Skip to main content

"नशेत (तर्र) असल्यास मरणाचे काय भय"

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 18/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
सामंतकाकांची "केला मी तर प्रारंभ पिण्या" ही कविता वाचल्यावर 'आदम' नावाच्या शायरने लिहिलेली आणि मला आवडणारी एक गझल आठवली.....! त्या गझलबद्दल कांही मला आवडलेले मुद्दे खाली देत आहे. 'उर्दू' भाषेचा प्रवास नुकताच करणार्‍यांसाठी मुद्दाम शब्दार्थही देत आहे. ज्यांना यात जास्त रुची असेल त्यांनी मरहूम डॉ. सानी व डॉ. विनय वाईकर यांनी (हे डेंटिस्ट आहेत) संपादित केलेला (आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवनागरी लिपीत रचलेला) "आईना-ए-गझल" हा शब्दकोष जरूर वाचावा. तो नुसता शब्दकोषच नसून त्यात एकादा शब्द कसा वापरला जातो ते कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० 'शेर'ही दिलेले आहेत. या शेरांची निवडही भन्नाट आहे. गझलकडे वळल्यास दुसरा आणि चौथा शेर फारच सुंदर आहे. मी मित्रमंडळीत जेव्हा ही गझल म्हणतो तेंव्हा या दोन कडव्यांना हमखास 'दाद' मिळते. दुसर्‍या शेरात आदम म्हणतो कीं माझ्यासारखे 'पियक्कड' साकीने क्वचितच पाहिले असतील कीं जे गुत्त्यातसुद्धा (मयखाना) पीत-पीत प्रवेश करतात! चौथा शेर तर अक्षरशः 'छप्पर' खाली आणतो! आदम म्हणतो कीं नशेत (तर्र) असल्यास मरणाचे काय भय? कारण 'कि हम कब्रमेंभी गये "पीते-पीते"'!!! मिपाच्या सभासदांना जर रुची असेल तर माझ्याकडे असलेल्या 'स्टॉक'मधल्या गझला व वर सांगितलेल्या पुस्तकातले निवडक शेर मी वेळोवेळी देऊ शकतो. स्वरचित नसले तरी अशा तर्‍हेची प्रस्तावनापर 'पुस्ती' जोडेनच. तरीही जर असे लिखाण निषिद्ध असेल तर ज्यांना यात रुची आहे त्यांनी आपली नांवे कळवावीत म्हणजे त्यांना 'व्य.नि.'द्वारा पाठवेन. तर मंडळी घ्या आस्वाद पूर्ण गझलचा! न समझो कि हम पी गये पीते-पीते कि थोडासा हम जी गये पीते-पीते ||धृ|| हमें सीधी राहोंने रोका बहुत था कदम लडखडाही गये पीते-पीते......१ नहीं देखे साकीने हमसे शराबी (सा़की=दारू ओतणारी बार-बाला) कि मयखानेमेंभी गये पीते-पीते.......२ (मयखाना=दारूचा गुत्ता) किसीने जो पूछा कि क्यूँ पी रहे हो तो हँसके कहा पी गये पीते-पीते.....३ नशा हो तो क्या खौफ मरनेका 'आदम', (खौफ=भय) कि हम कब्रमेंभी गये पीते-पीते .....४ (कब्र=थडगं)

वाचने 6928
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by नंदू

नंदू-जी, धन्यवाद! गालिबची वेबसाईट वर-वरच चाळली कारण सध्या (२४ ता. पर्यंत) जरा आमच्या 'पासाडेनिया' काँडोमिनियमच्या (जिथे आम्ही रहातो) दिवाळीनिमित्त्य योजलेल्या "रंगारंग" कार्यक्रमातील गाणे-बजावण्याच्या उपक्रमात बर्‍याच लोकांना साथ करायचे कंकण बांधून घेतलेले असल्यामुळे खूप व्यस्त आहे. तो कार्यक्रम संपल्यावर आपली वेबसाईटही नीट वाचेन व देवसाहेबांनी पाठविलेली त्यांची गाणीही शांतपणे ऐकेन. पण वर-वर वाचली तरी खूप आवडली! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

आपण वयाने आणि अधिकाराने मोठे आहात. म्हणून नंदू म्हणा. नंदू-जी विचित्र वाटतं. बाकी तुम्हाला दुवा आवडला हे ऐकून बरं वाटलं. नंदू

In reply to by नंदू

नंदू-जी, धन्यवाद! गालिबची वेबसाईट वर-वरच चाळली कारण सध्या (२४ ता. पर्यंत) जरा आमच्या 'पासाडेनिया' काँडोमिनियमच्या (जिथे आम्ही रहातो) दिवाळीनिमित्त्य योजलेल्या "रंगारंग" कार्यक्रमातील गाणे-बजावण्याच्या उपक्रमात बर्‍याच लोकांना साथ करायचे कंकण बांधून घेतलेले असल्यामुळे खूप व्यस्त आहे. तो कार्यक्रम संपल्यावर आपली वेबसाईटही नीट वाचेन व देवसाहेबांनी पाठविलेली त्यांची गाणीही शांतपणे ऐकेन. पण वर-वर वाचली तरी खूप आवडली! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

तुमचा संग्रह वाचायला/ऐकायला आवडेल. खरड, व्यनि, ईमेल.. कसे पाठवता; सांगा. "Great Power Comes With Great Responsibilities"

In reply to by ज्ञानेश...

इथं आता लिहिला तसा पब्लिकमध्ये लिहायला जास्त आवडेल. पण जास्त लोकांना रुची नसेल तर व्यनि. सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

व्वा... मिपाच्या सभासदांना जर रुची असेल तर माझ्याकडे असलेल्या 'स्टॉक'मधल्या गझला व वर सांगितलेल्या पुस्तकातले निवडक शेर मी वेळोवेळी देऊ शकतो. हरकत इल्ले... ;) बाकी...नहीं देखे साकीने हमसे शराबी (सा़की=दारू ओतणारी बार-बाला) या ओळींनी आमच्या टाळक्यात लगेच हे गाणं आलं... http://www.youtube.com/watch?v=ENqjJ9ZRpeo (गझल प्रेमी) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो | Eurofighter Typhoon : Ready for India http://www.indiandefencereview.com/2009/02/eurofighter-typhoon-ready-fo…

जकार्ता येथील "धमाल ग्रूप" या आमच्या मित्रमंडळींच्या एका बैठकीत मी ही गझल (भसाड्या आवाजात) म्हटली होती. हिंमत असेल तर ऐका. पण पंकज उधासने Live performance मध्ये म्हटलेली मिळाली तर जरूर ऐका! तिथेच आम्ही (धमाल ग्रूपने) सादर केलेली कांहीं इतर गाणीही आहेत. माझ्या पत्नीने एका धमाल-सभासदाबरोबर म्हटलेले Duet पण आहे (अभी न जाओ छोडकर) ज्यात मी की-बोर्डवर साथ केली आहे. सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

जकार्ताच्या धमाल ग्रूपची यू-ट्यूबवरील चित्र-ध्वनीफीत पहायला/ऐकायला आवडेल. लिंक द्यावी. भापू

In reply to by पारंबीचा भापू

रातच्या पारी घरला जाऊन देतो. इथं हापिसात यू-ट्यूब उघडायला परवानगी नाहीं. पण www.youtube.com वर जा आणि Jakarta Dhamaal Group वर search मारा कीं (बहुदा) दिसेल आमची चित्रफीत! ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

१. उर्दू शायरीत 'पिण्या'चे इतके कौतुक वाचले की पिऊन पाहिल्याशिवाय राहवले नाही. नाहीतर मराठीतली 'धुंद येथ मी' वगैरे गीते ऐकायला सुरेख असली तरी सगळी नशा घालवतात. २. मला वाटते की मिसळपाव वर काय चालेल, काय नाही याचा उल्लेख पुन्हा पुन्हा न करता तुला जे रुचेल ते टाकून मोकळा हो. संपादकांना नाही आवडले तर फार तर ते त्याला कात्री लावतील. उर्दू गझले तुझी स्वत:ची नसली तरी त्याचे रसग्रहण तर तुझेच आहे ना? ते वाचायला माझ्यासारख्या अनेकांना आवडेल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

नक्की किती लोकांच्या प्रतिक्रिया हव्या आहेत तुम्हाला.. आपला संग्रह खुला करण्यासाठी? :? "Great Power Comes With Great Responsibilities"

ज्ञानेश्वरा, असे अगदी "फाट्या"वर नका ना मारू आम्हास्नी! जरा उसंत तरी घेऊ द्या हो साहेब! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

अब इत्र भी मलो पर मुहब्बतमें वो बू नहीं वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था! इत्र म्हणजे अत्तर, बू म्हणजे वास, हवा हुए म्हणजे संपले प्रेमभंग झालेला शायर म्हणतो की: (प्रेम संपुष्टात आल्यावर) अत्तर जरी चोपडले तरी (प्रेमात) आता तो सुगंध नाहीं राहिला. (प्रेमात असताना) एकमेकांच्या घामाचा वासही गुलाबाचा वास वाटायचा ते दिवस निघून गेले आता! आणखी एक शेर "मेरी उमरके नौजवानोंके लिये" पीरींसे खम नहीं मेरी कमर हुझूर मैं झुकके ढूंढता हूं जवानी किधर गयी! पीरी म्हणजे वार्धक्य, खम होना म्हणजे वाकणे माझ्या वयाचा जवाँमर्द शायर म्हणतो कीं वार्धक्याने मी कमरेत वाकलो असं नका समजू, मी तर वाकून-वाकून शोधतोय की माझं तारुण्य कुठं गेलें? आशा आहे की हे दोन्ही शेर आपणा सर्वांना आवडले असतील! ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

क्या बात है! या वाक्यातला भावसुध्दा मराठीत आणणे कठीण आहे. हे वाक्यच मराठी आहे असे समजण्याइतके ते सर्वांना माहीत आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

हीच ती लिंकः http://www.youtube.com/watch?v=QJDNRvhmkBE ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सुधीरभाऊ, तुम्ही म्हटलेली गझल ऐकली. तुमचा आवाज तुम्ही म्हणता तितका भसाडा वाटला नाहीं हं. पण तुमचा गाणे म्हणतानाचा उत्साह अप्रतिम! तसेच तुमचे की-बोर्डवरील कौशल्यही एंजॉयेबल आहे. मजा आली. तुमच्या सौ.ही छान गातात! तुमचा धमाल ग्रूप नावाला जागला बरं का! भापू

In reply to by पारंबीचा भापू

क्या बात है! एकदा मिपाकट्टा करुन काळेकाका व देवकाका आमनेसामने कव्वाली /सवालजवाब सामना घेतला पाहीजे.

In reply to by सहज

काका तुमच्या उत्साहाला सलाम!:) काकूंचा आवाज पण सही आहे...लाईव्ह ऐकायला आवडेल!

In reply to by सुबक ठेंगणी

सुबकताई, जे लोक माझं गाणं (रेकणं?) आणि माझ्या पत्नीचं गाणं एकाच वेळी ऐकतात ते सारे तिच्या आवाजाची व माझ्या (फक्त) उत्साहाचीच तारीफ करतात. पण मी माझ्या आनंदासाठी गातो व माझे (सच्चे) मित्र तो अत्याचार प्रेमळपणे सहनही करतात! पण माझ्या पत्नीचा आवाज आहेच चांगला व ती गातेही मनापासून व परिश्रमपूर्वक. धन्यवाद. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

काळे साहेब, फारच छान. गझल बरोबरीने त्यातील उर्दू शब्दांचा अर्थ पण दिल्याने फारच मजा आली. अजून वाचायला आवडेल. नुकतचं गुलजार यांनी लिहिलेलं इश्किया चित्रपटातील राहत फतेह अली खान यांनी गायलेलं "दिल तो बच्चा है जी" हे गाणं ऐकलं होतं. त्यातल्या "पिरी से टकरा रहे हैं" याचा अर्थ आत्ताच कळला. नवीन गझला येउ द्या. :)

In reply to by आवशीचो घोव्

मी सुरू केलेला पण अनेकांनी भर घालून फुलविलेला "लुटा लुत्फ गज़ल व अशयारांचा" हा धागा शोधा व एंजॉय करा! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368… (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?compl… (India Today)

कालच "आइना-ए-गझल" पुस्तक विकत घेतल. छान आहे. :)

>> एकदा मिपाकट्टा करुन काळेकाका व देवकाका आमनेसामने कव्वाली /सवालजवाब सामना घेतला पाहीजे. व्वा व

>> एकदा मिपाकट्टा करुन काळेकाका व देवकाका आमनेसामने कव्वाली /सवालजवाब सामना घेतला पाहीजे. व्वा व

वाट पाहात आहे आणखी गझला कधि येत आहेत त्याची, आणी आपण बिनघास्त लीहा हो लोक काय म्हणतील ती काळजी करु नका पिल्ज