✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तात्या म्हणजेच शब्दचुंबक

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 09/23/2009 - 23:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6487 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

जीवेत शरदः शतम

मिसळभोक्ता
Wed, 09/23/2009 - 23:21 नवीन
सामंतकाका, वाढ दिवसाच्या शुभेच्छा. आपल्या उत्त्तमोत्तम लेखनाच्या प्रतीक्षेत. (अ‍ॅनॉनिमस....) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Wed, 09/23/2009 - 23:41 नवीन
सामंतकाका जियो ... भरपूर वेळ खर्चून अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहीला आहात !! बाकी एक गोष्ट नमुद करावी वाटते ती अशी .. आपल्या मिसळपावा वर केवळ दोन व्यक्ती अशा आहेत .. ज्या केवळ लेखांतुन दिसतात .. बाकीच्यांचे लेख ते वाचतात की वाचत नाहीत हे माहीत नाही .. पण त्यांच्या प्रतिक्रिया फक्त त्यांच्याच लेखांवर आभारप्रदर्शन करताना दिसतात .. त्या व्यक्ति म्हणजे .. कोदा आणि श्रीकृष्ण सामंत :) असं का असेल हो ? (सामंतकाकांच्या दर्दी लेखणाचा (न फिरणारा) फॅन) आंबेचोख्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

+ २ हे बाकी अगदी मार्मिक निरीक्षण आहे!

चतुरंग
Wed, 09/23/2009 - 23:52 नवीन
टार्‍याशी सहमत! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सही रे

पाषाणभेद
गुरुवार, 09/24/2009 - 08:06 नवीन
सही रे टार्‍या. टार्‍या ला टाळ्या. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

असं हे कारण आहे.

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 09/24/2009 - 09:12 नवीन
नमस्कार टारझन, "असं का असेल हो? फार सुंदर प्रश्न विचारला आहेस.आणि तुझं ऑब्झरवेशन अचूक आहे.वाखाणणी करण्यासारखं आहे.मला सुचतं ते माझं कारण मी सांगतो. माझ्याही लेखनावर आभाराची प्रतिक्रिया देण्याचा अलीकडे मी तो शिरस्ता सोडून दिला हे ही तुझ्या लक्षात आलं असेल. मिपावर आल्यापासून मी एक शिरस्ता ठेवला होता की आपल्या लेखनावर जर कुणी प्रतिक्रिया दिली तर त्याचे ताबडतोब आभार मानायचे.पण "मी मला मिळण्यार्‍या प्रतिसादाची अशातर्‍हने संख्या वाढवीत आहे" अशी माझ्यावर झालेली मी टिका वाचली.आणि माझ्या लेखावर आलेल्या प्रतिसादावर कुणाचेही आभार मानायचं सोडून दिलं.वाईट वाटत होतं पण काय करणार.गैरसमजापेक्षा समज बरी नाही काय? " बाकीच्यांचे लेख ते वाचतात की वाचत नाहीत हे माहीत नाही " ह्याचं उत्तर असं की, मी वेळ काढून जमतील तेव्हडे लेख-आणि तात्याचा प्रत्येक लेख आणि प्राजु,क्रान्तीची प्रत्येक कविता आवडीने- वाचत असतो.आणि प्रतिक्रिया देण्यासारखी वाटली तर नक्कीच देतो.तात्या नक्कीच ह्या माझ्या म्हणण्याला साक्षी आहे.त्याच्या अनेक लेखावर माझ्या स्टाईलमधे प्रतिक्रिया देत होतो.प्राजूच्या मातोश्रींच्या सिद्धहस्त लेखिका म्हणून भारताच्या अध्यक्षांकडून सन्मान झाल्याच्या पोस्ट्वर मी माझ्या स्टाईल मधे लिहलं होतं ते मला निक्षून आठवतं, मी प्राजूला लिहलं होतं, "अशीच अमुची आई असती सिद्धहस्त लेखिका आम्हीच लेखक झालो असतो वदले सामंत काका" सांगण्याचा मतितार्थ असा की.वाचकांच्या प्रतिसादाने लेखकाचं मनोबळ वाढतं आणि उत्तेजनक प्रतिसादाने आणखी लेखन करण्यात उत्साह ही वाढतो,तसंच लेखनावर योग्य टिका असलेल्या प्रतिसादाने लेखकाला आपल्या लेखनात सुधारणा करता येते असा माझा समज होता.आणि आहे. "तुमचे लेख पारदर्शक असल्याने समजण्यासारखे असतात आणि वाचायला आवडतात.त्यामुळे आम्ही दरवेळी "लेख चांगला लिहिला आहे" असा प्रतिसाद देत नाही." असं माझ्या काही मायबाप वाचकानी मला लिहूनही कळवलं.त्यामुळे माझ्या लेखनाला प्रतिसाद नसले तर मला काही वाटत नाही. आणि खरं सांगू का,प्रत्येकाच्या प्रत्येक लेखाला काही ना काही तरी प्रतिक्रिया देऊन, "लेख लिहायला जमलं नाही-होत असेल काही ना- तरी प्रतिक्रियेमधून लेखन करण्याच्या त्यांच्या हौसेला" आनंद मानणार्‍या लोकांचं मला कौतुक वाटतं.आणि मिपावर असे अलीकडे "प्रोफेशनल प्रतिसाद लेखक" डोळ्यात भरण्यासारखे मला दिसतात.मिपाच्या प्रसिद्धीच्या अनेक कारणापैकी "प्रतिसादाने भरलेलं संस्थळ" हे ही एक कारण असावं असं मला वाटतं.प्रत्येकाच्या लेखावर प्रतिक्रिया देणार्‍या एका "प्रतिसाद लेखकाच्या" नावावर त्याने किती लेख लिहिले असतील? हे कुतूहल म्हणून पाहायला गेलो तेव्हा मिपाचा सदस्य होऊन एक ही लेख त्यांनी लिहिलेल्याचा उल्लेख दिसला नाही.हे गृहस्थ कुणाच्या ही लेखावर प्रतिसाद देण्याच्या बाबतीत हिरीरीने भाग घेतलेले दिसतात. पण आपल्याला बुवा हे असे प्रतिसाद द्यायला जमत नाही.मात्र एखादी कविता किंवा लेख वाचून कौतुक करण्यासारखं वाटलं तर मी एक ही संधी सोडत नाही. आता श्री.कोदा हे असं का करतात ते तेच जाणे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तात्याच्य

अवलिया
Wed, 09/23/2009 - 23:24 नवीन
तात्याच्या आणि तुमच्या दोस्तान्याबद्दल आम्हाला डावुट होताच... अभिनंदन आणि शुभेच्छा ! :) (७४+६५+१२+९) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

तुम जियो .....

मी-सौरभ
Wed, 09/23/2009 - 23:28 नवीन
सौरभ
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

सांगलीचा भडंग
Wed, 09/23/2009 - 23:32 नवीन
अभिनंदन..
  • Log in or register to post comments

वा वा सामंतकाका!

चतुरंग
Wed, 09/23/2009 - 23:32 नवीन
अहो झाली की हो ट्रिपल सेंचुरी! :) मस्तच!! तुमचा लिहिण्याचा उत्साह दांडगा आहे आणि तो असाच राहो! :) आणि हो, नवीन ल्यापटॉपाबद्दल अभिनंदन! :) (अवांतर - आधी मी 'तात्या म्हणजेच शब्दचुंबन' असे वाचले होते! :O ) चतुरंग
  • Log in or register to post comments

+१..अभिनंदन !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 13:08 नवीन
सामंतकाकांच्या भाषेत रेडीली अपलोडेबल चिप ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अभिनंदन...

मदनबाण
Wed, 09/23/2009 - 23:41 नवीन
मिपावर आता लेखनाच्या चौथ्या शतकाच्या उद्देशाने आम्ही कूच करीत आहो. अभिनंदन... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन! -अ

अनामिक
Wed, 09/23/2009 - 23:53 नवीन
अभिनंदन! -अनामिक
  • Log in or register to post comments

असेच उत्तम

प्राजु
Wed, 09/23/2009 - 23:54 नवीन
असेच उत्तम लेखन तुमच्या हातून घडो. वाढदिवसानिमित्त उशिरा का होईना शुभेच्छा आणि तिसर्‍या शतकासाठीही अभिनंदन!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अभिनंदन

संदीप चित्रे
गुरुवार, 09/24/2009 - 00:02 नवीन
त्रिशतकाचेही आणि नवीन लॅपटॉप घेऊन अजून उत्साहाने भरलेल्या तुमच्या मनाचेही :)
  • Log in or register to post comments

मिपाचा ब्रॅडमन!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/24/2009 - 06:20 नवीन
सामंतकाका, ३०० लेखांबद्दल हार्दिक अभिनंदन! असाच उत्साह वाढत राहो... आपला, सेंचुरीपूर्वीच आऊट, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

विरेन्द्र सावंत का श्रीकृष्ण सेहवाग..?

योगी९००
गुरुवार, 09/24/2009 - 00:08 नवीन
३०० व्या लेखाबद्दल तुमचे अभिनंदन...माझ्या ३०० प्रतिक्रिया सुद्धा झाल्या नसाव्यात... तुमचा सेहवाग झाला आहेच..लवकरच ब्रायन लारा व्हावा ही इच्छा.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

अभिनंदन...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/24/2009 - 00:34 नवीन
सामंत साहेब, आपलं लेखन वाचायला आवडतेच आणि वाचत असतोच. असो, त्रिशतकाबद्दल अभिनंदन...! आपल्या लेखनातला अनुभव, उपदेशपर लेखन , थोडे चिंतन, थोडेसे असे आणि थोडेसे तसे,... आपल्या लेखनातून प्रत्येक वेळेस नवं काहीतरी वाचायला मिळते हा माझा अनुभव आहे. आपली लेखणी अशीच बहरत राहो..! -दिलीप बिरुटे (सामंत साहेबांचा फॅन)
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

शेखर
गुरुवार, 09/24/2009 - 00:46 नवीन
अभिनंदन काका शेखर
  • Log in or register to post comments

त्रिवार अभिनंदन

प्रभो
गुरुवार, 09/24/2009 - 01:21 नवीन
वाढदिवस, लेखांचे त्रिशतक, नवा लॅपटॉप याबद्दल त्रिवार अभिनंदन!!!! काका, तुम्ही लेख लिहिताही सुंदर...दर वेळेस नवे काहीतरी शिकायला मिळतं..असेच लिहित रहा.. तात्यांचं चित्रणही अगदी सुरेख... --(श्रीकृष्णाचा गोंद्या) प्रभो ---------------------------------------------------------------------------------- अवांतरः १०० वर लेखाच्या लेखकांत राजेचं नाव कसं नाही.???..त्याचे दिडशे झाले म्हणून एक पेश्शल लेख टकला होता त्याने....(ह. घ्या)
  • Log in or register to post comments

मिसळपाव ही उत्तम सोय

धनंजय
गुरुवार, 09/24/2009 - 01:40 नवीन
तुम्हा-आम्हासारख्या हौशी लेखकांसाठी मराठी लिहायला मिसळपावाची सोय फारच चांगली आहे. ( सामंतकाका, तात्यांना ऊठसूट मूठमूठ मांस चाढवल्यास त्यांची प्रकृती बिघडेल. जरा सबुरीने :-) ) त्रिशतकाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लिहा.

मीनल
गुरुवार, 09/24/2009 - 07:42 नवीन
आपल्याला वाडदिवसानिमित्त शुभेच्छा. <:P खूप खूप लिहा. मी सर्व लेख वाचते. क्वचित प्रतिसाद देते. ब-याचदा लेखातला मेसेज पार हृदयाला भिडतो. आपल्या उत्साहाच खरोखर कौतुक वाटत. मी लेखनाच्या केलेल्या आळसाची लाज वाटते. मीनल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 08:06 नवीन
हटके लेखाबद्दल अभिनंदन. स्टॅटिस्टीक्स आवडली. तसे आता प्रतिसादांचे शतक, द्विशतक (इतरांच्या लेखात) होउन जाउ दे. :-) तात्याला धन्यवाद की त्याने मिपावर, अनेक लोकांना इतर संकेतस्थळाच्या मानाने भरपूर स्वातंत्र्य दिले. सामंतकाकांना मिपावर आणण्यास उद्युक्त करणार्‍या प्रा. डॉ. देखील धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अभिनंदन बर

पाषाणभेद
गुरुवार, 09/24/2009 - 08:10 नवीन
अभिनंदन बर का काका. लेख आवडला. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

म्हातार्‍

विसोबा खेचर
गुरुवार, 09/24/2009 - 08:19 नवीन
म्हातार्‍या, अरे माझ्यासारख्या सामान्य इसमाचं कौतुक तरी किती करशील?! :) पण तुझ्यासारख्या वडीलधार्‍याचा कौतुकभरला हात डोक्यावर आहे ही कल्पना मात्र सुखावून जाते.. असो, मिपा तुझंच आहे.. इथे भरपूर लिवा साहेब.. तुझा, तात्या.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

क्रान्ति
गुरुवार, 09/24/2009 - 08:29 नवीन
सामंतकाका वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्रिशतकाबद्दल अभिनंदन. :) [आपल्या लेखांच्या चौथ्या शतकाच्या प्रतिक्षेत] क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

सामंत काकांना वाढदिवसाच्या खंडीभर शुभेच्छा.

वेताळ
गुरुवार, 09/24/2009 - 09:33 नवीन
तसेच सामंत काका,प्रो.देसाई व त्याच्या नातवाचे देखिल हार्दिक आभार,नवीन ल्यापटोप व तिसर्‍या शतकाबद्दल(लेखाच्या) हार्दिक अभिनंदन. वेताळ
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्रमोद देव
गुरुवार, 09/24/2009 - 09:46 नवीन
लेखांचे त्रिशतक, ७७वा वाढदिवस आणि नवा उर्ध्वपट.....ल्यापटॉप हो :)...ह्या तिन्हींबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

नवा

टारझन
गुरुवार, 09/24/2009 - 12:58 नवीन
नवा उर्ध्वपट.....ल्यापटॉप हो
बासंच ... काय अट्टहास हा नको तिथे मराठीपणाचा ? कुठे तरी ऑर्कुटाला आपणंच मेतकुट म्हंटला होतात .. देव काका .. आहो इंग्रजांनी ही "जंगल" हा शब्द आपणवला हो .. असे जड-जड शब्द मेंदूला वात आणतात . ;) आणि हो .. सामंतकाका , तुमचा आदर आहे होता राहिल .. मी फक्त शंका म्हणून विचारलं !! आता तुमच्या लेखणशैलीबद्दल मी कधीही कमेंट केली नाही . एका उदाहरणावरून सांगू का ? आर्ट मुव्ही (सामंतांचे लेख) ला पब्लिकची (प्रतिसाद) गर्दी जरी झाली नाही तरी मुव्ही फालतु आहे असं म्हणता येणार नाही .. तसेच कमर्शियल (मिभो) किंवा अ‍ॅडल्ट रेटेड (टारझन) मिव्हीजचे शो जरी हाऊसफुल्ल (५० प्रतिसाद) झाले तरी ते लेख "लै भारी" असतीलंच असं नाही !! पण डॉक्युमेंट्रीज (कोदाचे निबंध) मात्र निश्चित बोरींग असतात :) कोदांशी तुमची बरोबरी केलेली नाही. कोदा फक्त स्वतःच कौतुक सांगायला आणि आपली रक्तरंगीत* करायला येतो ... तो कोणाचे लेख वाचत असेल असं बिल्कूल वाटत नाही . वर प्रतिक्रिया द्या म्हणून काव आणतो... व्हेरअ‍ॅज तुम्ही स्वतःसाठी लिहीता .. तुम्ही कर्काच्या वाकड्या कमेंट्स देखील अगदी विना हाजमोला खपवल्यात, ह्यातच तुमचा विजय आहे .... बाकी माझ्या सारख्या क्षुद्राच्या कमेंटला महत्व देऊन उत्तर दिल्याबद्दल खरंच सुखावलो आहे . -(देवांच्या "मराठी शब्द सुचवा" चा फॅन) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

अभिनंदन!

समंजस
गुरुवार, 09/24/2009 - 13:24 नवीन
त्रिवार अभिनंदन काका! =D> त्रिशतकी खेळी बद्दल!! तुमचं लिखाण असंच सुरु ठेवा!!
  • Log in or register to post comments

सामंतकाका,

सुधीर काळे
गुरुवार, 09/24/2009 - 13:34 नवीन
सामंतकाका, ज्यांना मी काका म्हणू शकेन अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये आपण आहात. चक्क दहा वर्षांनी मला सीनियर! तरी आपले या (तीन सेकडा) त्रिशतकानिमित्त्य अभिनंदन. आपल्याला मिपाचे सचिन तेंडुलकरच म्हणायला हवे. पण ज्या वेगाने आपण हे त्रिशतक ठोकलेत ते पहाता "सचिन ब्रॅडमन" हे नाव जास्त शोभेल! आपल्याला शुभेच्छा. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 09/24/2009 - 13:34 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्रिशतकाबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सामंत काका

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 09/24/2009 - 14:04 नवीन
सामंत काका तुम्हाला मिपावरील वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्रिशतकाबद्दल अभिनंदन असेच लिहित रहा ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments

लय भारी

विनायक प्रभू
गुरुवार, 09/24/2009 - 14:12 नवीन
लेख. लगे रहो सामंत भाई.
  • Log in or register to post comments

दिवस उजाडलो म्हणजे झालां.

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 09/24/2009 - 22:11 नवीन
मंडळी,तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार.माझ्या तिनशेव्या लेखाबद्दल,माझ्या जन्म दिनाबद्दल आणि माझ्या नव्या लॅपटॉपबद्दल आपल्याकडून कौतुक झाल्याबद्दल तुमचे पुनःश्च आभार. एक मात्र कबुल करावं लागेल,आणि मी ते परत रिपीट करतो की तात्याचं चुंबकत्व माझ्या ह्या लेखाला सुद्धा एव्हडे प्रतिसाद मिळायला काही प्रमाणात कारणीभूत झालं आहे.कसं का असेना, "कोणाचो कोंबडों आरवेना दिवस उजाडलो म्हणजे झालां" काय समजल्यात? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

एक मात्र

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 01:02 नवीन
एक मात्र कबुल करावं लागेल,आणि मी ते परत रिपीट करतो की तात्याचं चुंबकत्व माझ्या ह्या लेखाला सुद्धा एव्हडे प्रतिसाद मिळायला काही प्रमाणात कारणीभूत झालं आहे
हे अगदी खरं.... तात्यांचे नाव पाहुनच हा लेख वाचायला घेतला! असेच काही टारझनने लिहिलेल्या लेखांबाबत होते माझे. लेख छप्परफाड असणार असेच वाटते॓! बाकी आपली आकडेवारी आवडली... कशी मिळवलीत हो ही माहिती? मिपा च्या डेटाबेसला अ‍ॅक्सेस मिळाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा