Skip to main content

सात ऑळींची गोष्ट

लेखक संतोषएकांडे यांनी गुरुवार, 24/09/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
कारगीलला युध्ध सूरु झाल्या मूळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या. शहरातून सरहदीवर जाणार्‍या सैनिकांच्या अभिवादनाचा कार्यक्रम होता. देशाच्या रक्षकांच्या अभिवादनाला दूसरे रक्षक "रक्षामंत्री" येणार होते. दिल्या वेळा पेक्षा फक्त "तीन तास" लेट ते स्वतःच्या 'लिमोझीन' मधे आले. कार्यक्रम 'शॉर्ट' मधे आटोपुन ते निघून ही गेले. थोड्या वेळानी नातेवाइक-मित्रांचा निरोप घेवून सैनिक 'खडखड खटारा' ट्रक मधे बसून सरहदी कडे रवाना झाले. आज पर्यंत कळले नाही की, देशाचे खरे 'रक्षक' कोण....!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3412
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

गुजराथचा हा 'सातताळी ' नावाचा अतिशय फेमस साहित्य प्रकार आहे. हल्ली प्रत्येक वस्तु छोट्या स्वरुपात रुपांतरीत झाली आहे. घरा एवढ्या कॉम्प्युटरातून लॅपटॉप, टेस्ट मधून वनडे आणी त्यातून ही २०-टवँटी ,एसएमएस मधले वाक्य,इवन i love you साठी i l u. तर एखाद्या मोठ्या प्रसंगाला लहान रूप देवून, ते पण फक्त ' सात ओळींतच ' एक मोठा मॅसेज का देता येवू नये....! हेच 'सातताळी ' चे गूढ आहे.

गुजराथचं सोडा मिपावर एकोळी जास्त पावरफुल असते. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अजुनही काही फरक नाही. बादवे, हा सातोळी प्रकार आवडला....