सामंतकाकांची "केला मी तर प्रारंभ पिण्या" ही कविता वाचल्यावर 'आदम' नावाच्या शायरने लिहिलेली आणि मला आवडणारी एक गझल आठवली.....!
त्या गझलबद्दल कांही मला आवडलेले मुद्दे खाली देत आहे. 'उर्दू' भाषेचा प्रवास नुकताच करणार्यांसाठी मुद्दाम शब्दार्थही देत आहे.
ज्यांना यात जास्त रुची असेल त्यांनी मरहूम डॉ. सानी व डॉ. विनय वाईकर यांनी (हे डेंटिस्ट आहेत) संपादित केलेला (आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवनागरी लिपीत रचलेला) "आईना-ए-गझल" हा शब्दकोष जरूर वाचावा. तो नुसता शब्दकोषच नसून त्यात एकादा शब्द कसा वापरला जातो ते कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० 'शेर'ही दिलेले आहेत. या शेरांची निवडही भन्नाट आहे.
गझलकडे वळल्यास दुसरा आणि चौथा शेर फारच सुंदर आहे. मी मित्रमंडळीत जेव्हा ही गझल म्हणतो तेंव्हा या दोन कडव्यांना हमखास 'दाद' मिळते.
दुसर्या शेरात आदम म्हणतो कीं माझ्यासारखे 'पियक्कड' साकीने क्वचितच पाहिले असतील कीं जे गुत्त्यातसुद्धा (मयखाना) पीत-पीत प्रवेश करतात!
चौथा शेर तर अक्षरशः 'छप्पर' खाली आणतो! आदम म्हणतो कीं नशेत (तर्र) असल्यास मरणाचे काय भय? कारण 'कि हम कब्रमेंभी गये "पीते-पीते"'!!!
मिपाच्या सभासदांना जर रुची असेल तर माझ्याकडे असलेल्या 'स्टॉक'मधल्या गझला व वर सांगितलेल्या पुस्तकातले निवडक शेर मी वेळोवेळी देऊ शकतो. स्वरचित नसले तरी अशा तर्हेची प्रस्तावनापर 'पुस्ती' जोडेनच. तरीही जर असे लिखाण निषिद्ध असेल तर ज्यांना यात रुची आहे त्यांनी आपली नांवे कळवावीत म्हणजे त्यांना 'व्य.नि.'द्वारा पाठवेन.
तर मंडळी घ्या आस्वाद पूर्ण गझलचा!
न समझो कि हम पी गये पीते-पीते
कि थोडासा हम जी गये पीते-पीते ||धृ||
हमें सीधी राहोंने रोका बहुत था
कदम लडखडाही गये पीते-पीते......१
नहीं देखे साकीने हमसे शराबी (सा़की=दारू ओतणारी बार-बाला)
कि मयखानेमेंभी गये पीते-पीते.......२ (मयखाना=दारूचा गुत्ता)
किसीने जो पूछा कि क्यूँ पी रहे हो
तो हँसके कहा पी गये पीते-पीते.....३
नशा हो तो क्या खौफ मरनेका 'आदम', (खौफ=भय)
कि हम कब्रमेंभी गये पीते-पीते .....४ (कब्र=थडगं)
विशेष
वाचने
6928
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
गालिब
गालिबची वेबसाईट वर-वरच चाळली
In reply to गालिब by नंदू
काळे साहेब
In reply to गालिबची वेबसाईट वर-वरच चाळली by सुधीर काळे
गालिबची वेबसाईट वर-वरच चाळली
In reply to गालिब by नंदू
काळे साहेब,
इथ पब्लिकमध्ये लिहायला जास्त आवडेल
In reply to काळे साहेब, by ज्ञानेश...
व्वा...
जकार्ता येथील "धमाल ग्रूप"
धमाल ग्रूप
इथं हापिसात यू-ट्यूब उघडायला परवानगी नाहीं
In reply to धमाल ग्रूप by पारंबीचा भापू
'पिण्या'चे कौतुक
सहमत. यावर
In reply to 'पिण्या'चे कौतुक by आनंद घारे
काळे साहेब,
असे अगदी "फाट्या"वर नका ना मारू!
वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था!
मस्त
In reply to वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था! by सुधीर काळे
हीच ती लिंक
तुम्ही म्हटलेली गझल
</em> वाह
In reply to तुम्ही म्हटलेली गझल by पारंबीचा भापू
क्या बात है!
In reply to </em> वाह by सहज
जे लोक माझं गाणं "पहातात" ते सर्व माझ्या उत्साहाचीच तारीफ करतात
In reply to क्या बात है! by सुबक ठेंगणी
काळे
लुटा लुत्फ गज़ल व अशयारांचा!
In reply to काळे by आवशीचो घोव्
कालच
>> एकदा मिपाकट्टा करुन
>> एकदा मिपाकट्टा करुन
म्स्त