मीनाकुमारी
कपाळावरून घाम निथळत होता, मिटल्या डोळ्यांची गरगर वाढली होती. श्वासाची लय बिघडली होती. धडपडून मीना जागी झाली. कालपासून तिचे मन तसे सैरभैर होतेच पण उशाशी कोणीतरी बसून डोक्यावरुन हात फिरवत, "चल, बाळ घरी ये, सगळे जमलेत बघ" असे म्हणत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण डोळे चिकटले आहेत व नीट काही बघताही येत नाही असा, भास व सत्याच्या मधला अनुभव तिला अतिशय संभ्रमित करुन गेला.
आता झोपणं शक्यच नव्हतं म्हणून ती ऊठली आणि खोलीच्या बाहेर आली.
हॉल मधे मालक-मालकीण टिव्ही बघत बसलेले होते. मालकीण बाईंनी घड्याळाकडे पहात विचारले, "काय ग? बरे नाही वाटत का, की अजून झोप येत नाहीये? दीड वाजलाय पहाटेचा!"
कामतांकडे नोकरीला लागून, मीनाला आज बरोबर वर्ष होत आले होते. मीनाची जन्मकहाणी कुठल्याही कथा-सिनेमातील कहाणी शोभली असती. चार भावंडात मोठी असलेली मीना १० वर्षाची असताना, मीनाचे वडील गेले. एक जमिनीचा तुकडा व त्यावरचे एक जुने पडके घर, याच्या आधारावर मीनाची आई चार पोरांचा सांभाळ कसाबसा करत असताना, भाडेकरु म्हणून ठेवलेल्या सतिशच्या प्रेमात पडून मीनाने १६व्या वर्षीच घरातून पलायन केले. मुंबईत आल्यावर एका खोलीच्या झोपडीत संसार करताना तिला वास्तवाची जाणीव येत होती. सतिशचे खरे स्वरुप हळुहळू समोर येत होते. एकदा एका घरफोडीच्या गुन्ह्यात सतिश पकडला गेला. पोलिसांनी तिला पण गुंतवले असते पण तिचे नशीब बलवत्तर म्हणून त्या झोपडपट्टीत काम करणार्या एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने तिचे पुनर्वसन झाले. तिची सोय एका बंगल्यात कामवाली म्हणून झाली होती. घरकाम आणि एका लहान मुलीचा सांभाळ करणे यात ती स्वत:ला सावरु पहात होती. परत गावी जायला पैसे नाही व गेले तरी कुठल्या तोंडाने व तिथे तरी काय करायचे म्हणून तिने हे जगणे स्वीकारले होते.
दोन दिवसापासूनची बैचैनी व आजचा प्रसंग मालकीण बाईंना सांगताना देखील ती पार घाबरून गेली होती. मालकीण बाईंनी तिला समजावले, "आम्ही तुझी गेले वर्षभर अवस्था बघत आहोत, माझे ऐक उद्या सकाळी तुझ्या आईला फोन लाव. तुला घरातून पळून जाउन दीड वर्षाहून जास्त काळ लोटला आहे, तिच्याशी बोल तिलाही बरे वाटेल, आणि तुलाही."
दुसर्या दिवशी दुपारी गावातल्या एका दुकानदार मैत्रीणीच्या घरी फोन करुन जेव्हा आईला फोनवर बोलावून घेतले तेव्हा सुरुवातीला अर्धापाउण तास मायलेकींच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वहात होत्या. शेवटी आई सांगत होती, " अग कालच मी मुलांना घेउन मामाकडे गेले होते. तू गेल्यावर आजी काही दिवसातच गेली. त्यानंतर काल परत पहिल्यांदाच मामाकडे आम्ही सगळी भाऊ-बहीण, नातवंड जमलो होतो. रात्री पार दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. एकटी तुच तेवढी नव्हतीस. सगळ्यांनी तुझी आठवण काढली. आजोबा म्हणत होते, आजीचा लै जीव तुझ्यावर. तू इथे पाहीजे होतीस, आजीला फार आवडले असते. "
मीनाला परत तो रात्री दीड वाजताचा आवाज, ते डोक्यावरचे हात फिरवणे आठवून आठवून खोली आपल्याभोवती गरगर फिरते आहे असे वाटायला लागले.
[प्रेरणा = जास्त विश्लेषण करु नका, काल तात्या, परा, प्रमोदकाका यांच्या कथा वाचुन मी पण "भास-आभास" हॉरर श्टॉरी एकदम हाय काय नाय काय म्हणतं लिव्हली बघा. या कथेचा जिवंत अथवा मृत व्यक्ति किंवा कथेशी संबध नाही, आढळल्यास योगायोग समजा . ] ;-)
वर्गीकरण
झकास्स्स्
हा प्रतिसाद सहजकाकांना सादर समर्पित
आईशप्पथ.
कथा छानच
छान
येकदम
मस्त हो
वा!
हात
धन्यवाद
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
ऑं?
In reply to मस्त by नंदन
+१
In reply to मस्त by नंदन
हेच
अपेक्षाभंग
छान
त्रोटक...
वा!!!
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
आले
मस्त कथा
लै भारी
हॅलोविनची लागण
रात्री टिव्ही पाहणारी फॅमिली आवडली.
मस्त!
सहज
काय सहजराव?