- १ -
वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या
-*-
- २ -
व्याकूळ दुपारची ऊन झुळूक
तहानेला करते त्राही त्राही
मिळता तोकडी तुझी चिठ्ठी
तळमळ होते लाही लाही
-*-
- ३ -
शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं
फारच दिलदार नाही वाटत?
शिलंगणाचं सोनं काही
दसऱ्यालाच नाही वाटत
-*-
- ४ -
परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
गतप्रेमाच्या पत्रामधले
अक्षर देखील दिसते गचाळ
-*-
(याचा कच्चा मसुदा "अप्रकाशित"वर टिचकी मारली असून मनोगतावर दिसतो आहे :-( दोन्ही ठिकाणी प्रकाशित करण्याचा हेतू नव्हता. अजूनतरी मनोगतावर कोणी प्रतिसाद दिलेला नाही, म्हणून कोणी कविता तिथे वाचली नसेल अशी आशा आहे.)| लेखनविषय: |
|---|
वाचने
21700
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
आवडल्या!
चारोळ्या आवडल्या !
अवांतर २
In reply to चारोळ्या आवडल्या ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडल्या
छान आहेत
शेवटची
हो
In reply to शेवटची by आजानुकर्ण
चार ऋतू
पटले!
In reply to चार ऋतू by धनंजय
अगदी तुम्ही म्हणता तसे नाही
In reply to पटले! by विकास
स्व-समीक्षण
In reply to चार ऋतू by धनंजय
हेच
In reply to स्व-समीक्षण by कोलबेर
आम्हाला
In reply to चार ऋतू by धनंजय
सुरेख
सुंदर..
अस्स होय
परवा पडलेला शुभ्र बर्फ
त्राहि त्राहि
सुरेख...
फारच मस्त !!
उत्तम..
सुरेख चारोळ्या!