✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझे खाद्य-पेय जीवन-१

स
सन्जोप राव यांनी
Tue, 10/27/2009 - 07:03  ·  लेख
लेख
  • माझे खाद्य-पेय जीवन-२
  • माझे खाद्य-पेय जीवन-३
  • माझे खाद्य-पेय जीवन-४

Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-१

  • माझे खाद्य-पेय जीवन-२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22470 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

क्या बात है.

मुक्तसुनीत
Tue, 10/27/2009 - 07:29 नवीन
संजोपराव , मजा आणली राव तुम्ही. "ऐटीत बाबू , सिंगल चाय, बिस्कुट नाय म्हणून रागान जाय !" असे म्हणणार्‍या आजीपासून "अर्ल ग्रे" पाजणार्‍या स्टारबक्स् पर्यंत ... तुमची माझी धाव आहे, चहापासून चहाकडे !
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Tue, 10/27/2009 - 08:49 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+२

अवलिया
Tue, 10/27/2009 - 13:29 नवीन
असेच म्हणतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

+३

लवंगी
Wed, 10/28/2009 - 00:37 नवीन
अगदि अगदि असच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तुमची माझी

विजुभाऊ
Tue, 10/27/2009 - 09:23 नवीन
तुमची माझी धाव आहे, चहापासून चहाकडे ! मुक्तसुनीत काका हे वाक्य थोडेसे बदलायला हवे तुमची माझी धाव आहे, इनोपासून चहाकडे ! हे कसे आता बरे वाटतेय ;) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सुंदर

शेखर
Tue, 10/27/2009 - 07:53 नवीन
पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.... संजोपराव अ‍ॅट हिज बेस्ट... येऊ द्यात... शेखर
  • Log in or register to post comments

उत्तम..

प्राजु
Tue, 10/27/2009 - 07:57 नवीन
रावसाहेब, खूप दिवसांनी इतका फुलका लेख वाचायला मिळाला. चहाच्या ते ही भरपूर दूधातल्या... नावाने बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खरंच, ज्यांना सकाळचा चहा ऐता हातात मिळतो ना.. त्या लोकांचा हेवा वाटतो मला. भाग्यवान असतात अशी लोकं. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा वा!

Nile
Tue, 10/27/2009 - 07:58 नवीन
आधीच भर दिवाळीत एकही पदार्थ फराळाला नसल्याने वैतागलो होतो, त्यात तुम्ही एका मिनिटात त्या गेलेल्या सुखी जिवनाची रपेट घडवुन आणलीत.
सकाळी सहा आणि दुपारी तीन या वेळी ज्यांना न मागता कपभर गरम चहा मिळतो, तेचि पुरुष भाग्याचे.
आजीच्या हातचा रोज तीनचा चहा आठवुन काळी कॉफी पिताना किती त्रास होतो, विचारु नका! चहा आणि कॉफी बद्द्ल अगदी माझ्याच भावना! पुढच्या भागाची भुक लागली आहे, येउद्या. -उपाशी.
  • Log in or register to post comments

असच

स्वप्निल..
Wed, 10/28/2009 - 01:07 नवीन
म्हणतो .. चहा आणि कॉफी बद्द्ल अगदी माझ्याच भावना! >> आधीच भर दिवाळीत एकही पदार्थ फराळाला नसल्याने वैतागलो होतो, त्यात तुम्ही एका मिनिटात त्या गेलेल्या सुखी जिवनाची रपेट घडवुन आणलीत. माझही अगदी असच झालंय .. स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अत्यंत

घाटावरचे भट
Tue, 10/27/2009 - 08:11 नवीन
अत्यंत झकास लेख!! तसा काही आय अ‍ॅम नॉट अ चहा पर्सन बरं का, पण तुमचा लेख वाचून अगदी बघा हॅडच टु ड्रिंक गरमागरम चहा. - भटोबा
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Tue, 10/27/2009 - 09:25 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

आवडला

विष्णुसूत
Tue, 10/27/2009 - 08:16 नवीन
आवडला लेख. लिहित रहा. मजा येते आहे.
  • Log in or register to post comments

मस्त!

सुबक ठेंगणी
Tue, 10/27/2009 - 08:39 नवीन
पुढचे भाग वाचायला उत्सुक! बाकी आमचीही खाण्याविषयीचे चविच्चर्वण इथे आणि चहाविषयीचे इथे जरूर वाचा.
  • Log in or register to post comments

तुम्हाला

JAGOMOHANPYARE
Tue, 10/27/2009 - 08:53 नवीन
तुम्हाला एक चहा बक्षिस.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

तुम्हाला एक चहा बक्षिस..

चिंतामणराव
Tue, 10/27/2009 - 11:14 नवीन
असेच म्हणतो... .....आमचा हरी आहेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

रावशेठ, खाद

विसोबा खेचर
Tue, 10/27/2009 - 09:28 नवीन
रावशेठ, खाद्यपुराण, चहापुराण फर्मास आहे. येऊ द्या अजून.. आम्हीही चहाचे प्रेमी, तेही मुंबैच्या इराण्याकडच्या! बोर्नव्हिटाचेही आम्ही प्रेमी. चहानंतर मात्र चुना-सातारी तमाखू जर भेटला नाय तर काय मजा नाय! गोखल्या/आपट्यांकडची जायफळवाली कोकणस्थी आटीव कॉफीही आम्हाला प्रिय. केतकी गोखले नावाची आमची एक मैत्रिण होती. फार सुंदर कॉफी बनवायची. दिसायचीही सुरेख. नक्की कुणाला प्यावं - केतकीला की कॉफीला, हे कळत नसे! ;)
शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ,शिवसेनेतच राहू, की मनसेत जाऊ असले तळ्यात-मळ्यात खेळणारा
हे मी चुकून मिसळपाववर जाऊ की मनोगतातच राहू असं वाचलं! बाय द वे, थांबा आता मिपावरच! :) तात्या.
  • Log in or register to post comments

गाईच दुध

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/27/2009 - 09:47 नवीन
गावाकडे घरचच दुध असायच. गाई व म्हशीच दोन्ही. पण मुलांनी गाईच दुधच प्याव या अट्टाहासामुळे गाईचच दुध प्यायला लागायच. गरम केल्यावर त्याला एक प्रकारचा वास यायचा तो मला आवडायचा नाही. म्हणुन शहरातुन आणलेला कोको वा ड्रिंकिंग चॉकलेट असले की गाईच दुध पोटात जायच. कॉफी बद्दल रविवार सकाळच्या अंकात प्रा प्रदिप आपटेंचा लेख उत्तम प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

उत्कृष्ठ

नंदू
Tue, 10/27/2009 - 10:42 नवीन
एक उत्कृष्ठ हलकाफुलका लेख. मस्त. पुढच्या भगाच्या प्रतिक्षेत. नंदू
  • Log in or register to post comments

वाहवा!

विसुनाना
Tue, 10/27/2009 - 11:17 नवीन
मझा आला. संजोपराव,आपले खाद्यपेयजीवन असेच सुरू राहू दे. पुढचे लेखांक वेगवेगळ्या लेखकांच्या शैलींमध्ये यावेत. (जसे यावेळी पुलं आले आहेत - यापुढे जीए, नेमाडे, दळवी दिसावेत. तुम्हाला(च) शक्य आहे ते.) असा प्रयोग झाला तर आणखी बहार येईल. अवांतर- १. विषय जुने (कधीकधी घिसेपिटे) असले तरी त्यावर फिरणारी लेखणी कुणाच्या हातात आहे त्यावर लेखनाचे यश अवलंबून असते. २. विहिरीत सोडतात ती 'परडी' नाही का? {माझ्या स्मृतीप्रमाणे जलदेवतेची पूजाकरून एक लहानशी टोपली फुले भरून नदीत/विहिरीत सोडतात. टोपली=परडी (पारडी नव्हे.) चुभूद्याघ्या.} ३.दैदिप्यमान की देदिप्यमान?
  • Log in or register to post comments

दळवी

विसोबा खेचर
Tue, 10/27/2009 - 11:20 नवीन
दळवी दिसावेत.
हेच म्हणतो... (दळवींचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

परडी

सन्जोप राव
Tue, 10/27/2009 - 14:36 नवीन
परडी.. परडी . पारडी चुकून झाले, क्षमस्व. दैदिप्यमान की देदिप्यमान? माझ्या मते 'दै' . जाणकारांनी प्रकाश टाकावा. यापुढे जीए, नेमाडे, दळवी दिसावेत बापरे! प्रयत्न करतो म्हणणेही शक्य नाही. पुढील काही भागांत सन्जोप राव दिसावेत ही इच्छा आहे. सन्जोप राव टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

मस्त

चेतन
Tue, 10/27/2009 - 15:17 नवीन
चहा छान झालाय.. >> बापरे! प्रयत्न करतो म्हणणेही शक्य नाही. पुढील काही भागांत सन्जोप राव दिसावेत ही इच्छा आहे. जरुर.. "वर्तुळ" सारखा लेख परत आपल्या लेखणीतुन निघावा हि सदिच्छा... चेतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

देदीप्यमान

विसुनाना
Tue, 10/27/2009 - 15:36 नवीन
देदिप्यमान आणि दैदिप्यमान दोन्ही चुकीचेच. देदीप्यमान बरोबर. पहा मोल्स्वर्थ: देदीप्यमान [ dēdīpyamāna ] a S Exceedingly bright, brilliant, splendid, radiant. Usually but incorrectly written दैदिप्यमान & देदिप्यमान. असो. उत्तराबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

चहा जसा

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 10/27/2009 - 11:22 नवीन
चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही आवडले... लेख फार आवडला...
  • Log in or register to post comments

मस्त

प्रभो
Tue, 10/27/2009 - 11:41 नवीन
मस्त --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

अप्रतीम !

दिपक
Tue, 10/27/2009 - 11:50 नवीन
भारी लेख... पुढील भागास उत्सुक.
  • Log in or register to post comments

रावसाहेब्..

Dhananjay Borgaonkar
Tue, 10/27/2009 - 12:21 नवीन
रावसाहेब्..लैलैलै भारी मजा आली लेख वाचुन.. भाग २ च्या प्रति़क्षेत..
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Tue, 10/27/2009 - 12:32 नवीन
अस्सल रावसाहेबी लेख! खाद्यजीवनाबरोबरच 'भात आणि बिर्याणी'ची याद दिलवून देणारा. पंगतीतल्या पुढच्या पक्वान्नांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान छान.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/27/2009 - 12:33 नवीन
छान छान. फारच सुरस आणि चमत्कारीक आहे हो तुमची भाषा. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

रावसाहेब

भोचक
Tue, 10/27/2009 - 12:45 नवीन
रावसाहेब चविष्ठ लेख. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

वा रावसाहेब

मिसळभोक्ता
Tue, 10/27/2009 - 13:27 नवीन
शब्दकोडे सोडवताना न मागता अर्धा कप चहा बायकोने हातात आणून दिला की हातातला पेपर खाली ठेवून तिच्या कानशिलावरुन हात फिरवून कडाकडा बोटे मोडत 'कशी गं माझी बाय गुणाची!' म्हणावेसे वाटते! क्या बात है !!! आणि बिस्टॉल-विल्स-गोल्डफ्लेक नंतर क्लासिक माईल्ड्स नाही जोडलीत ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

वाचतो आहे...

श्रावण मोडक
Tue, 10/27/2009 - 14:11 नवीन
ही झलक तुमच्या लेखनाची. तिच्यावर कसे समाधान होणार? भात आठवलाच!!!
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Tue, 10/27/2009 - 14:45 नवीन
छान खुसखुशीत लेख.. आता चहा घेत घेत वाचला :) --ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त लिहील आहे...

किट्टु
Tue, 10/27/2009 - 15:30 नवीन
मस्त हलका फुलका लेख..... खुप आठवणी जाग्याकेल्यात..... 'चहा' केव्हाही बेस्ट.... इथे ओफिस मधे आपला दुधवाला 'चहा' मिळत पण नाही........ :''( आणि तो 'डिप-डिप'वाला चहा कधीच आवड्ला नाही..... :(
  • Log in or register to post comments

मला तर सवय

पर्नल नेने मराठे
Tue, 10/27/2009 - 16:31 नवीन
8| मला तर सवय झालीये ग आता डिप चि, घरी पण मिल्क पाउडर व डिपच :( ताजे दुध फक्त कॉर्नफ्लेक्स साठी वापरते. चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किट्टु

बरेच दिवसांनी

आनंदयात्री
Tue, 10/27/2009 - 16:02 नवीन
छान लिहलेय सर. बरेच दिवसांनी असे लिखाण वाचायला मिळाले जसे आठवडाभर मान मोडुन काम केल्यावर शुक्रवारी रात्री श्रमपरिहार करावा आणी शनवारी सकाळी फ्रेश करणारा कडक्क चहा मिळावा !!
  • Log in or register to post comments

अगदी!

धमाल मुलगा
Tue, 10/27/2009 - 20:49 नवीन
तसा मी काही फार चहावेडा नाही, आम्ही काऽऽपीवाले :) पण लेख मात्र भावला! अगदी पटला... बाकी, खाली रामदासकाका म्हणतात तसं, सुट्टीदिवशीचा चहा/कॉफीचा एक कप पापक्षालनाचा अगदी हुकमी-रामबाण उपाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

चहासारखाच फर्मास लेख.

दत्ता काळे
Tue, 10/27/2009 - 16:40 नवीन
लेख फार आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Tue, 10/27/2009 - 16:49 नवीन
खूप दिवसांनी तुमची मेजवानी मिळाली रावसाहेब, पुढचे भाग येऊ देत लवकर, स्वाती
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्वाती२
Tue, 10/27/2009 - 17:40 नवीन
सुरेख! पुढचा भाग ?
  • Log in or register to post comments

संजोप राव

रामदास
Tue, 10/27/2009 - 17:59 नवीन
ही सुरुवात आवडली.आता पुढे काय . रविवारचा चहात मात्र पंथभेद आहेत. रविवारचा पहीला चहा आपणच करावा.दमलेल्या बायको शक्य तितक्या मधुर आवाजात झोपेतून उठवावे. (रात्री पेल्यात बर्फ कच्चा पडला असेल तर आवाज मधुर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात).आपण बनवलेला चहा तीने साप्ताहीक भविष्य वाचत प्यावा .आपण चेहेरा निरखत रहावं.एक चहा आठवड्याभराचं पाप धुवून काढतो.
  • Log in or register to post comments

सही चुचु

पर्नल नेने मराठे
Tue, 10/27/2009 - 18:03 नवीन
सही =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वाह!!!

किट्टु
Tue, 10/27/2009 - 20:25 नवीन
=)) काय पण विचार आहेत... आवडलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

क्या बात है रामदासभौ!!

चतुरंग
Tue, 10/27/2009 - 20:35 नवीन
आमच्या सौ चा-कापी काहीही घेत नाहीत. त्यामुळे तिला चहाचा कप देऊन चेहेरा निरखत रहाणं आम्हाला शक्य नाही पण आम्ही चहा घेत तिच्याशी मनसोक्त गप्पा मारतो! ;) बाकी चहाच्या पेल्यातली वादळं चहाच्या पेल्यानंच संपवण्याचा तुमचा रोमँटिक विचार आवडला! >:D< चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

खरे आहे

सन्जोप राव
Tue, 10/27/2009 - 20:38 नवीन
रवीवारचा पहिला चहा आपलाच असतो. (डोके आपलेच दुखत असते!) बायकोने आणून द्यावा तो दुसरा - अडीचावा चहा. बायकोचे राशीभविष्य वाचून संपले असले तर आपल्या वाट्याला शब्दकोड्यांसाठी पेपर येतो. सन्जोप राव टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

रावसाहेब मस्त क ड क लेखन!

चतुरंग
Tue, 10/27/2009 - 19:39 नवीन
बर्‍याच दिवसांनी अशी मोकळी सोडलेली लेखणी छान वाटली. आम्ही तसे पक्के चहाबाज. पूर्वी शब्दकोडी सोडवताना आणि सध्या रविवारी सक्काळी सक्काळी मिपावर येताना असा आमच्या हाती गरमागरम चहाचा कप येतो त्यामुळे आम्ही भाग्यवानात जमा आहोत असे म्हणायला हरकत नाही! :) किंचित अवांतर - आम्ही काही दिवसांपूर्वी केलेले गोडघाशे लेखन तुम्हाला इथे वाचता येईल. चतुरंग
  • Log in or register to post comments

व्वा ! एकदम लज्जतदार लेख

संदीप चित्रे
Tue, 10/27/2009 - 19:43 नवीन
मजा आली संजोपराव ! काही काही वाक्यं तर खूपच आवडली. >> आदल्या दिवशीचा उरलेला सत्यनारायणाचा प्रसाद दुसर्‍या दिवशी जितका चविष्ट लागला, तितकाच कडक रोटीबरोबरचा पाकिस्तानी हाटेलात सकाळीसकाळी खाल्लेला झणझणीत लालभडक खिमाही. घासागणिक एक असे तुपाची टोपी घातलेले गरमगरम मोदक ज्या रसिकतेने हाणले, त्याच रसिकतेने कडाक्याच्या थंडीत पंजाबमधल्या ढाब्यावर कुरकुरीत भाजलेली मसालेदार कोंबडीही चापली. >> चहा जसा पाठीत जोरदार धबका मारुन शेजारच्या खुर्चीत कोसळणार्‍या दोस्तासारखा वाटला, तशी कॉफी कधीही वाटली नाही. >> चहा-कॉफी हे मानाचे गणपती सोडले तर कोको, बोर्नव्हिटा, ड्रिंकिंग चॉकलेट, हॉर्लिक्स वगैरे काही राखीव खेळाडूही होते, पण त्यांच्याशी कधी फारशी दोस्ती झाली नाही. ही वाक्यं फक्त नमुन्यादाखल देतोय... सगळा लेखच खूप आवडलाय !
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रदीप
Tue, 10/27/2009 - 19:58 नवीन
लेख. असेच अजून येऊदे.
  • Log in or register to post comments

अपेक्षाभंग

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 10/27/2009 - 20:52 नवीन
श्री राव, चहा पिण्याचे अतिशयोक्त वर्णन फारसे आवडले नाही.
  • Log in or register to post comments

मस्त

निमीत्त मात्र
Tue, 10/27/2009 - 21:27 नवीन
मस्त लेख...साक्षात यमराज बोलवायला आला तरी आधी त्याच्या रेड्यावर डब्बलशीट बसून त्याला चहा पाजेन.. अश्या परिचीत शैलीत लिहिला आहे.
घोटाघोटांनिशी आयुष्याचा अर्थ पटत जातो!
क्या बात है! अगदी रेषेवरची अक्षरेमधे देण्यासारखा लेख. आत्ताच बुकिंग करुन ठेवा पुढच्या दिवाळीत तुमचा लेख नक्की. बाकी संदीपखरेनाही चहा पिता पिताच, 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..' ह्या ओळी सुचल्या असाव्यात. फार छान लेख. आता पुढच्या भागात सिंगल माल्टचे घोट आले पाहिजेत..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा