(जयंतरावाची माफी मागून... )
दमले फराळ करता, आता निजेन म्हणते
स्वप्नातल्या दिवाळी, थोडे रमेन म्हणते
चकली जराच चुकली, हा दोष मोहनाचा
आहे जशा सरळ त्या, तैशा तळेन म्हणते
साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ
पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते
अंदाज लाडवाचे, चुकले पुन्हा नव्याने
बेसन रवा मिळोनी, गोळे वळेन म्हणते
पाळीतला उगा का बसला रुसून शंकर ?
समजावण्यास त्याला, पुर्या चिरेन म्हणते
शेवेस गाळताना, का हात कंप पावे ?
रचना नव्या दमाच्या, नाना करेन म्हणते
जिन्नस मी न सारे, हे चाखले अजूनी
बकरा करू़न यांना, मी वापरेन म्हणते
बोलावलेच आहे, शेजारच्या स़ख्यांना
जे ठेवतील नावे, त्यांना छळेन म्हणते
लो कॅलरीज आता मी चाखणार नाही
जे जे हवेच ते ते स्वाहा करेन म्हणते
माझ्याच कौशल्याचा आता निनाद आहे
खातील कोण सहजी तेही बघेन म्हणते
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3545
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
मस्त!
:)
द्विपदी
In reply to :) by सुबक ठेंगणी
हाहाहा...
In reply to द्विपदी by कौतुक शिरोडकर
महत्त्वाची दुरुस्ती!
In reply to हाहाहा... by सुबक ठेंगणी
+१
In reply to महत्त्वाची दुरुस्ती! by चतुरंग
+ २
In reply to +१ by श्रावण मोडक
कोळंबी
In reply to महत्त्वाची दुरुस्ती! by चतुरंग
मस्त फराळ...
कौतुका,