Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Mon, 04/28/2008 - 14:42
  • Log in or register to post comments
  • 30289 views

Book traversal links for मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग)

  • ‹ मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...!
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by मनस्वी on Mon, 04/28/2008 - 14:57

Permalink

कोर्टाच्या आवारात साधी कैद

पोलिसांनी मला स्कूटरला किक मारताचक्षणी पकडलं होतं ते एका अर्थी बरंच झालं म्हणायच! ईश्वरीसूत्र खरंच खूप वेगळी असतात, गहन असतात! प्रसंग घडतो त्याक्षणी ती आपल्याला समजत नाहीत. मागाहून उलगडा होतो!
खरंय तात्या. तुम्ही सहिसलामत सुटल्याबद्दल आनंद वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 04/28/2008 - 15:08

Permalink

शेवट फार छान रंगवलाय

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! शेवट फार छान रंगवलाय तात्या, एकदम फर्मास तात्याश्टाईल लेख, आवडला हे वे सा न लगे !
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 04/28/2008 - 15:31

In reply to शेवट फार छान रंगवलाय by आनंदयात्री

Permalink

असेच

म्हणतो. शिवाय तात्याराव-माधव मनोहर-पहिला चित्तपावन हेही बेष्ट :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 04/28/2008 - 15:18

Permalink

हुश्श्शः.......

तात्या सुटलात ..... अगदी सूर्यग्रहण सुटल्यासारखे वाटले... अजिबात पाल्हाळीह होऊ न देता एकूण घटनाचक्र मस्तपैकी शब्दबद्ध केले आहे. अभिनंदन. मस्कत मध्ये पोलीसस्टेशनवरच एक मशीन असते. त्या मशीनच्या पाईपात तोंडाने हवा भरायची म्हणजे मशीन रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण दर्शवते. काही प्रमाणात अल्कोहोल चालतो. ठराविक लेव्हलच्या वर असेल तर रात्रभर लॉकअप मध्ये बसवून सकाळी दंड वसूल करून सोडून देतात. कांही अपघात केला असेल तर बाकी चांगलेच अडकता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 05/02/2008 - 17:03

In reply to हुश्श्शः....... by प्रभाकर पेठकर

Permalink

पेठकाकांशी

सहमत आहे. सुटलात आणि वाचलात. लेख मात्र जाम आवडला.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Mon, 04/28/2008 - 15:19

Permalink

वा क्या बात है!!!!

वा तात्या, क्या बात है!!!! अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन या भागाची आतुरतेने वाट पहात होतो. शेवटपर्यंत कैदेची उत्कंठा ताणण्यात तू यशस्वी झाला आहेस. सर्व व्यक्तिमत्वे मस्त रंगली आहेत. अत्यंत सुंदर लेखनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 04/28/2008 - 15:28

Permalink

कलम १८५

कलम १८५ अंतर्गत 'दंड आणि/ किंवा सहा महिन्यापर्यंत साधी कैद' अशी शिक्षेची तरतूद आहे. दंडाऐवजी जर समजा 'सात दिवस साधी कैद!' अशी शिक्षा जजसाहेबांनी सुनावली तर?
आर्रं तिच्या....हे ठाऊक नव्हतं बॉ आपल्याला...आता जपून रहावं लागेल. जाऊद्या तात्या, २२०० रुपये अक्कलखाती जमा, काय?
"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?"
एकदम जादू? छान छान!
मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!!
वा वा!
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Mon, 04/28/2008 - 15:44

Permalink

"काय मग?

"काय मग? कळला का हिसका? पुन्हा कधी असं कराल काय?" शिंदेसाहेबांनी मिश्किलपणे विचारलं! "पुन्हा? छे! आता असं कधी मी जन्मात करणं शक्य नाही!" "हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?" "तुमचं म्हणणं अगदी खरं आहे शिंदेसाहेब!" मी मनमोकळेपणाने सांगितले.
दिल्या शब्दाला जागणार ना, तात्या?
छ्या! कुठे ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध टक्कर देताना कोर्टात आणले गेलेले तात्याराव सावरकर आणि कुठे कलम १८५ च्या अंतर्गत पकडले गेलेले तात्याराव अभ्यंकर! "तात्या, लेका थूत तुझ्या जिंदगानीवर!" मी मनाशीच म्हटलं!
अग्गदी माझ्या मनातलं बोललास. अजुनही वेळ गेलेली नाही.. बघ पटतंय का ते. मनाने तू चांगला आहेस याबद्दल कधीच शंका नव्हती, नाही पण या अशा गोष्टींमुळे चिंता वाटते तुझी.. इतकंच. काळजी घे.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 04/28/2008 - 17:50

Permalink

फार छान

फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? ))
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 04/28/2008 - 17:58

Permalink

मतितार्थ

>>"हम्म! एक कल्पना करा, उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही?">> नेल्ड इट!
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on Mon, 04/28/2008 - 18:12

Permalink

कलम १८५-

एकदम्बेष्ट वर्णन! पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन अगदी सहजतेने घडवून आणलं हं तात्या- मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 04/28/2008 - 18:19

Permalink

छानच

तात्या तुम्ही आम्हाला ४८ तासाची जी वाट पहायला लावली ती सारर्थकी ठरली, अप्रतिम प्रस्॑ग वर्णन. मला तुम्ही परत कोर्टात नेऊन सोडलेत, मी स्टेनोग्राफर असल्यामुळे मी सतत डायसवर असायची, आमच्या ज् ज साहेब तर असल्या केस पुकारणी झाल्यावर घेत आणि काही आरोपी॑ना त्या॑च्या नजरे समोर बसण्याची शिक्षा देत, आणि ते ही सरळ्च बसायचे, मी मग थोड्या थोड्या वेळाने त्या माणसाचे काय चालले आहे हे एक नजर टाकुन पाहायची, सर मला सा॑गत तुमचे ही लक्ष राहु दे.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Mon, 04/28/2008 - 18:40

Permalink

एकदम बेस्ट

फार छान लेख... =D> =D> =D> =D> उद्बोधक म्हणजे काय , फारच उद्बोधक..... जालिम होता...आता यापुढे कधीही दारू पिऊन कोणत्याही गाडीच्या हँडलला, स्टीअरिंगला हात लावणार नाही.... ((आपण सलमानला नेहमी शिव्या देतो आणि स्वतः चे काय ?? )) सहमत... तात्या बरेच दिवस धाकधूक होती की रौशनीप्रमाणे याचाही शेवट अधान्तरी रहातो का काय.... पण हा भाग संपूर्ण लिहिल्याबद्दल धन्यवाद. एकदम फक्कड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. आवडला.... (तेवढ रौशनीच पण घ्या मनावर) मोर्‍याकडून पैसे केले कि नाही वसूल? आपला (आपल्या अनुभवातून कानाला खडा लावलेला) आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 04/28/2008 - 19:45

Permalink

वा तात्या, सुरेख शब्दबद्ध केलास अनुभव!

पोलीसांनी अटक करुन नेणे म्हणजे तशी नाचक्कीच - पण हे उघडपणे चारचौघात सांगायला जे धैर्य लागते ते तू दाखवलंस. हेतूचा प्रामाणिकपणा असल्याशिवाय असे होत नाही. त्यामुळे प्रथम तुझे अभिनंदन!:) मी स्वतः मद्यपान करीत नसल्यामुळे ते करुन गाडी चालविण्याचा प्रश्न येत नाही. गेले ४ वर्ष ३१ डिसें. च्या रात्री मी भारतातच होतो त्यावेळी माझ्या ओळखीतली दोन-दोन मुलाबाळांचे बाप असलेली, डॉक्टर, इंजिनियर, कंपनीतले मोठ्या हुद्द्यावरचे मॅनेजर्स अशी जबाबदार (?) मंडळी दारु पिऊन बिनधास्त गाड्या हाकताना बघून मला असेच कायद्याची पायमल्ली झाल्याचे जाणवले. अशावेळी खरेच आपण इतर कोणालाही दोष देण्याचा नैतिक अधिकार गमावून बसतो! एखाद्या अपघातानेच शहाणे होण्यात काय हशील? तुझा असा अनुभव वाचून काही जणांना उपरती झाली तरी हेतू सफल झाला असे मी म्हणेन. चतुरंग
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/28/2008 - 19:54

Permalink

मस्त.....

मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! व्वा मस्तच !!!!! (खाकीला सलाम) असे म्हणणारा मदनबाण
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Mon, 04/28/2008 - 19:55

Permalink

शिंदेसाहेबांना .......

पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 04/28/2008 - 22:05

Permalink

झकास!

सुरेख अनुभव कथन! शेवटी हाती-पायी धड सुटलास हे वाचून आनंद झाला. अल्कोहोल घेतल्यावर चुकुनही वाहन चालवायचे नाही हे पथ्य आम्ही कडक पाळत आलोय! कारण अतिपरिचित कामे करतांनाच आपण नेहमी ओव्हरकॉन्फिडंट असतो. कलम १८५ अंतर्गत कोर्टात आणला गेलेला मी बहुतेक पहिलाच चित्तपावन असावा! हा, हा, हा!!:)) जानवं दाखवून आपण चित्तपावन आहोत हे सिद्ध करा असं म्हटलं नाही त्याने हे नशीब!! उद्या तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला, आईबापाला, मित्राला कुणी दारू पिऊन भरधाव गाडी चालवत रस्त्यावरून उडवलं, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही असंच म्हणाल ना की पोलिस काय झक मारतात का? काय कायदबियदा आहे की नाही? खरं आहे! आपण म्हणतोच नाही का तसं!! मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! तू एकदम रियलिस्टीक शेवट केलास, वाचून बरं वाटलं. मला वाटत होतं की तो इन्स्पेक्टर तुझ्या लेखनाने वा गाण्याने इंप्रेस होऊन तुला सोडून देतो की काय! नाही म्हणजे त्यात आम्हाला तुझं कौतुक वाटलं असतं पण स्पष्ट सांगायचं तर शिंदेसाहेबांविषयीचा आदर मग थोडा कमी झाला असता... पत्र पाठवून अभिनंदन करावे ही नम्र विनंति. अशी पैसा वा दडपणाला बळी न पडणारी माणसे विरळा असतात. सुधीरभाऊंनी चांगली सूचना केली आहे. ड्यूटी चोख बजावल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप पडली तर हुरूप येतो....... -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Mon, 04/28/2008 - 23:50

Permalink

आज पूर्ण

आज पूर्ण वाचून काढले. तुम्हाला कैदेची शिक्षा झाली नाही हे वाचून बरे वाटले. त्यातल्या त्यात तुमची चूक नसताना २२०० चा दंड भरावा लागला हे वाईट झाले. पण अनावधानाने तुम्ही थोडी पिऊन गाडीला हात लावला हीच बहुधा चूक झाली. असो, पण तुम्ही सगळे खरे सांगितल्याने सुटलात हेच जास्त महत्वाचे. :) मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! छान एकदम. खरोखरच अशा माणसांचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 04/28/2008 - 23:53

Permalink

हुश्श..

चला थोडक्यात निभावले म्हणायचे तर.. नेहमीप्रमाणेच तुझ्या खास शैलीतले एका वेगळ्याच अनुभवाचे कथन,मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 04/29/2008 - 00:12

Permalink

व्वा..!!

अगदी टिपीकल तात्या ले़ख :) अतिशय उत्सुकतेने वाचून काढला तुमचा लेख. ताकदवान आहे हो तुमची लेखणी...अगदी तिथे हजर राहिल्यासाऱखं वर्णन केलंय तुम्ही. मला पुन्हा एकदा पोलिसातल्या माणसाचं आणि माणसातल्या पोलिसाचं दर्शन होत होतं! मी कौतुकाने शिंदेसाहेबांकडे पाहू लागलो! अंगावरची वर्दी शोभून दिसत होती त्यांना!! हे खासच....!!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Tue, 04/29/2008 - 00:22

Permalink

अभिनंदन

कुठलाहि लाच देणे-घेणे वगैरे प्रकार न करता,सभ्यपणे कायद्याचे पालन केल्याबद्दल तात्यांचे आणि शिंदे साहेबांचे अभिनंदनच करायला हवे. तात्या ,संपुर्ण स्टोरीच जबरदस्त आहे.आणि तुमच्या लिखाणाच्या खास शैलीमुळे वाचताना मजा आलि. अतिशय सुंदर उत्कंठावर्धक अनुभवकथन पुढच्या लिखाणाला खुप खुप शुभेच्छा. (तात्यांच्या लिखाणाचा चाहता) अबब अवांतर-मला वाटते मि.पा.- एप्रिल २००८ ,मधला हा सर्वोत्तम लेख असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Tue, 04/29/2008 - 00:36

Permalink

सुरेख अनुभव! एक आयडीया आहे....

आणखी बोलणार काय, थोरा मोठ्यांनी वरती प्रतिसाद दिलेच आहेत. पण तात्या एक सल्ला आहे:- यावर एक सुंदर्,सुट्सुटीत्,रियलिस्टिक एपिसोड काढता येइल का हो? (म्हणजे, तुमच्या ष्टोरिला चित्रित करता येइल का पहा ना.एक छानशी लघु कथा बनली आहे ही.) ही कथा ,निवेदन शैली अगदी "मालगुडी डेज" च्या तोडीची वाटली. (आन जर कधी मधी काढलाच येकादा येपिसोड्,तर जमलं तर ह्या गरिबाला पन येकादा येक्ष्ट्रा तला रोल देता आला तर बघा.) बाकी, पीत तर कधी नव्हतोच्,पण यदा कदाचित पुढे मागे पिणे सुरु केल्यास्,हा धडा अगत्याने लक्षात ठेवीन. बाकी,त्या शिंदे साहेबांचा पत्ता देउ शकाल का? आपलाच, ऋषिकेश साठे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Tue, 04/29/2008 - 00:47

Permalink

मस्त शेवट

छान एकदा संपले म्हणायचे नाट्य.....इन्स्पेक्टर शिंदे छान लिहिला आहे. जबरदस्त आहे घटना. ऋषीकेश म्हणतो तसे एक एपिसोड होईल.:)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 04/29/2008 - 01:12

Permalink

शिंदेसाहेबांचे पटले तरीही

कलम १८५ अंमलबजावणीत काही गडबड वाटते. किती पिऊन झाल्यावर किती वेळ थांबायचे हे कायद्याला कळले पाहिजे (आणि कळते!). रॉयल चॅलेंजचे ६० मिलि प्याल्यावर दीड-दोन तासांनी रक्तातील आल्कोहल जवळजवळ पूर्णपणे नाहिसे होते. दोन मोठे पेग प्याल्यानंतर ३-४ तास लागतात. इ.इ. खरे तर तात्यांनी दोन तासांत गाडी चालवायला घेतली असती तर चालले असते, पण दोन मोठे पेग घेतलेल्याने फक्त दोन तास वाट बघून गाडी चालवणे ठीक नसते. (सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी केली असती, तर तात्यांच्या रक्तात मुळीच आल्कोहल सापडले नसते.) शिंदेसाहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या चांगल्या कामाला तात्यांसारख्या दिलखुलास माणसाच्या शब्दांची साथ मिळालेलीली आहे. म्हणजे सोन्याहून पिवळे. हा कायदा १९९४ मध्ये आधुनिक केला गेला असे समजते. "दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. त्यामुळे त्यांना बेकायदा भुर्दंड पडला. तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 04/29/2008 - 01:18

In reply to शिंदेसाहेबांचे पटले तरीही by धनंजय

Permalink

"दारू

"दारू प्याली" म्हणून शिक्षा होऊ शकत नाही, तर रक्तात ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके आल्कोहल असले तरच गुन्हा आहे. तात्यासारखी भारदस्त शरीरयष्टी म्हटली तर एक पेग पिऊन रक्तात इतके अधिक आल्कोहल होत नाही. धनंजय साहेब, भन्नाट माहिती... धन्यवाद... थोडा आता गूगलवर या विषयाचा अभ्यास करावा म्हणतो... ( की आपल्या वजनाच्या, शरीरयष्टी च्या प्रमाणात किती पेग घेतले तर ३० मिलिग्रॅम/१०० मिलि इतके प्रमाण होणार नाही?).. इ.इ. पुढे कधी तरी वेळ आलीच तर थिअरी तरी पक्की करायला हवी... :$
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 04/29/2008 - 04:04

In reply to शिंदेसाहेबांचे पटले तरीही by धनंजय

Permalink

+१

दारू पिऊन गाडी चालवू नये, हा सल्ला कधीही योग्यच आहे... +१ "रामदास" यांच्या खालील प्रतिसादातले "मोठी चूक झाली" हे चुकीचे वाटले. शिंदेसाहेबांचा हेतू उदात्त असो वा नसो, त्याचे फलित चांगले आहे असे मी समजते. आपली चूक झाली वगैरे समजण्याची गरज नाही. बाकी लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Tue, 04/29/2008 - 00:59

Permalink

मोठी चूक केली तात्या.

तुम्हाला ज्या कोर्टात नेलं त्याला अन्नाडी कोर्ट म्हणतात. या कोर्टात सुनवाई होत नाही .फक्त शि़क्षा देतात.हलकी शिक्षा .पण... तुमच्यावर गुन्हेगार हा शिक्का कायमचा लागतो.पूर्ण शिक्षा भोगलेला.शिंन्दे साहेबाना कोटा पूर्ण करायचा असेल.तुम्हाला तत्वज्ञान पाजून ते प्यायला गेले असतील. ले दे के फैसला करनेका भिडू.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Tue, 04/29/2008 - 01:36

Permalink

येक छोटिशी शंका..............

येक छोटीशी (छोटी म्हणजे लहान,"लघु") शंका आहे. दारु पिउन गाडी चालवायला बंदी असेल्,तर बार ला पर्किंग ठेवतातच कशाला? ;-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Tue, 10/20/2009 - 15:25

In reply to येक छोटिशी शंका.............. by मन

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by वाटाड्या... on Tue, 04/29/2008 - 02:58

Permalink

मी जर शिंदेसाहेब असतोना

तर तुम्हाला सांगतो मी तात्यांना समोर बसवून संध्याकाळी कोर्ट संपल्यावर 'हमीर' गाण्याची छोटीशी शिक्षा केली असती. ह. घ्या तात्या....:) मुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Tue, 04/29/2008 - 03:17

Permalink

छ्या ही काय शिक्षा आहे?

ही शिक्षा तर हा "आरोपी" एंजोय करेल. त्यापेक्षा मी असतो तर त्यांना माझ्या गळ्यातुन("गळयाला नरडे कोण म्हणतो रे तो...आं ?" ;-)) त्यांना हमीरच काय भैरव अन् भैरवी काय काय म्हण्तात ते सगळं गाउन दाखवाय्ला सुरुवात केली असती. (म्हणजे मग हे "राग" ऐकुन लोकांना "राग" कसा येतो हे कळलं असतं.) म्हणजे त्यांनी स्वखुशीने (काळ्यापाण्यासकट)ईतर कुठ्लीहि शिक्षा मान्य केली असती! (शिक्षा चालेल पण गाणं आवर!):-) ;-) आपले (गाण्याच्या तयारीत असलेले)साठ्यांचे कार्टे.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 04/29/2008 - 08:31

Permalink

झकास लेख

आहे. खास तात्याच्या शैलीतला. पुण्यात ही गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे कारण पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर विश्वास नसल्याने मंडळी दुचाकीवरच असतात. पुणेकर बंधु लक्षात राहु दे बरं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 04/29/2008 - 08:38

Permalink

प्रामाणिक कथन!

प्रामाणिक आणि प्रांजळ कथन. आता तरी धडा घ्या लोकहो! काय प्यायची असेल ती (खरे तर प्यायचीच कशाला? X( ) आपल्या घरात बसून प्या की! उगाच स्वतःचा आणि दुसर्‍याचा जीव धोक्यात कशाला घाला? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Tue, 04/29/2008 - 09:10

Permalink

तात्या

लेख मस्त आहे, आवडला, एक आगाऊ सल्ला- शिंदे साहेबांचे ऐका आणि तात्या डेसिगनेटेड ड्रायवर शोधा.. म्हणजे न पिणारा. त्याची फार मदत होईल. कारण काय की नेमके अल्कोहोल केव्हाचे आणि किती काळ एखाद्याच्या रक्तात सापडते याची मला काही कल्पना नाही म्हणून..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Tue, 04/29/2008 - 22:12

Permalink

छान

छान तात्या..लेख मस्त लिहिला आहे..तेव्हढ॑ 'रोशनी' च॑ मनावर घ्या आता..
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on गुरुवार, 05/01/2008 - 23:13

Permalink

रंगतदार आहे

तात्या सॉरी हं उशीरा प्रतिक्रीया दिली...ऋषीकेश शी सहमत.... रात्रीबेरात्री दारू पिऊन साले भरधाव ट्रक चालवतात आणि माणसांना चिरडतात!" मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/02/2008 - 08:55

Permalink

आभार..

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचा मी कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शशांक on Fri, 05/02/2008 - 15:31

Permalink

मस्त!

खास तात्याशैलीतला लेख आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on Fri, 05/02/2008 - 15:45

Permalink

तात्यांची शिकवणूक

तात्यांची शिकवणूक आवडली, नेहमीच आवडते. कोर्टाची थोडीफार ओळख झाली (तेवढीच पुरे) आणि तात्यां बरोबर आपण सर्व शिकलो, की दारू पिल्या नंतर गाडी स्वतः चालवू नये :) हलकेच घ्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिता on Sat, 05/03/2008 - 00:07

Permalink

मुंबई

मुंबई पोलीस एवढी जागरुक आहे हे पाहून बरं वाटलं ते मुबई पोलीस नसावेत असे वाटते.(लेखातिल माहितिनुसार) ठाणे पोलीस होते. कहिहि चांगले केले कि लगेच मुंबई पोलीस का? ये बहोत ना इन्साफि है..
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Sat, 05/03/2008 - 00:49

Permalink

अगं

म्हणायची पद्धत गं अना..इथे येऊन लोकांना मी मुंबईची असं सांगते ना सगळ्यांना कारण ठाणं माहीत नसतं बर्‍याच जणांना, त्यामुळे सवय लागलेय....बाकी माझं माहेर सासर दोन्ही ठाण्याचच तेव्हा पक्की ठाणेकर आहे मी......
  • Log in or register to post comments

Submitted by अभिता on Sat, 05/03/2008 - 04:45

In reply to अगं by वरदा

Permalink

इथे म्हणजे

इथे म्हणजे कुठे राहतेस?
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Sat, 05/03/2008 - 01:09

Permalink

उत्तम अनुभव लेखन!

जणू माझ्यासमोरच हे नाट्य घडलयं असं वाटतयं.... बाकी असा कायदा असतो हे मला माहिती होतं (कदाचित सर्वांनाच माहिती असेल) परंतु त्याला कायमच कॅज्युअली घेत आलो.... आगाबाबो! आता या पुढे कानाला खडा......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" टिंग्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 05/03/2008 - 01:15

In reply to उत्तम अनुभव लेखन! by ब्रिटिश टिंग्या

Permalink

:)

......"घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी!" हा हा हा! हे सह्ही बोल्लास रे टिंग्या! आपला, (शिंदेसाहेबांचा दोस्त!) तात्या. -- When I read the evils of drinking, I gave up reading ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/03/2008 - 19:47

Permalink

मस्त कथन

तात्या, थोडक्यात निभावलं असं वाटतं !!! आपल्याला आलेला अनुभव दोस्तांना कथन करत आहात असे वाटले आणि रात्रीच्या वेळी पेग घेऊन सभ्य माणसांनी गाडी चालवू नये हा धडा वरील पाठातून आम्ही घेतला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिता on Sun, 05/04/2008 - 01:26

Permalink

घरी घ्यावी

घरी घ्यावी किंवा रिक्षा करावी किंवा बारवल्या/ली कडे झोपायची सोय पहावी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Tue, 10/20/2009 - 15:53

Permalink

मस्त लिहिलंत तात्या....

लेखमाला जुनी असला तरी मी वाचलेली नव्हती. फक्त तुम्ही कलम १८५ बाबत सावध असता एव्हढच माहिती होतं ते का ते आज कळलं. याबाबत काही वर्षांपुर्वी मी वकील आणि सरकारी डॉक्टर मंडळींबरोबर चर्चा केली होती. त्यांनी तेव्हा दिलेली माहिती अशी:-कायद्यानुसार दारु अथवा मादक द्रव्याच्या अमलाखाली वाहन चालवणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे काय हे रक्तातील अल्कोहोल काऊंटवरुन ठरते. १०० मिली रक्तात ३० मिलीग्रॅम अथवा अधिक अल्कोहोल असेल तर ती व्यक्ती दारुच्या अमलाखाली आहे असे ठरते. साधारणता व्हिस्की, रम, ब्रॅन्डीचे दोन पेग पिल्यावर ४५ मिनिटांनंतर रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीमागे ५० मिलीग्रॅम एव्हढे होते. (अर्थात ते इतर अनेक घटकांवरसुद्धा अवलंबुन असते.) रक्तातले अल्कोहोलचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचल्यावर ते कमी होऊ लागते. साधारणता त्याचा वेग मिनिटाला ०.१५ मिलिग्रॅम एव्हढा असतो. (हे सुद्धा इतर अनेक घटकांवर अवलंबुन असते.) थोडक्यात खच्चुन दारु पिल्यावर दुसर्‍या दिवशी नशा पुर्ण उतरण्याआधीच वाहन चालवणेही शिक्षेला पात्र ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 10/21/2009 - 11:07

In reply to मस्त लिहिलंत तात्या.... by प्रसन्न केसकर

Permalink

पुणेरीसाह

पुणेरीसाहेब, बरं झालं, चांगली माहिती पुरवलीत! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on Wed, 10/21/2009 - 15:32

Permalink

तात्या पुर

तात्या पुर्वी हा लेख वाचला होता त्यावेळेस धमाल हसलो होतो. पण आज पुन्हा वाचताना खुपच सीरीयस झालो. आट दिवसा पुर्वी आम्हि पण हा अनुभव घेतला, साला तुम्च्या कडून काही शीकलो असतो तर वाचलो असतो , असो स्वता मेल्या शीवाय स्वर्ग दिसत नाही. सन्दीप
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 10/21/2009 - 19:56

Permalink

MADD -- मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग

ह्या लेखाचा निमित्ताने एक खूप महत्वाचा विषय मांडला आहेस तात्या. अमेरिकेत 'मदर्स अगेन्स्ट ड्रन्क ड्रायविंग' ही संस्था खूप काम करते. अधिक माहितीसाठी पहा -- http://www.madd.org/About-us/About-us/History.aspx (Candy Lightner founded MADD in 1980 after her daughter, Cari, was killed by a repeat drunk driving offender. Cindy Lamb—whose daughter, Laura, became the nation’s youngest quadriplegic at the hands of a drunk driver—soon joined Candy in her crusade to save lives.) माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एखाद्याच्या घरी पार्टीवगैरे करून दारू-बिरू पिऊन जर पाहुणे गाडी चालवत गेले आणि पकडले गेले तर ज्याच्या घरी पार्टी झाली त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. चूभूदेघे ! कायद्याबद्दल नाही पण जबाबदारीने पार्टी आयोजित करण्याबद्दल उपयुक्त माहिती इथे मिळेल. http://www.ehow.com/how_4904560_responsible-host-alcohol-being-served.html
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com