ गावंडे लिखित आणि "ग्रंथालीने" प्रकाशित पुस्तकावर आधारित १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्य "जिंकी रे जिंकी" या सिनेमाचे "झी टॉकिज" या वहिनीवर खास प्रसारण अत्यंत वाया गेलेलं मूल, खूपच खोडकर उपद्रवी असं. त्याच्या परित्यक्ता मजूर असलेल्या आईलाही नकोसं झालेलं. आपली उपजिविका तुटपुंज्या मजुरित एक हे असं मूल आणि एक मुलगी यासह पुरी करतांना नाकी नऊ आलेली आई. या मुलाने रोज कुणाची ना कुणाची खोडी काढल्याने अत्यंत त्रासून गेली. मजुरीला जाऊ की या सात वर्षाच्या मुलाकडे लक्ष देऊ अशा विवंचनेत ती सापडली होती. या मुलाला शाळेत घालून ती आपली समस्या सोडवू पहाते. तो शाळेत जातोही परंतू शाळेत शिक्षकाच्या अमानुष माराने पुन्हा कधीही शाळेत न जाण्याच्या निर्धाराने शाळा सोडते. दुस-या वर्षी बदलून आलेल्या सहृदयी शिक्षकाच्या अनेकविध क्लृप्यांनी पुन्हा मूल शाळेत जायला सुरुवात करते. शिक्षणाच्या अनेकविध पाय-या पूर्ण करून परदेशातही विशेष शिक्षण धेऊन येते. शिक्षण खात्यात अधिकारी होऊन उच्च पदावर पोहचते. ही कहाणी आहे भाऊ गावंडेंची! "प्रकाशाच्या उंबरठ्यावर" हे ग्रंथालीने ५ डिसेंबर २००३ रोजी प्रकाशित केलेल्या त्यांच्या आत्मवृत्ताची. त्याची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाल्यावर शिक्षण जगताने त्या पुस्तकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यावर चर्चा घडून आल्या. एवढेच नव्हे तर त्यावर "जिंकी रे जिंकी" ही सिनेमा पण निर्माण झाला. त्याला मुंबई आणि पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम चित्रपट म्हणून मान्यता मिळाली. हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "गोल्डन एलिफंट" पुरस्कार, कलकत्ता येथे उत्कृष्ट चित्रपट, नासिक महोत्सवात उत्कृष्ट फोटोग्राफी, इजिप्तची राजधानी कैरो येथे उत्कृष्ट चित्रपट गणल्या गेला. "झी गौरव" पुरस्कारात उत्कृष्ट कथा, सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट बालकलाकारासाठी नामांकन मिळाले आणि टिंग्या चित्रपटातील बालकलाकारासोबत "जिंकी रे जिंकी"च्या देवाशिष परांजपेला अवार्ड मिळाला. या चित्रपटाचे महत्व ओळखून "युनेस्कोने" उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट म्हणून शिक्षक प्रशिक्षणासाठी निवडला. विविध देशात त्याचे प्रसारण होणार आहे. १४ नोव्हेंबर बालदिनाचे महत्व ओळखून "झी टॉकीज" या मराठी चित्रपट वाहिनीने "जिंकी रे जिंकी" हा चित्रपट दिनांक १४ नोव्हेंबर २००९ शनिवारी संध्याकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) दाखविण्याचे निश्चित केले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3708
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

धन्यवाद्...........योग्य वेळेस माहिती पोचली.

बद्दल थँक्स. पुस्तक मिळवून वाचलं पाहिजे

"प्रकाशाच्या उंबरठ्यावर" वाचले पाहीजे. चांगली माहीती.

माहितीबद्दल धन्यवाद. अवांतर - तुम्हाला अशीही ढकलपत्रे येतात? आम्हाला येणारी बहुतेक ढकलपत्रे ही शीर्षक वाचून डिलीट करायच्या लायकीची असतात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अवांतरोत्तरः फडतूस ढकलपत्रं पाठवणार्‍यांना सणसणीत उत्तरं दिली की पुन्हा अशी ढकलपत्रं येण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. पुस्तक मी पण वाचलं नाही आहे, कार्यक्रम पहाता येणार नाही. पण पुस्तक जरूर विकत घेणार आहे. अदिती

छाण माहीती. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

हा चित्रपट नक्कीच बघावा लागेल.

पुस्तक वाचले पाहिजे. माहितीबद्दल धन्यु ग ! अवांतर :- वाचताना मध्येच 'तारें जमीनपर' ची आठवण येउन गेली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुस्तक वाचले पाहिजे. माहितीबद्दल धन्यु ग ! --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

काल खफ वर पाहिल तेव्हाच तुला सांगावस वाटल की खफ ऐवजी एखद्या धाग्यावर टाक. पण कामाच्य गडबडीत सांगायच राहुन गेलं. कारण बरेच जण खफवर जातातच अस नाही. माझी फेरी पण आठवड्यातुन एखदीच होते तिकडे. मनकी बातां : हिला टेलीपथी येते असेल काय रे गण्या :?

आज संध्याकाळच्या कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी धागा वर काढत आहे. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यावर आलेला नवीन प्रतिसाद पाहुनच आठवण झाली आता लावेनच.

सिनेमा नाही बघायला मिळणार पण पुस्तक मागवून घेइन. माहिती बद्दल धन्यवाद.