Skip to main content

भुभु गीत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 17/09/2009 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
भुभु लोक भानंदाने भरुन भाउ दे रे तुझे भीत भाण्यासाठी भुर लावु दे रे ॥धृ.॥ भुभ्र भुरे भाळुन भाल्या भिळ्या भिळ्या लाटा भानभुले भेवुन भजल्या या भिरव्या वाटा भ्या भुंदर भात्रेसाठी मला भाउ दे रे ॥१॥ भोर भेशरांचे भुलती पहाटेस भारी भर्‍यातुनी भिडदा भिडदा भाजती भतारी भोवळ्यात भौंदर्याच्या भुला भाहु दे रे ॥२॥ भ्रांत भ्रांत भुक्कडरात्री भंद भंद तारे भुभु प्रेम घेउन येती भंधभुंद वारे भांदण्यात भानंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥ एक एक भक्षत्राचा भिवा लागताना आणि भुले होण्यासाठी भळ्या जागताना भौर्णिमा भ्वरांची माझ्या तुला भाहु दे रे ॥४॥
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6737
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

भू भू...... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

परकाशशेठ वेळ जात नाही का? ह. घेणे.

भा भा ! भेकदम भस्त भ्रकाशराव! भुमची भ्रतिमा भेकदम भुललीय भी भविता भिहीताना! भुलेशू :) भिकास

भ्रांत भ्रांत भुक्कडरात्री भंद भंद तारे भुभु प्रेम घेउन येती भंधभुंद वारे भांदण्यात भानंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥ हे सही आहे. मोठ्याने म्हणून पाहायला फार मजा आली. आपला गुंडोपंत

कवितेत मधली अमूर्तता (abstractness) आता रसिकमान्य झाली आहे. पण घाटपाण्ड्यांनी विडंबनामध्ये अमूर्तता आणून मराठी विडंबनाला जी नवी दिशा दिली आहे त्याबद्द्ल त्यांचे कवतुक करावे तेवढे थोडेच आहे. विडंबनाचा हा नवा प्रकार "सहज विंडबन" अथवा "मुकत विंडबन" म्हणून काव्यरसिक स्वीकारतील अशी मी आशा करतो...

मजा आली कविता वाचताना. भुभुकाराचे निराळेच रूप पाहायला मिळाले. :) अजिंक्य.

हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

भह्ही भविता... =)) भाचुन भुटलो, भुटलो...भिंध्या-भिंध्या भालो ! =)) सस्नेह भिशाल ************************************************************* भाम्ही भिथेही भडीक भसतो "भैसी भक्षरे भेळविन!"

वा वा ! अश्शी कविता अख्या त्रिखंडात कोणी लिहीली नसेल. मस्तच . :B :B :B बाकरवडी :B :B :B

In reply to by बाकरवडी

असेच म्हणतो. आपला, (तीनदा डावीकडून आणि तीनदा उजवीकडून नर्डी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये.... ते विकत घ्यावं किंवा घरी उगवावं. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

भारविच्या किरातार्जुनीय या महाकाव्यात एक एकाक्षर श्लोक आहे तो आठवला - न नोननुन्नोनुन्नोनो नाना नाना ननाननु| नुन्नोनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननूत् || अर्थ विसरलो आहे. क्षम्स्व!

In reply to by युयुत्सु

उत्तम मंत्र . यातुन इष्टनकारापत्ती फलप्राप्ती घडते.नस्तित्वातुन अस्तित्वाकडे प्रवास चालू होतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by युयुत्सु

तनाना तनाना तनाना तनाना धीं S तनाना देरे ना, एक तेचि नाना, धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब नाना धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब नाना धिरधिर धीं तननननन धिरधिर धीं तननननन धितां ता धितां ता धितां ता धितां ता, ...... ('घाशिराम'मधील रविंद्र साठेंनी गायिलेला तराणा) तसेच 'नाना माउसकुरी' ह्या गायिकेचीही आठवण झाली.

गाण्यात एवढे भ???? भ चा भलताच कलात्मकतेने वापर केलेला आहे.

भकारगीताची भानामती भयंकर भावली! ;) भयतुरंग

( ओम भग भुगे भगिनी भागोदरे भग मासे ओम फट स्वाहा....) भप्रतिम.. ! तात्या विन्चूचा दुसरा भाग येतोय, त्यात द्या हे गाणे.. ! :)

काय म्हणाव तरी काय आता? मीनल.