मात्र रात्रीची गोष्ट भाग ४
लेखनप्रकार
मात्र रात्रीची गोष्ट भाग ३
*********
स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.
(तिसरा पेग होवुन गेला आहे, अवांतर चर्चा सुरू आहे अशी स्वप्नावस्था.... अशातच पेग ४ आगमन)
मी - काल फिरत फिरत त्या पेठेत गेलो होतो..
तो- हं... दिवाळीची जोरदार तयारी चालु आहे सध्या तिथे
मी - आपला तो भेटला होता... तिकडेच खरेदी करणार आहे या वेळेस दिवाळीची
तो - हं.. इथली रंगीत कापडं त्याला आवडत नाहीत, डिसेंन्सी नसते म्हणे... घालता येत नाही, अंगात बसत नाही हे सांगत नाही
मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? पण तो का पुढे पुढे करायला लागला हल्ली..
तो - हल्ली ? दे सोडुन, जुनेच आहे ते हाडुक चघळणारं आणि तो अगदी शेम टु शेम. फक्त याला भाद्रपदाची वाट पहावी लागत नाही
मी -हॅ हॅ हॅ ...
तो - मग तु काही खरेदी करणार की नाही...
मी - अरे अजुन काही ठरवले नाही, तशी आपली पेठ काय... राजाच्या घरी रोज दिवाळी
तो - ते पण खरेच पण मग मला समजत नाही आपल्या पेठेतले दुकानदार बावचळले का?
मी - म्हणजे?
तो - अरे ! आपली पेठ येवढी सजलेली असतांना, वेगवेगळी दुकाने मांडलेली असतांना, गि-हाइकी चालु असतांना, सेल्स प्रमोशनच्या नावाखाली सँम्पल्स वाटायला त्या पेठेत कशाला जातात?
मी - अरे पण... धंदा वाढायला नको का?
तो- वेडाच आहेस. अरे इथे माल पुरवता पुरवता नाकात दम येतो. इथली पेठ सगळ्यात जास्त टर्नओव्हरची आहे. इथेच धंदा नीट करायचा सोडुन तिथे जाहिराती कशाला ?
मी - सांगणार कोण या दुकानदारांना.....
तो - वर तिथल्या तथाकथित फुकट्यांची बोलणी ऐकायची, आम्ही माल मागवलाच नव्हता, तुम्ही कशाला पाठवला. तुमच्या पेठेत तुम्ही गळ्यातच मारत असाल.. वगैरे वगैरे...
मी - काय काय ?
तो - तर... मग बसले गप्प मुंडी खाली घालुन
मी - हम्म. च्यायचा घो... इथल्या पेठेत गि-हाइकाशी बोलणार नाही... वसकन अंगावर येतात.. माल घ्यायचा तर घ्या नाही तर फुटा
तो - गरज आपल्याला आहे ना म्हणुन सेलर्स मार्केट आहे आपली पेठ
मी - हं..बदलेल का रे कधी?
तो - कशाला? आहे ते ठीक आहे..
(पेग ४ समाप्त)
मी - म्हणजे हे असेच चालु रहाणार
तो - हम्म.. हे असेच चालु रहाणार.. तोवर आपलं चालु ठेवु...
मी - मग काय...करा रिपीट..
तो - येस्स रिपीट.
(भाग ४ समाप्त)
वाचने
3798
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
:)
सेल्स
In reply to सेल्स by श्रावण मोडक
ते
पुढे
लवकर भरा
दोघांच्या
रिपीट !
In reply to रिपीट ! by अवलिया
का भोऊ
In reply to का भोऊ by दशानन
नियम विसरु