Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/02/2009 - 00:10
  • Log in or register to post comments
  • 17125 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Fri, 10/02/2009 - 01:08

Permalink

निषेध

=)) =)) =)) निषेध नक्की कोणासाठी हो तात्या ? पिणार्‍यांसाठी की विकणार्‍यांसाठी ? असो ... गांधी शब्द काढला तरी माझ्या मनात फक्त एक शब्द येतो .. "निषेध" !! बाकी सरकारी सुट्टी मिळते हाच तो काय फायदा ! -(गांधीद्वेष्टा) टारझन गोडसे
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Fri, 10/02/2009 - 01:39

Permalink

गांधीवाद आणि ढोंगीपणा

दुर्दैवाने गांधीवादातच ढोंगीपणा सामावलेला आहे. गांधींनी आपली तथाकथित तत्वे आयुष्यात पाळताना ढोंगीपणा केला आहे. त्यामुळे त्यांचा जप जपणार्‍यांनी तेच केले तर आश्चर्य नाही. २ ऑक्टोबरला सक्तीची दारूबंदी हा शुद्ध ढोंगीपणा आहे. एक निरर्थक रुढी. मीही याचा निषेध करतो. आणि अर्थातच नुसता "कोरडा" निषेध नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 10/02/2009 - 02:22

Permalink

सालाबादप्

सालाबादप्रमाणे गांधी जयंती आली आहे आणि सालाबादप्रमाणेच (केवळ प्रतिसाद मिळविण्यासाठी?) फुकाचे निषेध सुरू झाले आहेत. असो सारखं तेच तेच काय बोलणार! ज्याची त्याची मते! ऋषिकेश ------------------ नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 10/02/2009 - 02:28

In reply to सालाबादप् by ऋषिकेश

Permalink

+१ अगदी हेच मनात आलं!

(निषेधग्रस्त)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Fri, 10/02/2009 - 02:23

Permalink

निषेध !

फक्त गांधीजयंतीच नाही, तर कुठल्याही सणाला, कुणाच्याही जयंतीला, पुण्यतिथीला, निवडणुकीच्या वेळी.. कधीही ड्राय डे नको ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 10/02/2009 - 02:33

Permalink

नॉट अगेन!!

नॉट अगेन!! पुन्हा तेच तेच! किती वेळा निषेध ! आणि किती वेळा तेच ते प्रतिसाद.. #o - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Fri, 10/02/2009 - 02:39

In reply to नॉट अगेन!! by प्राजु

Permalink

वारंवार

वारंवार तोच तोच निषेध केल्यामुळे तात्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे ! (काळेसाहेब, लिहा बरे एक अनावृत्त पत्र !) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Fri, 10/02/2009 - 12:24

In reply to वारंवार by मिसळभोक्ता

Permalink

मधल्यामधे या गरीबाला का घसीटता?

मधल्यामधे या गरीबाला का घसीटता? आधीच तात्यासाहेब माझ्यावर भडकले आहेत त्यात तुम्ही असे लिहून आगीत आणखी तेल ओतताय्. काहीं नाहीं. आमचा तात्यांना पाठिंबा आहे. फक्त दूरदर्शीपणा अंगात बाणवून आदले दिवशी "हवे-नको" ते विकत आणून ठेवावे. सोडा-बिडा, बर्फ, शेंगदाणे वगैरे "पूरक auxiliary)" साहित्य कांहीं "ड्राय"मध्ये मोडत नाही. शिवाय स्टेनलेस स्टील किंवा तत्सम अपारदर्शक ग्लासात प्यायची तयारी असेल तर कुठेही तीर्थप्राशन करता येते असा माझा कांहीं वर्षांपूर्वीचा स्वानुभव आहे. सुधीर ------------------------ हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 10/02/2009 - 02:56

Permalink

बाकी ही

बाकी ही बातमी वाचल्यावर तर खूप लोकांना त्रास होईलसे दिसते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5074905.cms
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 10/02/2009 - 03:01

In reply to बाकी ही by घाटावरचे भट

Permalink

आषाढी एकादशी???

२९ ऑक्टोबरला आषाढी एकादशी आहे, हे वाचून पडलोच! शाळेत चैत्र,वैशाख, ज्येष्ठ, आषाढ .... कार्तिक, मार्गशीर्ष.. वगैरे जे घोकून घेतात त्याची उजळणी करण्याची म.टा.च्या प्रूफ रीडर्स ची वेळ मद्याची साठेबाजी करण्यात गेली की काय, असे वाटून गेले ;) (खोचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 10/02/2009 - 03:10

In reply to आषाढी एकादशी??? by बेसनलाडू

Permalink

>>म.टा.च्या

>>म.टा.च्या प्रूफ रीडर्स ची वेळ मद्याची साठेबाजी करण्यात गेली की काय, असे वाटून गेले =)) ज्याला त्याला आपापली चिंता बेलाशेठ!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 10/02/2009 - 03:52

In reply to आषाढी एकादशी??? by बेसनलाडू

Permalink

=))

तेच, ऑक्टोबरात आषाढी वाचून गार झालो. ड्राय डे चा परिणाम म्हणावा काय हा? ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांत उदय मनोहर on Fri, 10/02/2009 - 10:45

In reply to =)) by नंदन

Permalink

"असा मी

"असा मी असामी"मधलं वाक्य आठवलं. "एकादशी होती हे निश्चित. कारण माझ्या जन्माच्या दिवशी दोघांना कडकडीत उपास घडल्याचं आठवतंय." बाकी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलटुन पालटून जुनं पंचांग वापरण्याची अनेक उदाहरणं आहेत. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 10/02/2009 - 03:15

In reply to बाकी ही by घाटावरचे भट

Permalink

हॅ हॅ हॅ!

एकूण सात दिवस बंद आहे ऑक्टोबरात. म्हणजे अचानक दारुबंदी सप्ताहच झाला म्हणायचा की! :D सर्व 'झोकदार' लोकांची ऑक्टोबर क्रांती करण्याची वेळ झाली ! ;) (क्रांतिकारक)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 10/02/2009 - 04:13

Permalink

नावाचेच ड्राय डे..

ड्राय डेच्या आदल्या दिवशी जरा लिकर दुकानांवर नजर टाकली की कळते, जो तो उद्याची सोय करण्यात गुंतलेला. :) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 10/02/2009 - 07:10

Permalink

तात्या

तुमच्या ड्रायडे दारुबंदी निषेध भाषणाची एक चित्रफित चढवा हो. बघायला मजा येईल. निषेध पत्रकांना कोणी विचारत नाही, तूनळीवर एक चित्रफित चढवाच. येत्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या भागातील जे उमेदवार आहेत त्यांना हा प्रश्न जरुर विचारा, उत्तर काय मिळाले ते जरुर लिहा. बाकी २ ऑक्टो. शिवाय इतर ड्रायडे देखील असतात त्याबद्दल निषेधही, किमान त्या त्या दिवशी होउन जाउ दे. स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष झाली ह्या देशाला पण तरी किती दिवस व किती वर्ष भरडले जाणार तुम्ही? छ्या तुमच्या सहनशक्तीची दाद देउ की तुमच्या हतबलतेवर सुस्कारा टाकू, काही कळेनासे झाले आहे. जय हिंद, महात्मा गांधीजी की जय!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 10/02/2009 - 08:21

In reply to तात्या by सहज

Permalink

सहमत आहे. २

सहमत आहे. २ ला मोर्चा काढाच. मोर्चाला हवे तितके पंटर पाठवतो. पण त्यांची घसे ओरडताना कोरडे होणार नाहीत याची काळजी घ्या म्हणजे झालं. किती पंटर पाठवु?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 10/02/2009 - 08:38

In reply to तात्या by सहज

Permalink

१+

सहजरावांशी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 10/02/2009 - 16:47

In reply to तात्या by सहज

Permalink

सहमत

सर्व निषेधकर्त्यांनी (प्राणंतिक!) उपोषणाला बसून गांधी जयंती व दारूबंदीचा निषेध यांचा सूवर्णसंगम साधावा असे सुचवतो. बाकी जर गांधी जयंतीशीच वावडं असेल तर मात्र कठीण आहे लालबहादूर शास्त्री व मोहनदास करमचंद गांधी या थोर पुरुषांस मनापासून दंडवत ऋषिकेश ------------------ नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे. (प्रस्ताव अनेक आले आहेत जो स्वतात मस्त करून देईल त्याकडून घेईन ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by शाहरुख on Fri, 10/02/2009 - 08:31

Permalink

गांधी

गांधी बाबाचा दारू पिण्यास विरोध होता काय ?? जाणकारांचे काय मत आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Fri, 10/02/2009 - 13:29

In reply to गांधी by शाहरुख

Permalink

विदेशीला

विदेशीला होता. कुटीरउदद्योगांना न्वता.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 10/02/2009 - 08:43

Permalink

तात्या

आणखी एक पद्धतीने निषेध व्यक्त करुया. माझ्या कडे मी एक अड्डा तयार केला आहे. ३६५ दिवस नो ड्राय डे. तसा गविरमींट चा परवाना सुद्धा आहे. तो गांधी जयंती च्या निमित्ताने सुरु करायचा होता. सर्वसाक्षी आणि मी तसे ठरवले होते. विविध प्रकारचे मेनु ची तयारी होती. पण काय करणार प्रमुख पाहुणा म्हणुन फित कापायला बोलवायचे होते. पण तुम्ही अंमळ बिझी. काय करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/02/2009 - 08:50

In reply to तात्या by विनायक प्रभू

Permalink

आज जमुया

आज जमुया का? :) आज आपल्याला टाईम हाय! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 10/02/2009 - 09:03

Permalink

वोक्के

दोन नंतर मोकळा आहे मी. मेनु नंतर ठरवतो. सर्वसाक्षी ना तुम्ही बोलवा. रामदासांना मी बोलवतो. आणखी कोणाकोणाला निशेद व्यक्त करायचा आहे त्यांनी प्रतिसादात कळवावे. आयचा घो ड्राय डे च्या. उशीर झाला म्हणुन काळजी नको. पसरायची व्यवस्था सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 10/02/2009 - 09:05

In reply to वोक्के by विनायक प्रभू

Permalink

तात्याला

तात्याला उशीशिवाय पसरता येत नाही. तेवढी सोय त्याच्यासाठी कराच. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on Fri, 10/02/2009 - 14:46

In reply to वोक्के by विनायक प्रभू

Permalink

मी पण मी

मी पण मी पण. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 10/02/2009 - 09:12

Permalink

तु

येतोस काय रे हलकटा? तुझ्या साठी दोन उशा.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 10/02/2009 - 09:13

In reply to तु by विनायक प्रभू

Permalink

श का

श का ष????? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 10/02/2009 - 09:41

Permalink

तुला

काय हवे ते तु ठरव.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 10/02/2009 - 09:32

Permalink

चालु द्या

चालु द्या !!! मास्तर नंतर तात्या न नाना .. अजुन दोन हिरवट म्हातारे ... चालू द्या भो ... आता त्या उशांवरून मारामारी करू नका रे... ते फक्त डिस्कव्हरी चॅनल वर होतं ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 10/02/2009 - 10:19

Permalink

ड्राय डे आणि त्याचे महत्व

'ड्राय डे आणि त्याचे महत्व' या विषयावर आमच्या वतीने आमचे सन्माननीय मित्र कलंत्री हे दोन शब्द बोलतील. स्वगतः हल्ली कलंत्री कुठे दिसत नाही. :S -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 10/02/2009 - 10:28

In reply to ड्राय डे आणि त्याचे महत्व by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

त्यांनी

त्यांनी घेतलेली दिसतेय.... निवृत्ती ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Fri, 10/02/2009 - 10:28

Permalink

अरेरे...

जयंती निमित्त महात्मा गांधींना आणि लाल बहाद्दूर शास्त्रींना अभिवादन.. भले आपण कोणीही गांधीजींना आदर देत नसू, पण केवळ ड्राय डे म्हणून यांची आठवण या गोष्टीचा निषेध..ज्या व्यक्तीला सर्व जग आदर दाखवते (पहा गुगल होम पेज) त्याला एकानेही अभिवादन करू नये..या गोष्टीचा सुद्धा निषेध.. एकालाही शास्त्रीजींची आठवण येऊ नये..? याचा ही तीव्र निषेध... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Fri, 10/02/2009 - 11:27

In reply to अरेरे... by योगी९००

Permalink

+१

विनम्र अभिवादन. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/02/2009 - 12:02

In reply to अरेरे... by योगी९००

Permalink

भले आपण

भले आपण कोणीही गांधीजींना आदर देत नसू,
अनादरही कुठे व्यक्त केलेला नाही...
पण केवळ ड्राय डे म्हणून यांची आठवण या गोष्टीचा निषेध..
केवळ ड्राय डे म्हणून नव्हे. ड्राय डे मुळे गांधीजयंती नव्हे तर गांधीजयंती मुळे ड्राय डे लादला गेला आहे आणि त्यात मद्यव्यवसायाशी निगडीत असणारा कष्टकरी वर्ग भरडला जात आहे, स्वत:च्या रोजीरोटीपासून वंचित होत आहे म्हणून निषेध!
एकालाही शास्त्रीजींची आठवण येऊ नये..? याचा ही तीव्र निषेध...
शास्त्रीजींना माझी विनम्र आदरांजली.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 10/02/2009 - 10:44

Permalink

ड्राय डे उपयुक्त

आमचे मते या दिनामुळे मद्यप्रेमी लोकांना नियोजनाची सवय लागते. वाईन शॉपमधे आगाउ सुचना ठळक अक्षरात लिहिल्या असतात. त्यामुळे आदल्या दिवशी ष्टॉक करुन ठेवावा. त्यातुन काही लोकांना आयत्यावेळी मदिरेच्छा झाल्यास तशीही सोय असते. शोधा म्हणजे सापडेल. त्यातुन समजा दिवस ड्राय गेल्यास त्याची कसर दुसर्‍या दिवशी भरुन काढावी. खर तर गांधीजींनी देशी कुटीरोद्योगाला चालना दिली होती. त्यामुळे त्यादिवशी देशी /हातभट्टी या प्रॉडक्टला उत्तेजन मिळायला हवे. या निमित्त 'देशी' सप्ताह 'साजरा' करायला हवा. मोहापासुन दुर रहाण्यासाठी 'मोहाची' जवळ केली पाहिजे. त्यामुळे अतिपरिचय उद्भवुन अवज्ञा निर्माण होण्यास मदत होते. काही विद्वाज्जन सोमरसालाही दारु म्हणतात. त्यांची येथेच्छ निंदा या सप्ताहात करावी. द्राक्षासवाच्या अंमलामुळे उत्तुंग प्रतिभा स्फुरते याची उदाहरणे जालसाहित्यावर कमी नाहीत. राधाधर मधु मिलिंद जय जय | हे नाट्यगीत त्याचेच उदाहरण असावे असा आम्हाला दाट संशय आहे. असो शुष्कदिनाच्या मद्यप्रेमींना मदिच्छा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/02/2009 - 12:31

In reply to ड्राय डे उपयुक्त by प्रकाश घाटपांडे

Permalink

खर तर

खर तर गांधीजींनी देशी कुटीरोद्योगाला चालना दिली होती. त्यामुळे त्यादिवशी देशी /हातभट्टी या प्रॉडक्टला उत्तेजन मिळायला हवे. या निमित्त 'देशी' सप्ताह 'साजरा' करायला हवा. मोहापासुन दुर रहाण्यासाठी 'मोहाची' जवळ केली पाहिजे. त्यामुळे अतिपरिचय उद्भवुन अवज्ञा निर्माण होण्यास मदत होते. काही विद्वाज्जन सोमरसालाही दारु म्हणतात. त्यांची येथेच्छ निंदा या सप्ताहात करावी. द्राक्षासवाच्या अंमलामुळे उत्तुंग प्रतिभा स्फुरते याची उदाहरणे जालसाहित्यावर कमी नाहीत. राधाधर मधु मिलिंद जय जय | हे नाट्यगीत त्याचेच उदाहरण असावे असा आम्हाला दाट संशय आहे.
सुंदर उतारा! प्रकाशभावजींचा विजय असो... :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 10/02/2009 - 10:54

Permalink

माझेही अभिवादन!

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री ह्या दोघांना त्यांच्या जयंती निमित्त माझेही विनम्र अभिवादन! विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Fri, 10/02/2009 - 11:35

In reply to माझेही अभिवादन! by प्रमोद देव

Permalink

+१

दोघानांही विनम्र अभिवादन. (M.G. road ला खरेदी साठी जाणारा)भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 10/02/2009 - 12:13

In reply to +१ by चिरोटा

Permalink

+२

दोघानांही विनम्र अभिवादन. -(कोणे एके काळी M.G. road ला राहाणारा) गणपा
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Fri, 10/02/2009 - 12:35

Permalink

गांधी जयंती निमित्ताने दारुबंदी

गांधी जयंती निमित्ताने दारुबंदी सप्ता पाळ्ला जातो. फकत १ ला दिवस आणि ७ वा दिवस दारुबंदी. मधले ५ दिवस तर्रर्रर्र... व्हा. अजब हे सरकार
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Fri, 10/02/2009 - 14:19

Permalink

गांधी बाबाचा दारू पिण्यास विरोध नाही

गांधी बाबाचा दारू पिण्यास विरोध दारू + सोडा = दारु सोडा असे सांगितले आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 10/02/2009 - 14:32

In reply to गांधी बाबाचा दारू पिण्यास विरोध नाही by १.५ शहाणा

Permalink

+१

( सोड्यातला) - गणपा
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Fri, 10/02/2009 - 14:26

Permalink

मोसबी

मोसबी नारंगी लक्षात ॓वा .......
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on Fri, 10/02/2009 - 17:45

Permalink

ड्राया डे.

आमचा कायमच" ड्राय डे "असतो त्यामुळे माझ्या नजरेत हे सर्व म्हणजे 'पीनेवालेको पीनेका बहाना चाहिये "
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 10/02/2009 - 17:47

Permalink

गांधी जी व शास्त्री जी ना माझे विनम्र अभिवादन.

माझा दारुबंदीला विरोध नाही. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Sat, 10/03/2009 - 18:47

Permalink

दुर्दैवान

दुर्दैवाने अनेकांना ड्रायडेचा अर्थ कळला नाही हे वाचून वैशम्य वाटले. लेम्मी हेल्प यू अंडरस्टॅंड- ड्रायडेच्या दिवशी ड्राय व्हिस्की, ड्राय जीन, ड्राय वाईन (तरी) प्या असे त्यांचे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Tue, 10/01/2013 - 18:31

Permalink

उद्या २ ऑक्टोबर... ड्राय डे.

उद्या २ ऑक्टोबर... ड्राय डे. आपण तर आजच उद्याचि सगळि व्यवस्था केलि आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 10/01/2013 - 19:56

Permalink

खरोखर महत्वपुर्ण धागा....

बाबानो उद्याचे नियोजन आजच करा रे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/01/2013 - 20:03

Permalink

असायलाच पायजे ड्राय डे

का ओ तात्या. मिळू द्या की सुट्टी बारवाल्यांना पण. साप्ताहिक सुट्टी न घेता काय फक्त तुमच्या गमजाच बघायच्या का आयुष्यभर. नायतर हायेच की रोज सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत मापे. :( आणि स्टॉक करुन विकणार्‍यांना पण कमवू द्या एखांदा दिवस. ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com