अशी माणसे पुन्हा होणे नाही.
नगरपालिकेत नोकरीस असताना दरमहा २००रूपये घरखर्चास देऊन बाकीची सर्व रक्कम सार्वजनिक कार्यात ते खर्च करीत.
- वा क्या बात है !
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
नंतर भागवतांविषयी काही वाद झाला होता का?
>>तरी स्वच्छ नजरेने याकडे पहावे. आपला दृष्टीकोन कळवावा.
या वाक्याने तर अजुनच बुचकळ्यात पडलो.
अप्पासाहेबानी त्याकाळात नक्कीच कौतुकास्पद काम केलेले होते असे बातमी वरून दिसते. पण ४० वर्षापूर्वीची ही बातमी देउन धागा सुरू करायचे प्रयोजन कळाले नाही. थोडे सविस्तर लिहा ही विनंती.
अवांतर :मिसळभोक्ताच्या संशोधनाला आपणहून मदत करणयाच्या उद्देशाने नुसतेच "भावपूर्ण श्रधांजली" असे टंकणार्यानी धागा नीट वाचावा ही विनंती.
आंबोळी
भागवतांबद्दल वाद कुठेही नव्हता. मात्र काही लोकांनी मी सांगितलेली बातमी खोटी आणि आजच्या काळाला असंबद्ध असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता.
आजच्या काळातही अशा लोकांची आवश्यकता आहे. किमान तसा प्रयत्न व्हायला हवा. म्हणून या काही आठवणी देण्याचा प्रयत्न करीत आहे.
१९०९ साली पुण्याचा डेक्कन जिमखाना रजिस्टर्ड झाला. त्यावेळीही भागवतांचा मोठा पुढाकार होता. यावर्षी या गोष्टीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
भागवतांबद्दल बरीचशी माहिती माझ्याकडे आहे. ती मी व्यवस्थित जुळवून वेळोवेळी देइनच.
आप्पासाहेब भागवत हे माझे पणजोबा होत. मात्र ते इतके मोठे असतील याची मलाही कल्पना नव्हती. म्हणून मी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
इतर कोणाला आणखी माहिती असल्यास त्यांनी ती पुरवावी.
धन्यवाद.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
प्रतिक्रिया
अशी माणसे
+१
कळाले नाही.
वादाविषयी...