मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकाग्रहास्तव पंचामृत

प्रभो · · पाककृती
आज पेश करतोय लोकाग्रहास्तव (विशेषतः विशाल, गणपा, स्वाती राजेश , स्वाती २ यांच्या आग्रहास्तव ) गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत कच्चा मालः १. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्‍याचे पातळ काप (१५-२०) २. भाजलेले शेंगादाणे (१५-२०) ३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०) ४. कोथिंबीर ५. कडीपत्ता ६. भाजलेल्या तिळाचे कूट (अर्धी छोटी वाटी) ७. शेंगदाणा कूट (अर्धी छोटी वाटी) ८. मीठ ९. चिंच १०.गुळ ११. जिरे १२. मोहरी १३. तिखट स्टेप १: वाटीभर पाण्यात चिंच भिजवत ठेवणे..साधारण एक तास स्टेप २: एका छोट्या पतेल्यात जिर्‍या मोहरीची फोडणी करावी. स्टेप ३: फोडणीत कोथिंबीर, कडीपत्ता, खोबर्‍याचे पातळ काप, शेंगादाणे , हिरव्या मिरचीचे तुकडे, तिळाचे कूट, शेंगदाणा कूट घालून थोडा वेळ परतावे. स्टेप ४: वरच्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणी तिखट घालावे. स्टेप ५: आता त्यात एक वाटी बनवलेला चिंचेचा कोळ टाकावा. अर्धा वाटी साधं पाणी पण टाकावं. स्टेप ६: त्यात गुळाचा एक छोटा तुकडा घालावा. आणी त्यास १०-१५ मिनिटे उकळू द्यावे. (घट्टपणा कसा हवाय त्यानुसार) तायार आहे नैवेद्याचे पंचामृत....वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.

वाचने 11897 वाचनखूण प्रतिक्रिया 29

टारझन Fri, 10/09/2009 - 01:16
लपलपलपलप
वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल.
नक्की का ? - टी

चित्रा Fri, 10/09/2009 - 03:42
ह्याला नक्की अमृत का म्हणतात?! पण लागते मात्र भन्नाट. फार आवडते.

अवलिया Fri, 10/09/2009 - 06:56
!&*@&^@#(^@#^# !&^&!^!#_(#((@&&#@ असंच.... स्नेह वाढतो शिव्या दिल्याने...... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज Fri, 10/09/2009 - 07:09
पेरुच्या फोडी टाकून एकदा करुन पहा. अजुन मस्त लागते. नैवेद्याला चालतो की नाही माहीत नाही पण फळ म्हणुन पेरु चालावा.

In reply to by चतुरंग

छोटा डॉन Fri, 10/09/2009 - 12:09
आणि डाळिंब हो ? पंचामॄतात डाळिंब असते ना ? ते उपासतापास वगैरे राहु दे पण "डाळिंब घातलेल्या पंचामॄतावर आमचा अंमळ जीव आहे" ... ------ (डाळिंबप्रेमी ) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

पंचामृतात डाळिंब नाही डाळिंबाचे दाणे घालतात डानराव. डाळिंब घातले तर कडवट चव जास्त येईल. वाहवा पंचामृतात लालचूटूक डाळींबाचे दाणे. (लालचूटूक डाळींबाच्या दाण्यांचा प्रेमी) लालोबा अनार

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन Fri, 10/09/2009 - 12:18
>>पंचामृतात डाळिंब नाही डाळिंबाचे दाणे घालतात डानराव. सहमत ...! मला तेच म्हणायचे होते, आम्हाला वाटलं की "त" म्हणता "ताकभात" ओळखणारी जन्ता आहात, छ्या सगळं उलगडुन सांगावं लागतं बॉ तुम्हाला ... ------ (डाळिंब दाणे प्रेमी ) डाळिंबा दाणार ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by छोटा डॉन

सहज Fri, 10/09/2009 - 12:13
डाळिंब व पेरू दोन्हीच्या बियांशी सामना नको म्हणून डाळिंब कटाप केळ+डाळिंब दह्यात मिर्ची कोथिंबीर मीठ साखर

क्रान्ति Fri, 10/09/2009 - 08:32
सुद्धा मस्त लागतं त्यात. कारल्याच्या बारीक फोडी करून तेलावर शिजवून घालायच्या. फोटो पाहून जीव कासावीस झाला! आता दिवाळीत करायलाच हवंय! क्रान्ति अग्निसखा

राधा१ Fri, 10/09/2009 - 12:22
मी पेरुच्या पंचामृत/ पंचामृत ला मेथीची फोडणी घालते...तसेच थोडेसे तिळ सुद्धा...!! वरचा फोटो एकदम टेंम्पटींग आहे..करणार ह्या शनि-रवि मध्ये नक्की.. :-)

गणपा Fri, 10/09/2009 - 12:48
लेका धन्यु. मी कधी हे पंचामृत चाखलपण नाही. :( ऐकुन होतो फक्त. या विकांतला करतोच.

स्वाती२ Fri, 10/09/2009 - 17:26
मस्त रेसिपी. तत्परतेने टंकल्याबद्दल धन्यवाद. आता विकेंडला सर्व सामान आणून ठेवेन.

प्रभो Fri, 10/09/2009 - 19:28
प्रतिक्रिया देणार्‍या आणी पा़कृ वाचणार्‍या सर्वांचे आभार... --प्रभो

सखी Fri, 10/09/2009 - 19:47
बरेच दिवस या पा़कृ च्या शोधात होते, पंचामृत सहीच दिसतय. पा़कृ साठी धन्यवाद

प्राजु Fri, 10/09/2009 - 21:22
वरील सामान घेऊन केलेलं पंचामृत तीन-चार जणांच्या नैवेद्यास पुरेल. म्हणजे ३-४ देवाना नैवेद्य दाखवण्यासाठी का? की ३-४ लोकांच्या जेवणासाठी? ;) - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्रभो Sat, 10/24/2009 - 17:35
>>म्हणजे ३-४ देवाना नैवेद्य दाखवण्यासाठी का? की ३-४ लोकांच्या जेवणासाठी? ३-४ लोकांच्या जेवणासाठी पुरायला हवं...आता कुणाला जरा जास्त लागत असेल तर पुरणार नाही --प्रभो

In reply to by शक्तिमान

प्रभो Sun, 10/25/2009 - 12:22
ते अभिषेक करायला वपरतात. हे गौरीच्या नैवेद्यासाठी प्रसद म्हणून --प्रभो

JAGOMOHANPYARE Sun, 10/25/2009 - 12:03
याला कायरस म्हणतात का? पेरु घातला तर पेरुचे कायरस म्हणतात बहुतेक... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by JAGOMOHANPYARE

प्रभो Sun, 10/25/2009 - 12:24
>>याला कायरस म्हणतात का? आमच्या घरी पंचामृत म्हणतात असे माहित आहे.. मिपावरचे जाणकार अधीक प्रकश टाकू शकतील. --प्रभो