Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विमुक्त on Fri, 09/04/2009 - 10:08
  • Log in or register to post comments
  • 3707 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रमोद देव on Fri, 09/04/2009 - 10:21

Permalink

पळा पळा कोण पुढे तो!

तुमच्या पळण्याला माझ्या शुभेच्छा! विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 09/04/2009 - 10:25

Permalink

अल्ट्रा मॅरेथॉनर

२८ मे २००९ ला एका अल्ट्रामॅरेथॉनरला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. सराव रहावा म्हणून आख्खा विकांत धावण्यात जातो असे कळले एकंदर १०० ते १५० किमी पळतात, सलग नाही पण दोन मॅरेथॉन किंवा जास्त एका दमात पळू शकतात ऐकून माझे डोळे खोबणीतुन बाहेर आले होते, कपाळाला २ टेंगूळ! हॅट्स ऑफ!! तो दिवस व पुढचा विकांत नैराश्य आले होते पण विस्मरण व काळ हेच औषध खरे!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 09/05/2009 - 17:55

In reply to अल्ट्रा मॅरेथॉनर by सहज

Permalink

हे सगळे

हे सगळे अचाट प्रकार वाचून आमचेही असेच झाले... 8| _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 09/04/2009 - 10:38

Permalink

मस्त

डायॅनचे उदाहरण वाचून 'फॉरेस्ट गम्प' आठवला. बाकी दूरचे अंतर नियमितपणे धावणार्‍यांना 'सेकंड ब्रेथ्' नावाच्या एका अवस्थेचा अनुभव येतो (असं ऐकून आहे), ज्यात एकदा शरीराला धावण्याची लय सापडली की न थकता/श्रम न जाणवता मैलोनगणती माणूस सहज धावू शकतो. पुणे मॅरॅथॉनसाठी हार्दिक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by विमुक्त on Fri, 09/04/2009 - 14:41

In reply to मस्त by नंदन

Permalink

'सेकंड

'सेकंड ब्रेथ्' बद्दल माहीती नाही... पण जर रेगुलर पळणारे असाल तर पहिले काही कि.मी. अंतर पळताना थोडा दम लागतो, पण तरी पळत राहिलो तर विषेश दम लागत नाही... मस्त rhythm मधे चालू असतं... मग शरीराच्या ऐवजी मनावर असतं सगळं....
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 09/04/2009 - 22:19

In reply to 'सेकंड by विमुक्त

Permalink

हाच सेकंड ब्रेथ

साधारण १५ मिनिटे झाल्यावरती एक वेगळाच रिदम येतो, श्वास धापा टाकल्यासारखा न येता सुरळित घेतला जातो. आणि मग तासभरही धावत राहाता येते, असा माझा अनुभव आहे. माझ्या मते, यालाच सेकंड ब्रेथ म्हणतात. अल्ट्रामॅरॅथॉनर म्हणजे मनुष्यप्राण्यांची वेगळीच जात होय! लेख छान लिहिला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 09/04/2009 - 11:32

Permalink

अरे वा..

छान माहिती, मॅरेथॉन पूर्ण धावणारा ६५ वर्षीय विडंमान, (त्याला आम्ही प्रेमाने मॅरेथॉन मान म्हणतो ) दरवर्षी एक मॅरेथॉन धावतो आणि गेले काही वर्ष तो आणि त्याचा जावई मॅरेथॉन धावतात. आमचा ख्रिसही दरवर्षी एक पूर्ण मॅरेथॉन आणि एक हाफ मॅरेथॉन धावतात. फ्राफु मॅरेथॉनमध्ये हे लोकं धावले तर चीअर अप करायला सगळे मित्र आमच्याकडे जमतात आणि नंतर संध्याकाळी मैफल जमते आणि रात्री कधीतरी मंडळी घरला जातात. स्वाती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 09/04/2009 - 15:00

Permalink

छान

छान लेख... मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 09/04/2009 - 21:55

Permalink

छान माहीती

छान माहीती दिलीत. एखादी गोष्ट मन लावून ऐकतेय असं वाटत होतं. आपल्याला मॅरेथॉनसाठी शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 09/05/2009 - 19:17

Permalink

अगदी वेगळी

अगदी वेगळी माणस आहेत ही सगळी. वाचून आपण किती पाण्यात आहोत ते समजले. ----------------------------------- "मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे." "ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Sat, 09/05/2009 - 21:14

Permalink

ओह्हो!

भन्नाट किस्से आहेत. यावरुन आठवलेला एक किस्सा:- एकदा मी मराठिच्या तासाला माझ्या लिखाणात काही शाब्दिक चूक केल्याचं सर म्हणाले. मी म्हटलं "कुठली बुवा? आणि वापरला एकाच्या ऐवजी दुसरा शब्द तर बिघडलं कुठं?" त्यांनी लागलिच उत्तर न देता दुसर्‍या दिवशी शाळेत मिनि मॅरेथॉन होती, चक्क तिथच मला स्पर्धक म्हणुन उभं केलं! चकित होउन म्हटलं " हे काय??" स्पर्धा सुरु झाली. लोकांनी धाव घेतली आणि(मी माझ्या आळशी स्वभावाला जागुन) आहे तिथच बसकण मारली. सर म्हणाले "हा आहे फरक! धाव घेणे आणि पळ काढणे ह्यात अंतर आहे. नक्कीच आहे. निदान वीसेक मैलांच!!" मी पळ काढला होता, विजेत्यानं धाव घेतली होती. दिसायला क्रिया थोड्याशा सारख्या पण सिम्यांटिक्स अगदि टोकाचं! बाकी, धावकांना,त्यांच्या जिद्दिला सलाम! आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by विमुक्त on Mon, 09/07/2009 - 10:17

In reply to ओह्हो! by मन

Permalink

आपण सुद्धा

आपण सुद्धा धाव घ्यायला हवी...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 09/05/2009 - 21:37

Permalink

अबब!

लेख वाचून होईतो मला सेकंड ब्रेथचा अनुभव यायला सुरुवात झाली होती! ;) डायने वॉन अफलातूनच व्यक्ती आहे! तिच्याबद्दल पहिल्यांदाच माहिती समजली. आपल्याला काय येत नाही ह्यापेक्षा आपल्याला काय येतं ह्यावर केंद्रित व्हा असाच संदेश जणू डायने देते आहे! मानवी शरीर हे किती अचाट प्रकार करु शकतं असं वाटत रहातं. आपण आपल्याला फारच जपून आणी फारच नाजूक करून ठेवतो की काय असंही वाटत रहातं. एका वेगळ्याच लेखाबद्दल धन्यवाद! तुमच्या पुणे मॅरॅथॉनला शुभेच्छा!! (ट्रेडमिलरनर)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विमुक्त on Mon, 09/07/2009 - 10:16

In reply to अबब! by चतुरंग

Permalink

अगदी खरं...

अगदी खरं... आपण जरा जास्तच जपून जगतो... पुढचा-मागचा खूपच विचार करतो... आणि risk नको, risk नको करत आयुष्य न जगण्याची केवढी मोठ्ठी risk घेतो... सारखं मन मारलं तर नंतर मन काही बोलतच नाही... बिंधास्त जगलं पाहीजे...
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Mon, 09/07/2009 - 11:19

Permalink

भन्नाट

भन्नाट किस्से आवडले... खूप छान आणि मनापासून लिहिलयं तुम्ही! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com