धूसर झाल्या नभी तारका
आसमंती बेहोष हिवाळी,
मेहंदी रंगल्या सोनपाऊली
पहाट घेऊन येई दिवाळी..
मंद तेवते दीप अंगणी
जणू नक्षत्रे उतरून आली,
रंग माखूनी अंगावरती,
जमीन सारी भरून गेली..
मंद सुगंधी अभ्यंगातून,
धुंद काया होत सकाळी
चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी
यौवनास या नवी झळाळी..
रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन्
सुवर्णमाला गळा ल्यायली,
निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी
वस्त्रांकित ही तनू बावरी..
बिंदी रेखूनी भाळावरती,
काजळरेखा नयनी आली
साज सोवळा लेऊन दर्पणी
लज्जित बाला रूप न्याहाळी..
क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती,
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती..
- प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3389
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्त काय ?
In reply to मस्त by अवलिया
सहमत!
In reply to मस्त काय ? by shweta
मला वाटतं...
In reply to सहमत! by लवंगीमिरची
क्षणैक
असेच
In reply to क्षणैक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लय भारी
In reply to क्षणैक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है!
धन्यवाद.
सुरेख
मस्त...
लै भारी
छान!!!
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !