एका लग्नाची गोष्ट
लेखनप्रकार
सुशांत :"मी आणी प्रियाने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय"
मी:"काय???"
सुशः "हो..आणी तुला साक्षीदार म्हणून यायचय."
मी: "बरं बाबा...मी करेन तुला हवी ती मदत.."
अशा रितीने चालू झाली एका लग्नाची गोष्ट.गोष्ट आहे माझा मित्र सुशांत आणी त्याची प्रेयसी प्रिया यांच्या लग्नाची.
सुशांतने प्रियाला सेकंड ईयर मधे प्रपोज केलेलं...तिचा होकार आला लाष्ट ईयरला.
सुशांत माझा ईंजिनियरींगच्या पहिल्या दिवशी झालेला मित्र...आणी आम्ही जिवलग मित्र कधी झालो ते समजलंच नाही आम्हाला..नुकतीच त्याला ४ महिन्यांपूर्वीच नोकरी लागलेली.
प्रिया त्याच्याच सोसायटीत राहणारी.१ वर्षापूर्वी ती 'हो' म्हणाल्यापासून दोघांच सुरळीत चाल्लेलं.
पण एक मोठा झोल झाला....प्रिया सुशांत पेक्षा १.५ वर्षाने मोठी...सो तिच्या घरच्यांनी तिच्याकरता स्थळं बघायला सुरुवात केलेली.
परिस्थीती काय तर..आमच्या बापड्याला नोकरीला लागून चारच महिने झालेले..पुण्यात स्वत:च घर पण नाही...शिक्षण काकांकडे राहून घेतलेलं. आणी सगळ्यात मोठा अडसर म्हणजे...मुलगी मराठा आणी मुलगा ब्राम्हण.घरचे कसे तयार होणार????
असाच एक दिवस सुशांत चा मला फोन आला.
"काय करोयस?? वेळ असेल तर पटकन एक तासात ए बी सी(अप्पा बळवंत चौक) मधे ये."
ए बी सी मधे आम्ही भेटलो, तर म्हणाला की प्रियाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी चालू केलीय..ती पण त्यांना आता थोपवू शकत नाहिये..मी ३०-४० हजार वाचवलेत...थोडे ऊधार घेउ (अस्मादीक तेंव्हा बेकार होते.. ह्यांचं लग्न लावलं त्याच्या पुण्याईवर ह्यांच्या लग्नाच्या १ महिना आत नोकरीला लागलो)
मी: बरं , आता काय कराचयं??
क्रमशः
(माफी : आज टंकायला जास्त वेळ नसल्याने एव्हढचं...क्षमा असावी .पुढील सगळे भाग मोठे टाकायचा प्रयत्न करीन.)
वाचन
7200
प्रतिक्रिया
0