Skip to main content

(फराळ)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी बुधवार, 21/10/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
(जयंतरावाची माफी मागून... ) दमले फराळ करता, आता निजेन म्हणते स्वप्नातल्या दिवाळी, थोडे रमेन म्हणते चकली जराच चुकली, हा दोष मोहनाचा आहे जशा सरळ त्या, तैशा तळेन म्हणते साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते अंदाज लाडवाचे, चुकले पुन्हा नव्याने बेसन रवा मिळोनी, गोळे वळेन म्हणते पाळीतला उगा का बसला रुसून शंकर ? समजावण्यास त्याला, पुर्‍या चिरेन म्हणते शेवेस गाळताना, का हात कंप पावे ? रचना नव्या दमाच्या, नाना करेन म्हणते जिन्नस मी न सारे, हे चाखले अजूनी बकरा करू़न यांना, मी वापरेन म्हणते बोलावलेच आहे, शेजारच्या स़ख्यांना जे ठेवतील नावे, त्यांना छळेन म्हणते लो कॅलरीज आता मी चाखणार नाही जे जे हवेच ते ते स्वाहा करेन म्हणते माझ्याच कौशल्याचा आता निनाद आहे खातील कोण सहजी तेही बघेन म्हणते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3545
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

हा हा हा मस्त रे कौतुकास्पद.

हा फराळ आवडला! :) (हायकॅलरी)चतुरंग

नामी फराळ! आवडला! अवांतर: साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते हयाऐवजी "हसल्या जरी मला त्या तळणीतल्या करंज्या पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते" कसं वाटेल?

In reply to by सुबक ठेंगणी

सुरेख सुबक द्विपदी. करंज्याचे प्रकार जे पाहिलेत तेच लिहीलेत. कदाचित थोडा अजून वेळ स्वयंपाकघरातही घालवायला हवा.

In reply to by कौतुक शिरोडकर

एक ओळ तर तुमचीच आहे... पहिल्या ओळीबद्दल...करंज्या जेव्हा तळणीत फुटतात तेव्हा करंज्या 'हसल्या' असं म्हणतात...म्हणून लिहिलं... स्वयंपाकघरातील घडामोडींबद्दल अधिक माहितीसाठी गणपा किंवा प्रभूशी संपर्क साधा ;)

In reply to by सुबक ठेंगणी

स्वयंपाकघरातील घडामोडींबद्दल अधिक माहितीसाठी गणपा किंवा प्रभूशी संपर्क साधा हे 'प्रभो'शी संपर्क साधा असे हवे, 'प्रभू'शी संपर्क साधलात तर ते स्वयंपाकघरातल्या वेगळ्याच घडामोडींबद्दल माहिती देतील अशी दाट शक्यता! ;) चतुरंग

In reply to by श्रावण मोडक

मी पण दचकलोच... प्रभू ... =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

मस्त फराळ... ;) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

कौतुका, तुझ्या कांदापोह्या नंतर हे पण जबराच आहे बरं ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"