✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिलगलेल्या कविता

स
सुनिल पाटकर यांनी
Sat, 09/19/2009 - 21:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23210 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

लेखन

प्राजु
Sat, 09/19/2009 - 21:45 नवीन
लेखन आवडले. मला ती भुई नळ्यांचे झाड फुलांचे भिडे निळ्या आभाळी रे आली फुलवित हासत..... **वित लक्षदिप दिपवाळी रे जमला मेळा गोपाळांचा धुमधडाका फटाकड्यांचा दिव्या दिव्यांची राग शोभते सुंदर निळ्या आभाळी रे.. इतकीच आठवते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मला वसंत

युयुत्सु
Sat, 09/19/2009 - 21:45 नवीन
मला वसंत बापटांची "दख्खन राणीच्या कुशीत पोटात, शेकडो पिले ही चालली खुषीत" ही कविता हवी आहे. ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------
  • Log in or register to post comments

फुलपांखरु

बाकरवडी
Sat, 09/19/2009 - 21:48 नवीन
फुलपांखरु I छान किती दिसते I फुलपांखरु I
या कवितेचे रिमिक्सही झाले आहे. मस्त कविता आहे. शाळेत असताना फेमस हिंदी सिनेमांतील गाण्यांच्या चाली लावत असू. कणा या कवितेला लावलेली रेमिक्स चाल अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. याचबरोबर माझ्या पाठच्या बहीणी तुझ्या संगती सोबती....,या बाळांनो या रे या... ह्या कविता कायम लक्षात राहणार्‍या ! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

मला

अनामिक
Sat, 09/19/2009 - 21:49 नवीन
मला आम्हाला ४थीत एक कविता होती ती नेहमी आठवते... घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाग जणू उभा काढून फणा निळी निळी परडी कोणी केली पालथी पाने फुले सांडली वरती आणि खालती.... एवढीच आठवते.... कुणाला पूर्ण येत असेल तर लिहा... -अनामिक
  • Log in or register to post comments

यातलं एक

भोचक
Sat, 09/19/2009 - 22:46 नवीन
यातलं एक कडवं आठवतंय. भिऊ नका कोणी पाखरांची गाणी सोबतीला गात गात खळाळत पाणी (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

घाटातली वाट

सुनिल पाटकर
Mon, 09/21/2009 - 22:44 नवीन
सरिता पदकी यांची ही कविता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

आदिमाया

क्रान्ति
Sat, 09/19/2009 - 22:43 नवीन
लेख तर मस्तच, पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं.:) बहिणाबाई चौधरी यांची "आदिमाया" ही कविता तशी मला शाळेत वगैरे कधीच नव्हती, पण बाबांच्या संग्रहातल्या पत्रं पुष्पम् या संपादित काव्यसंग्रहातली ही कविता बाबांनी सहजच कधीतरी नवरात्रात ऐकवली होती, ती अजूनही मनात जपून ठेवली आहे [आणि अर्थातच लिहून पण ठेवली, म्हणून पूर्ण टंकता आली!] आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी ? बारा गाडे काजळ कुंकू पुरलं नाही लेनं साती समुदराचं पानी झालं नही न्हानं धरतीवरलं चांदीसोनं डागीन्याची लूट आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं इडापिडा संकटाले देल्हा तूने टाया झाल्या तुह्या गयामंधी नरोंडाच्या माया बरह्मा इस्नू रुद्रबाळ खेळईले वटी कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटी नशीबाचे नऊ गिर्‍हे काय तुझ्या लेखी ? गिर्‍ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ? नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी दहाव्याशी खाईन तेव्हा कुठे राहिन सृष्टी क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

मला आठवते ती कविता

मनीषा
Sat, 09/19/2009 - 23:10 नवीन
बहुतेक ग दि मां ची आहे . निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गावं जगात मी मिरवितो त्याचे लावोनिया नाव | पुलं ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा घरी आणेल सरळ जरी दिसला वा़कडा | पहा तेथून खालती साळ वाकते सोन्यात बघलचं जेवताना कुंकु प्रत्येक दाण्यात | माणसांच्या जागी साठी दाटी करितात माड गर्द मधेच एखादे आंब्या फणसाचे झाड | असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे काळोखात कोणीतरी ज्योत घेऊन आलेले | (यातली मधली दोन - तीन कडवी आठवत नाहीयेत)
  • Log in or register to post comments

बहुतेक

सहज
Sun, 09/20/2009 - 06:10 नवीन
बा. भ. बोरकरांची आहे असे वाटते. चांगला धागा, प्रतिसाद वाचायला मजा येते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

बरोबर.

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 16:54 नवीन
बरोबर. बोरकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

फार सुंदर धागा

मुक्तसुनीत
Sat, 09/19/2009 - 23:47 नवीन
अनेक दिवसानी इथे आलो तो हा धागा पाहिला. एकेक प्रतिसाद वाचून सुखावतो आहे. मंडळी, अजून पुष्कळ कविता येऊ द्यात. आणि हो , दख्खन राणी कविता मला सुद्धा हवी आहे. (बापट सरांची आहे म्हणूनच नव्हे फक्त ! ;-) ) देता का कुणी ?
  • Log in or register to post comments

वरची कविता वाचून

लवंगी
Sat, 09/19/2009 - 23:48 नवीन
वरची कविता वाचून खूप आठवणी जाग्या झाल्या.. :) माझा भावाला फुलपाखरू म्हणताच यायच नाहि लहान असताना.. तो हि कविता अशी म्हणायचा छान किती दिसते I फुलकाफुलु I =)) आम्हि त्याला फुलकाफुलू च चिडवायचो..
  • Log in or register to post comments

गुपीत...

गणपा
Sun, 09/20/2009 - 02:40 नवीन
जेव्हा हे गुपीत माझ्या कन्येला समजल तेव्हा पासुन ती पण मला फुलकाफुलु च चिडवते. :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

अतिसुंदर!

एकलव्य
Sun, 09/20/2009 - 04:47 नवीन
या वेलीवर I फूलांबरोबर गोड किती हसते I फुलपांखरु I सुनिलराव - या सुंदर लिखाणाबद्दल आपले आणि इतर प्रतिसादकांचेही मनापासून आभार!
  • Log in or register to post comments

कविता

मीनल
Sun, 09/20/2009 - 05:45 नवीन
१]येरे येरे पावसा, तुला देतो पैसा २]श्रावणमासी हर्ष मानसी या आठवल्या. मीनल.
  • Log in or register to post comments

माझी आजी

घाटावरचे भट
Sun, 09/20/2009 - 06:12 नवीन
माझी आजी मला लहानपणी एक कविता म्हणून झोपवीत असे. छान पीलू रागातली चाल होती त्याची. 'चहूबाजूंनी राघू मोर बसवीले, पाळण्यात बाळ रंगीत निजवीले' असे काहीतरी शब्द आहेत. फारच छान म्हणते माझी आजी ते. माझं ऑल टाईम फेवरेट...
  • Log in or register to post comments

ते गाण

मीनल
Sun, 09/20/2009 - 06:41 नवीन
ते गाण अस आहे- नीज नीज बाळा रे झोके देते आई, करी बाळा जो जो गाई. सुतार उत्तमसा तुजसाठी आणविला पाळणा रंगित बनविला चहुबाजूनिया राघु मोर बसविले पाळण्यात बाळ निजवीले खडबड ते उंदिर करती कण शोधाया ते फिरती परी अंती निराश होती जातिल हे सोडूनिया सदनाला गणगोत जसे आपणाला हे गाण मी माझ्या मुलाला झोपवताना म्हणत असे. माझे बाबा म्हणायचे फक्त पहिल कडव म्हण. दुसर दारिद्र्य दाखवणार कडव कशाला म्हणायच? पण मुलाला समजायला लागल्यावर तो मला सांगायचा, "आई हदबद ( म्हणजे खडबड ऊंदिर) म्हन. मी भोपतो." मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

मीनलतै

घाटावरचे भट
Sun, 09/20/2009 - 13:31 नवीन
खूप खूप धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

दुसरे कडवे

मिसळभोक्ता
Mon, 09/21/2009 - 23:13 नवीन
खडबड ते उंदिर करती कण शोधाया ते फिरती परी अंती निराश होती जातिल हे सोडूनिया सदनाला गणगोत जसे आपणाला हे कडवे अत्यंत जीवघेणे आहे. पण हाच तर कवितेचा गाभा आहे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

+ १ एकदम अचूक!

चतुरंग
Mon, 09/21/2009 - 23:53 नवीन
ही नुसती दारिद्र्याची जाणीव नाही तर परिस्थितीचा वेध आहे. गरीबी ही वाईट असते पण ती अनेक गोष्टी शिकवते ज्या एरवी शिकायला मिळणे अवघडच. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

मी

सुबक ठेंगणी
Tue, 09/22/2009 - 05:08 नवीन
ह्या कवितेचं वेगळं version आज्जीकडून ऐकलं आहे. बा नीज गडे नीज गडे लडिवाळा नीज नीज माझ्या बाळा रवि गेला रे सोडुनि आकाशाला धन जैसे दुर्भाग्याला... मधल्या ओळी मला आठवत नाहीत. पण नंतर खुडबुड हे उंदिर करिती... हे कडवं ती म्हणायची ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हेच मी

लवंगी
Tue, 09/22/2009 - 06:38 नवीन
हेच मी माझ्या आजीकडून ऐकलेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

+१

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 09/22/2009 - 13:33 नवीन
असेच म्हणते. अजुन एक्,गायी गुरे हंबरली पैंजणे हरीची वाजली. हिच पावले माझ्या हरीची खुण असे ती हंबरण्याची झरझर नयनापुढुनी प्रतिमा ही सरली. असंही काहिसं होतं गाणं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

मीनल-जी,

शाहरुख
Wed, 09/23/2009 - 00:04 नवीन
मीनल-जी, सुबक ठेंगणी-जी,भाग्यश्री कुलकर्णी-जी, अंगाईगीताचे शब्द दिल्याबद्दल आपले शतशः आभार.. घाटावरचे भट-जी, प्रश्न विचारल्याबद्दल आपले शतशः आभार.. सुनिल पाटकर-जी, धागा सुरू केल्याबद्दल आपले शतशः आभार.. विसोबा खेचर-जी, मिपा सुरू केल्याबद्दल आपले शतशः आभार.. - शाहरुख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री कुलकर्णी

माझी आईपण

अनामिक
Tue, 09/22/2009 - 17:15 नवीन
माझी आईपण हिच अंगाई गायची! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

माझी फेवरेट...

सुबक ठेंगणी
Sun, 09/20/2009 - 06:40 नवीन
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी हळु थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमतगमत वा कधी भरारी घेत वेळूंच्या कुंजी वाजवुनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगूज मला एवढीच आठवते. पुढे अजून आहे का? आणि ह्या कवितेचे कवी मात्र मला आठवत नाहीत? कुणाला आठवतंय का?
  • Log in or register to post comments

७ वीत

sujay
Sun, 09/20/2009 - 06:43 नवीन
७ वीत आम्हाला ईंग्लीशला रवींद्रनाथांची गीतांजली मधली - where the mind is without fear and the head is held high where knowledge is free into that heaven of freedom my father let my country awake ही कवीता होती आणी मला ही भयंकर आवडायची , मी हीला सुंदर चाल लावली होती , म्हणून आज ही पाठ आहे. माझी सगळ्यात जवळची कवीता म्हणजे माझी आजी मला गायची ते अंगाई गीत- करी अंगाई सुखे राजसा बाळा निज रे निज लडीवाळा तु आवडता बाबांचा तुज वरी जीव आईचा लाडका असशी सकळांचा निज रे निज लडीवाळा का कुणास ठाउक पण जेंव्हा जेंव्हा आजी "तु आवडता बाबांच" वर यायची तेव्हा तेव्हा माझे डोळे नकळत भरायचे. अजूनही कधी मुड आला तर मी आजीला हे गायला सांगतो आणी अजूनही डोळे भरून येतात. मनाच्या कोपय्रात कुठेतरी अजून बालपण जीवंत आहे ह्याचा समाधान आहे. सुनीलशेठ ईतक्या जुन्या आठवणी ताज्या करणारा धागा चालु केल्या बद्दल आभारी आहे. (nostalgic)सुजय मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?
  • Log in or register to post comments

खूप छान

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 17:18 नवीन
खूप छान धागा! मला टपटप टपटप टाकित टापा नावाच बालगीत फार आवडायच.
  • Log in or register to post comments

हे घ्या ते गीत

चतुरंग
Sun, 09/20/2009 - 17:22 नवीन
टपटप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा ॥ उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी आपुली मान मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा ॥ घोडा माझा घाली रिंगण, उखडून टाकी सारे अंगण काही त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा ॥ घोडा माझा फ़ार हुशार, पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबूक ओढा ॥ चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

धन्यू

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 17:41 नवीन
धन्यू चतुरंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हे माझ खूप आवडत गाणं

लवंगी
Sun, 09/20/2009 - 17:38 नवीन
माझ खूप आवडत गाणं टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा टप टप टप टप उंच उभरी दोन्हि कान, ऐटित वळवी मागेच मान मध्येच केंव्हा दुडकत दुडकत, चाले थोडा थोडा पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा टप टप टप टप घोडा माझा फार हुशार, पाठिवर मी होतो स्वार नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबूक ओढा पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा टप टप टप टप पाच अरण्ये समुद्र सात, ओलांडील हा एक दमात आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा टप टप टप टप लहानपणी बाबांच्या पाठिवर स्वार होऊन हे गाण म्हणायला खूप मजा यायची .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

धन्यवाद

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 17:46 नवीन
धन्यवाद पूर्ण गाण्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

मस्त

नंदन
Sun, 09/20/2009 - 17:46 नवीन
धागा. 'शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा'* आणि क्रमिक पुस्तकांतली पहिलीतली चिमणीच्या घरट्याची (गरीब बिचार्‍या चिमणीला सगळे टपले छळण्याला...) आणि चौथीतली 'आज ये अंगणा पाहुणा गोजिरा' ही राजा मंगळवेढेकरांची वृक्षारोपणावरची 'पाहुणा' ही कविता - या अजून आठवतात. *या कवितेचे आंतरजालीय विडंबन फर्मास होईल. काय म्हणता रंगराव? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

एक गाणं खूप आवडायच

लवंगी
Sun, 09/20/2009 - 17:50 नवीन
आई मला छोटिशी बंदुक दे ना, बंदुक घेइन, शीपाई होईन, शत्रूला मारीन ठो ठो ठो.. असे काहिसे बोल होते.. कुणाला आठवतेय का?
  • Log in or register to post comments

सासूबाईंच्या पाठ्यपुस्तकातील कविता

बहुगुणी
Sun, 09/20/2009 - 18:59 नवीन
हा मजेशीर धागा पाहून आमच्या सासूबाईंनाही त्यांच्या शाळेतील काही कविता आठवल्या, त्यांपैकी ३ इथे देतोय, कडव्यांचा क्रम उलटसुलट झाला असण्याची शक्यता आहे: १. रा. ग. गडकरींची खालील कविता सुंदर खाश्या प्रभात काळी चहू कडे ही फुले उमलली बाग हासते वाटे सगळी शीतल वारा या जलधारा कारंज्याच्या छान थांब जरासा बाळ ..... अशा तुला मग बागडतांना भरभर वार्‍यावर फिरतांना माझे मग ते फूल कोणते कसे ओळखू सांग (.....मधली तीन कडवी आठव्ली नाहीत.) २. दुसरी कविता 'श्रेष्ठ कोण' या सारखी काहीतरी होती असे त्या सांगतात - वाटते मजला की व्हावे ईंजिनवाला भकभक करीत इंजिन चाले त्याच्या मागे डबे चालले या सर्वांचा राजा मी इंजिनवाला पहा शिंपीदादा पहा बैसला शिवायास कपडे कोट तुमानी झरझर शिवतो जोडुनिया तुकडे या सर्वांचा राजा मी शिंपीदादा पहा शेतकरी हा पहा चालला नांगर घेऊन बैल इमानी जाती पुढती आपण होऊन या सर्वांचा राजा मी शेतकरी तो पहा ............ ३. चिलीम नाही माहित डामडौल अगदी साधी सुधी वागली नेसायास दिले जुने चिर तरी नाही असंतोषही ल्याली भूषण एकही न रिझली सेवून पाने सुकी हां हां हरवली चिमा प्रियतमा माझ्या जीवाची सखी या कवितेवर 'चिमा कोण?' असा प्रश्न परीक्षेत यायचा म्हणे. [By the way, कुणाला बालभारती प्रकाशनाची पहिली सुमनमाला कधी निघाली, ते माहीत आहे काय? त्या प्रकाशनातील चौथी व पाचवी या इयत्तांची पुस्तके कुणाकडे मिळू शकेल काय? पुण्यात गणेशखिंडीतील बालभारतीच्या कार्यालयात काही माहिती मिळू शकली नाही.]
  • Log in or register to post comments

तबकात राहिल्या देठ लवंगा साली

युयुत्सु
Mon, 09/21/2009 - 07:23 नवीन
"तबकात राहिल्या देठ लवंगा साली" ही कविता बहूधा गदिमांची असावी. ती मला हवी आहे. माझ्या आईकडून ऐकायला मिळाली आहे. आईचे पाठांतर अफाट होते पण कधी कविता/श्लोक मला लिहून दिल्या नाहीत. मूळ पुस्तक मिळवून वाच असे सांगायची. त्यामूळे ही कविता पूर्ण पणे कधी माझ्यापर्यंत पोचली नाही. ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------
  • Log in or register to post comments

जोगिया

नंदन
Mon, 09/21/2009 - 07:27 नवीन
या दुव्यावर मिळेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

धन्यवाद...

युयुत्सु
Mon, 09/21/2009 - 08:18 नवीन
धन्यवाद... खूप वर्ष चालू असलेला शोध आज संपला. ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बघा

सहज
Mon, 09/21/2009 - 09:14 नवीन
नंदनशी ओळख असले की झाले का हे देखील शनिचे फळ ;-) सॉरी रहावले नाही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

जोगिया

क्रान्ति
Mon, 09/21/2009 - 08:39 नवीन
गदिमांचं हे काव्य अप्रतिम आहेच, आणि गीत म्हणूनही ते काळजात रुतणारं आहे. फैयाज यांनी जीव ओतला आहे त्यात! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

कवीता...

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 09/21/2009 - 16:03 नवीन
आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतुतरी. कितवीत होती ती माहिती नाही. एक खंड्या पक्षाचीही होती.
  • Log in or register to post comments

अजूनही

अनामिक
Mon, 09/21/2009 - 18:35 नवीन
अजूनही काही आठवताहेत... खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला एका पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला __________ हिरवे हिरवे गार गालीचे हरीत तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय श्रूंखला (?) त्या भृलीला काही कळेना फुलराणीला.... ____________ संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा... यापुढे काय होतं ते आठवतच नाही... अजून एक होती त्यामधली एकच ओळ आठवते आहे.... "प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधे उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं..." तसेच.. काया मातीत मातीत तिफन चालते ही शेतकर्‍यावरची कवीता एकेकाळी पाठ होती... आता पहिल्या ओळीशिवाय काहीच आठवत नाही.... ह्या आणि अशा सुंदर कविता कुठे एका वेबसाईटवर संकलीत मिळतील का? -अनामिक
  • Log in or register to post comments

विठ्ठल वाघ

मिसळभोक्ता
Mon, 09/21/2009 - 23:16 नवीन
काया मातीत मातीत तिफन चालते ही शेतकर्‍यावरची कवीता एकेकाळी पाठ होती... आता पहिल्या ओळीशिवाय काहीच आठवत नाही.... ही वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघांची प्रसिद्ध कविता आहे. कुठल्याशा सिनेमात गाणे म्ह्णून देखील अंतर्भूत आहे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अरे संसार संसार

महेश हतोळकर
Tue, 09/22/2009 - 15:21 नवीन
कुठल्याशा सिनेमात गाणे म्ह्णून देखील अंतर्भूत आहे. अरे संसार संसार मधे आहे हे गाणे. रंजना आणि कुलदीप पवार (नायीका - नायक) छान आहे हा सिनेमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

लाल टांगा

माधुरी दिक्षित
Mon, 09/21/2009 - 19:03 नवीन
लाल टांगा घेउन आला लाला टांगेवाला ऐका लाला गातो गाणे ललल्ला ललल्ला .................. लीला बसली टांग्यामधे टांगा सुरु झाला ......... पुढचे विसरले आहे आता :(
  • Log in or register to post comments

-छान धागा.

अश्विनीका
Mon, 09/21/2009 - 23:09 नवीन
-छान धागा. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मला पण खालील काही कविता / गाणी हवी आहेत. त्यांचे धृपद च आठवते . १) इंजिनदादा इंजिनदादा काय करता? डबे मी जोडतो, शिट्टि मी फुंकतो, गावाला जातो नव्या नव्या २) वळिवाचे ढग आले वरती धरती खाली आसुसली झाडासंगे वारा खेळे भिंगोर्‍या अन भातुकली - कवि रविन्द्र भट ३) झाड म्हणतं वारा दे , पाखरु म्हणतं चारा दे सृष्टी मधल्या चराचराला देवा , सौख्य निवारा दे ४)एक पिंजर्‍यातील पोपटाची दिनवाणी स्थिती वर्णन करणारी कविता होती. सुरवात अशी आहे - तोरणाच्या रमणीय चौकटीला.. अजून एक छान कविता पहिली च्या बालभारती पुस्तकात होती. तिच्या ही २ च ओळी आठवत आहेत केळीच्या बागा मामाच्या, हिरव्या घडांनी वाकायच्या अश्विनी
  • Log in or register to post comments

बेडूक

अश्विनीका
Mon, 09/21/2009 - 23:13 नवीन
१ली च्या बालभारती मधील पूर्ण आठवणारी एकमेव कविता - आभाळ वाजलं धडाम धुडूम वारा सुटला सूं सूं सूं वीज चमकली चक चक चक जिकडे तिकडे लख लख लख पाउस पडला धो धो धो पाणी वाहिले सो सो सो पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाउन बुडली बुडली बोटीवर बसला बे डू क तो ओरडला डराव डूक - अश्विनी
  • Log in or register to post comments

या घ्या आणखी दोन

बेसनलाडू
Tue, 09/22/2009 - 05:27 नवीन
(बहुदा) त्याच पाठ्यपुस्तकातील मला आठवणार्‍या (मी १लीत असताना घोकलेल्या नि आजही लक्षात राहिलेल्या) आणखी दोन कविता अशा - १. वेडं कोकरू - मंगेश पाडगावकर (??) वेडं कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भलतंच भ्यालं दमूनभागून झोपेला आलं शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड हसलं डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत (शहाणा)बेसनलाडू २. या कवितेचे नाव व कवी आठवत नाहीत :( गाडी आली गाडी आली झुक् झुक् झुक् शिटी कशी वाजे पहा कुक् कुक् कुक् तिकिटाचे पैसे काढा छन् छन् छन् गाडीची ही घंटा वाजे घण् घण् घण् इंजिनाचा धूर निघे भप् भप् भप् चाके पहा तपासुनी ठक् ठक् ठक् जाऊ नका आता कुठे दूर दूर दूर गाडी आता निघाली ही झुक् झुक् झुक् (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनीका

आणि मला आठवतो...

सुबक ठेंगणी
Tue, 09/22/2009 - 05:41 नवीन
वसंत बापटांचा श्याम. "आम्ही" नावाच्या पुस्तकातला. त्यातल्य ब-याचशा आठवतात पण पहिलीच आम्ही आमचं नाव श्याम... अंssss...शाम्या! बाबा म्हणतात सांगकाम्या मास्तर म्हणतात आळशी धोंडा कोण लागणार त्यांच्या तोंडा आई ठेवते आमचा मान राsssssजाsssss म्हणून धरते कान त्यातल्या त्यात छोटी बरी दादा म्हणते...सध्यातरी! :) दुसरी आमचे पाहुणे पाहुणे येतात कोण कुठले संपवून टाकतात भात पिठले आमच्यासाठी उरते खरवड आईची तर नेहमीच परवड मधलं आठवत नाही... नाव काय तुझं सांग पाहू बाळा कितवीत शिकतोस कुठे आहे शाळा पाहुण्यांपाशी नसते छत्री त्यांची बेबी असते मुत्री... शेवटचा शब्द मी कवितेत पहिल्यांदाच तेव्हा ऐकला! ;)
  • Log in or register to post comments

आणि..

पद्मश्री चित्रे
Tue, 09/22/2009 - 09:48 नवीन
आवडला धागा.. आठवणीतल्या कविता या पुस्तकाचे ४/५ भाग आहेत.. त्यात यातील बर्र्‍याच कविता आहेत. मला आठवलेल्या कविता- १. गाई पाण्यावर काय म्ह्णुनी आल्या... २. रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला ३.इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा