एखाद्या प्रसंगाची प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी असते. ती प्रकट करायचे मार्गही वेगवेगळे असतात.
कोणी एखादे काव्य करेल कोणी ललीत लेख लिहील कोणी सपाट गद्य लिहील कोणी त्या अनुभवाला रूपक मानून त्यातून वेगळेच काही उलगडून दाखवेल
अनुभव तोच पण अभिव्यक्ती निराळी.
काल मी दादरला फूल बाजारात गेलो होतो हा एक प्रसंग वेगवेगळे लेखक कसा मांडतील.
डॉ अनील अवचटः
दादरला पुलावरून वेस्ट ला उतरा समोर किच्च गर्दी दिसेल. फ्लायओव्हरच्याखाली कोपर्यात एका पानाच्या ठेल्याला लागून चेंगराचेंगरी होणार्या लोकल मध्ये असते तशी एकावर एक रचून ठेवलेली टोपल्यांची रास दिसते. तेथे जाऊन एका डोळे तांबरलेल्या केस विस्कटलेल्या हडकुळ्या तरुणाला विचारले.
इथे फूलबाजार कुठे आहे. तो फिस्सकन हसला. म्हणाला इथेच आहे की . चार रुपये द्या तुम्हाला दाखवतो.
त्याला चार रुपये दिले त्याने पानठेल्यावरून गायछापची एक पुडी विकत घेतली. पुडीतली तंबाखू हातात ओतली त्यावर नखभर चूना लावला. हातातला तंबाखू तर्जनी चोळला . आणि ओठ मुडपत दाढेखाले चिमूट दडपत तो पुन्हा एकदा हसला.
काय रे केंव्हा पासून खातोस?
ल्हानपणा पासून. बा च द्यायचा गोळी करून आन मंग च्या द्यायचा
आणि किती खातोस दिवसातून
ये क्या दोन तीन पाकीटे हुत्यात.
कोण देत तुला रोज हे
मिलते है ना लोग. साब दुनिया मे देनेवाले बौत है. मळक्या पँटीला चुन्याचे हात पुसत तो म्हणाला.
छातीचा पिंजरा डोळे लाल केस विसकटलेले. त्याने अंघोळही बहुतेक पाच सहा दिवसांपूर्वी केली असावी.
तू इथे नक्की काय काम करतोस.
साब काम म्हणजे जे पडेल ते करतो. टोपलीया लगाना उतारना. फूल नीट लगाके रखना. मोगरा/गुलाब वगैरे नीट अलग करके रखना.
ये फूल कहांसे आते है?
खेत से आते है. मोगरा नाशीक से आता है.
और गुलाब.
वो भी नाशीक से आता है.
हे बु़के कधी केलेस.
साब बुके इदर नै बनते.
आणि ही गुलाबाची फुल वेगळी का ठेवली आहेत.
वो अलग फूल है साब
म्हणजे
वो सस्ते मे बिकते है
का?
क्या करे साब लोग सस्ते फूल मांगते है मग द्यावे लागतात?
कुठून आणतोस.
वो क्या चर्च वाले लोग जाते है ना उनके कब्रस्तान से उठाके लाते है.
...................
हेच दृष्य सुरेश भट साहेब असे मांडतील.
काल मुक्या फुलांचा मी बाजार पाहीला
पाकळी सवे काट्यांचा शेजार मी पाहीला.
......................................
ना सी फडके....
केसात सुगंधी फुले मालून विचारांचे सौंदर्य वाढत नसते.
सौंदर्य असते ते पहाणाराच्या नजरेत. पहाण्याच्या वेळेत आणि पहाणाराच्या गरजेत.
दादर स्टेशनवरच्या पुलावरून तो खाली उतरला .समोरच फूल बाजार होता.
हारीने रचलेल्या त्या फुलांच्या टोपल्या पाहून त्याच्या मनात विचार आले.......
सौंदर्याला व्यापक पातळीवर नेले की होतो बाजार. फुलांच्या बाजारात मोगरीचे फूल मरगळते. कमळाच्या सात्वीक फुलाला सुद्धा गटडीत वळले जाते.
गुलाबाची फुले एकावरएक कलेवरासारखी पडून रहतात
त्या सगळ्याना सौंदर्य प्राप्त होते ते पहाणारा आणि ती फुले एकेकटे आल्यानन्तर.
अन्यथा तो उरतो नुसता बाजार किलो ...टन.... हारे....टोपल्या अशा घाऊक भाषात बोलला जाणारा बाजार
.......................................
शंकर पाटील....
कंदील जळावा तशी दुपार ढाणढाण जळत होती. रस्त्याला पाऊल टेकू देत नव्हते. त्याने घामेजल्या चेहेर्याने समोर पाहिले.
फूलवाला फुलावर पाणी मारत होता. उन्हाच्या रेमट्यात फुले टिकवायचा प्रयत्न करत होता.
रस्त्याच्या कोपर्यावर् कुठे पालकट मांडी घालता येते याचा त्याने अंदाज घेतला.
आणिबसून त्याने पिशवतली पुडी उलगडली. भाकर्या पार शेळमाटल्या होत्या. रत्नीने मुम्बैला जाणार म्हणून किती हौसेने भाकर्या आणि म्हाद्या करून दिला होता. त्याला रत्नी आठवली. चांदणे उगवावे तशी लख्खन हसणारी .भोळी भाबडी त्याच्यावर किती विष्वास ठेऊन तीने त्याला मुम्बैला जायला परवानगी दिली होती.
भाकरीचा घास घशाखाली उतरत नव्हता. समोरच्या हारीने एकावर एक रचलेल्या फुलांच्या टोपल्या घरची आठवण करून देत होत्या.
रत्नीचा जीव तो केवढा. या फुलासारखाच तो ही चेचला गेला होता त्या ओझ्या खाली.
......................
व.पू. काळे
दादर वेस्ट स्टेशन चा जीना उतरून गेलो की समोर फूलवाले ओळीने बसलेले दिसतात. मला अनेकदा वाटायचे की सुमित्राला इथून एखादा गजरा न्यावा.
पण काय करणार तो गजरा नेला की सगळ्या चाळीला कळणार. मग त्यावरून शेजारपाजारचे चिडवणार. काय पंत यंदा पाळणा हलवणार.असे चेष्टेचे शेरे मारणार.
स्वतःपेक्षा दुसर्यांच्या घरतली पाळणे हलवण्याची लोकाना काय हौस असते कळत नाही.
बर पहिल्या वेळेस ठीक आहे हो . पण दुसर्या तिसर्या वेळेस सुद्धा?
कधीकधी वाटते की भारत सरकार ने कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात या असल्या टोमण्याना बंदी घालावी .
मनातल्या विचाराना मी स्वतःच हसलो. त्याना काय कळणार.
अचानक समोर लक्ष्य गेले फुलांच्या टोपल्यात फुले होती. वरची वरची ताजी दिसत होती.
रचून ठेवलेल्या टोपलीत खालची फुले दबली गेलेली दिसत होती फुलांच्या ओझ्याखाली फुले दबली गेली होती .फुलांचे सुद्धा ओझे असते फुलाना.
मुले ही देवाघरची फुले असतात हे म्हणणाराना समोरचे ते सत्य दाखवून द्यायचे होते.
लहानपणी सात मुलांच्या घरात आपण ही असेच दबलो गेलो होतो.
तुम्हाला बांधता येताहेत असे काही अंदाज
अगदी मिपावरचे काही लेखक हाच प्रसंग कसे लिहितील ते लिहिलेत तरी चालेल.
वाचने
11902
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक दम सही वर्णन .......ख.......ल्ला.......स
आनील
In reply to एक दम सही वर्णन .......ख.......ल्ला.......स by jaypal
वा...
+१
In reply to वा... by श्रावण मोडक
+२
In reply to +१ by छोटा डॉन
+३
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
मजेशीर कल्पना!
In reply to +३ by धमाल मुलगा
मस्त.
ही आमची
छान्....सूंदर फुले...
छान्....सूंदर फुले...
मस्त
वा वा
साहित्यिक मिमिक्री !
विजुभाऊ
विजुभौ
हेच
In reply to विजुभौ by विनायक प्रभू
व. पु.काळे
सुंदर!
वा वा ईजुभाउ
उत्तम
बाजार २
मी लेखक
In reply to बाजार २ by विनायक प्रभू
आहारे
आता
चांगलंय
छान! अजुन
मस्त हो
मस्तच विजूभाऊ!
असेच म्हणतो
In reply to मस्तच विजूभाऊ! by चतुरंग
क्या बात है.
In reply to मस्तच विजूभाऊ! by चतुरंग
मस्त
मस्तच!
झकास !
+१
In reply to झकास ! by मुक्तसुनीत
सुरेख विजुभाऊ
एकदम सही.
इजुभाऊ
खरच
क्या बात है !
एका
ऐला भारीच!
काय सुरेख लिहिलयं!
लाख पते की बात
In reply to काय सुरेख लिहिलयं! by विटेकर
खरच
In reply to काय सुरेख लिहिलयं! by विटेकर
मस्त लिहले आहे