Skip to main content

अमावस्या..

लेखक प्राजु यांनी रविवार, 11/10/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
काळोख भयाण किरकिर रानात रंगला आगळा खेळ चंद्राला शोधून चांदण्या थकल्या आलीया आवसेची वेळ सळसळ दाटली झाडांच्या पानांत वाराही बेभान झाला घुमघुमं घुमघुमं कडेकपारीत गारवा भरून गेला चुरचुरं पाऊल रानांत चाहूल रातीचा नूर हा न्यारा भिरभिरं पाकोळी होऊन गोंधळी काळोख जागवी सारा चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी फ़ुंकूनी तांबडं क्षितिज रंगलं पहाट मंगल झाली दिसेल चांदवा आजच्या रातीला अवनी निवांत झाली - प्राजु
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4998
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

चक्क अमावस्येवर कविता? अजून पर्यंत पौर्णिमेच्याच वाचल्या ऐकल्या होत्या. ही मस्त आहे. मीनल.

अगदी प्राजुच्या खास लयकारीतली सुरेख कविता! नाव अवसेचं, पण पुनवेच्या चंद्रासारखी लोभस कविता!:) क्रान्ति अग्निसखा

मस्त ! आवडली कविता !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

आवडली कविता. (स्वगतः आमावश्याच्या रात्री चकवा झाल्याने भटकत राहिलो तर त्या रात्री काय काय दिसेल, त्याचा अनुभव घेतला :) ) -दिलीप बिरुटे (आमावश्याला घर जवळ करणारा)

In reply to by प्रमोद देव

फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही त्याऐवजी 'चार चाँद' लपले(लोपले) असं म्हणू या. ;) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

मस्त लयबद्ध कविता! 'हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती' ची आठण झाली. तशीच खेळकर लय आहे.

प्राजूताई, मी गद्य माणूस पद्यांच्या/कवितांच्या मागे कधी फारसा जात नाहीं. आताही मी आमावस्या उघडली ती तो एक 'लेख' असेल या कल्पनेनं आणि उघडली तर ती कविता निघाली आणि मग मी ती वाचलीही! पण माझ्यासारख्या गद्य माणसालाही ही 'वृत्ता'त चोख असलेली कविता खूप आवडली. त्यातल्या त्यात "चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी, लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी" या ओळी खूपच आवडल्या. थोडक्यात काय कीं ही कविता मी वाचणे हा एक 'गोड अपघात'च म्हटलं पाहिजे! सुधीर काळे ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

भन्नाट कल्पना आहे. अंधा-या रात्रीला चमचमतं ठिगळ लावणारा काजवा मस्तच! :)