Skip to main content

एका लग्नाची गोष्ट

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 10/09/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांत :"मी आणी प्रियाने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय" मी:"काय???" सुशः "हो..आणी तुला साक्षीदार म्हणून यायचय." मी: "बरं बाबा...मी करेन तुला हवी ती मदत.." अशा रितीने चालू झाली एका लग्नाची गोष्ट.गोष्ट आहे माझा मित्र सुशांत आणी त्याची प्रेयसी प्रिया यांच्या लग्नाची. सुशांतने प्रियाला सेकंड ईयर मधे प्रपोज केलेलं...तिचा होकार आला लाष्ट ईयरला. सुशांत माझा ईंजिनियरींगच्या पहिल्या दिवशी झालेला मित्र...आणी आम्ही जिवलग मित्र कधी झालो ते समजलंच नाही आम्हाला..नुकतीच त्याला ४ महिन्यांपूर्वीच नोकरी लागलेली. प्रिया त्याच्याच सोसायटीत राहणारी.१ वर्षापूर्वी ती 'हो' म्हणाल्यापासून दोघांच सुरळीत चाल्लेलं. पण एक मोठा झोल झाला....प्रिया सुशांत पेक्षा १.५ वर्षाने मोठी...सो तिच्या घरच्यांनी तिच्याकरता स्थळं बघायला सुरुवात केलेली. परिस्थीती काय तर..आमच्या बापड्याला नोकरीला लागून चारच महिने झालेले..पुण्यात स्वत:च घर पण नाही...शिक्षण काकांकडे राहून घेतलेलं. आणी सगळ्यात मोठा अडसर म्हणजे...मुलगी मराठा आणी मुलगा ब्राम्हण.घरचे कसे तयार होणार???? असाच एक दिवस सुशांत चा मला फोन आला. "काय करोयस?? वेळ असेल तर पटकन एक तासात ए बी सी(अप्पा बळवंत चौक) मधे ये." ए बी सी मधे आम्ही भेटलो, तर म्हणाला की प्रियाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी चालू केलीय..ती पण त्यांना आता थोपवू शकत नाहिये..मी ३०-४० हजार वाचवलेत...थोडे ऊधार घेउ (अस्मादीक तेंव्हा बेकार होते.. ह्यांचं लग्न लावलं त्याच्या पुण्याईवर ह्यांच्या लग्नाच्या १ महिना आत नोकरीला लागलो) मी: बरं , आता काय कराचयं?? क्रमशः (माफी : आज टंकायला जास्त वेळ नसल्याने एव्हढचं...क्षमा असावी .पुढील सगळे भाग मोठे टाकायचा प्रयत्न करीन.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7205
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हं (माफी : आज टंकायला जास्त वेळ नसल्याने एव्हढचं...क्षमा असावी .पुढील प्रतिसाद मोठे टाकायचा प्रयत्न करीन.) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

या यॉर्करने क्लीन बोल्ड झालो

पूर्ण लिहून झाल्यावर प्रतिसाद टंकतो.

In reply to by श्रावण मोडक

+१

In reply to by सखाराम_गटणे™

(आळशी) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

पुढचं लिहा लवकर. प्रतिसाद होल्ड वर ठेवला आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by श्रावण मोडक

डिट्टो

लिही रे बाबा लवकर पुढचा आणि शेवटचा भाग ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वाचते आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे. रेवती

त्रोटक!! इतक्यातच कंटाळलात का? अशा वेगाने गोष्ट लिहिलित तर त्या प्रिया आणि सुशांतच्या मुलांच्या लग्नापर्यंत नक्की पूर्ण होईल. ;) लवकर लिहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

"कहाणी घर घर की" किंवा "क्यों की .... " लिहायचा विचार करतोय का बे मेल्या? एवढांच कंटाळा असेल तर तुला काही क्लुप्त्या देतो .. जमतंय का ते पहा ... युयुत्सु स्टाईल मधे ४-५ शब्द लिहून झाले की नविन ओळीवर लिहायला सुरू कर .. किंवा तेच तेच वेगवेगळ्या अँगलनं कॉपी पेस्ट करून टाक .. इंजिनियरींग ला करायचास नं तस्सं !! बाकी पुढचे भाग असले फुसके आले तर आपली उघड उघड तासली जाईल ह्याची णोंद घ्यावी प्रभो साहेब ! घाई असेल तर सेव्ह करा कुठे तरी .. गुगलने एवढे पैसे खर्च करून ड्राफ्ट सेव्ह करण्याची सोय उपलब्ध केली आहे .. त्याचा वापर करा ! आणि हो .. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होत चाल्लाय म्हणून थांबतो बापडा .. - जंबो