खूपच सविस्तर लेख लिहीला आहेत. सवडीने संपूर्ण वाचते. भाषांतराबद्दल धन्यवाद.
काही शंका:
वातावरणाच्या आणि पृथ्वीच्या संदर्भात शून्य अंश केल्व्हीनचा उल्लेख का केलात ते कळलं नाही.
.. हे तप्त वायू मग कमी तापमानावरील विश्वाकडे ह्या उष्णतेस प्रेरित करतात.
बाहेरच्या विश्वाकडे म्हणण्यापेक्षा पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर हे जास्त संयुक्तीक ठरेल का? विश्व या शब्दामुळे थोडी दिशाभूल होत आहे असं वाटत आहे.
प्रेरित हा शब्द रेडीएट यासाठी वापरला आहे का?
अदिती
वातावरणाच्या आणि पृथ्वीच्या संदर्भात शून्य अंश केल्व्हीनचा उल्लेख का केलात ते कळलं नाही.>>
ऊर्जेवरच तर आपले जीवन अवलंबून आहे. निखळ शून्य तापमानाखाली ऊर्जेअभावी सारेच पदार्थ घनरूप होऊन जीवन संपुष्टात येते. मग हा सारासार विचार करण्याची मुळी आवश्यकताच उरणार नाही.
मात्र मुळात तसे का लिहीले आहे हे लेखकालाच विचारेन.
मी तर केवळ भाषांतरकार.
मेघ सिंधूचे पाणी वाहे, परि जग तयातेची पाहे ,
का उमपते नोहे ठाकते कोण्हा
.. हे तप्त वायू मग कमी तापमानावरील विश्वाकडे ह्या उष्णतेस प्रेरित करतात. बाहेरच्या विश्वाकडे म्हणण्यापेक्षा पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर हे जास्त संयुक्तीक ठरेल का? विश्व या शब्दामुळे थोडी दिशाभूल होत आहे असं वाटत आहे.>>
हो. तसेच आहे ते. universe = विश्व या अर्थाने तो शब्द वापरला आहे.
प्रेरित हा शब्द रेडीएट यासाठी वापरला आहे का? >>
हो. radiation=प्रारण.
मस्त आणि महत्वपुर्ण माहिती आपण ह्या लेखाद्वारे दिलीत
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
कोतवालसाहेब, प्रतिसादाखातर धन्यवाद!
अदितीचेही सौजन्याखातर धन्यवाद.
आजच विश्व पर्यावरण परिषदेत भारताच्या युगरत्ना श्रीवास्तव या मुलीने या विषयावर केलेले भाषण गाजत आहे. तेव्हा हा लेख योग्य वेळीच प्रकाशित झाला आहे असे दिसते.
प्रतिक्रिया
खूपच
अदिती, प्रतिसादाखातर धन्यवाद!
झकास आहे आपला लेख
कोतवालसाहेब, प्रतिसादाखातर धन्यवाद!