चतुरंगानी दाखवलेली भाजणी, आणी थालीपीठ बघुन भुक चाळवली,
म्हणलं आपण पण पाककृती टाकावी. ;)
पाडून खूप चर्चा, आता हसेन म्हणतो
छेडून भावनांना, थोडे बघेन म्हणतो
शर गंजलेत, 'काका' मारणार नाही
जे पिडलेस तू ते, सारे जपेन म्हणतो
सारेच शाप नाही, मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो
जालींदरी नवा मी, ठ्या ठ्या करून हसतो
आता कसे छ्ळावे, 'ओवी' करेन म्हणतो
'पुपे' सुसाट सुटले, ना दोष मालकाचा
घालून याच चपला, आता पळेन म्हणतो
ती आमिषे फुकाची, नव्हती कधीच छोटी
मांडून कुंडली मी, ग्रह फीरवेन म्हणतो
टा़कून काळजाचा तात्या लिलाव पाहे
बोली 'पिडा' तरीही, मी ही फसेन म्हणतो
चेतन
काव्यरस
वाचने
2557
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी!
मस्त
>>'पुपे'
मस्त
पुपे'
हाहाहाहा
आभार