घर ते माझे बालपणीचे
रंगबिरंगी आठवणीचे..
आईबाबांच्या पंखाखाली
मांडलेल्या भातुकलीचे..
प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी
वेल जुईची बहरली होती..
सैरवैर त्या अंगणी माझी
इवली पाऊले नाचली होती..
झोपाळ्याची जुनीच करकर
सवे चिऊकाऊच्या गोष्टी..
त्यामागूनी सूरांत होतसे
तिन्हीसांजेची शुभंकरोती..
एकेक पायरी यशाची ती
चढले ज्याच्या बळावरी..
घर ते माझे उभे पाठीशी
उनपाऊस घेत शिरी..
कधी न वाटे मला एकटे
घर ते माझे सखा सोबती..
कितिक गुपिते दोघांमधली
जपून त्याने ठेवली होती...
जग ते होते छोटेसे पण
आनंदाचे जीणे होते..
प्रत्येकाचा सूर वेगळा पण
घर ते आमचे गाणे होते..
त्या मायेच्या आठवणीने
उर दाटून येई कोण..
घरट्यावरूनी त्या माझ्या
उतरून टाकेन लिंबलोण...
- प्राजु.
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10797
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख...
धन्यवाद तात्या,
खूपच छान
"कधी न वाटे
असेच
In reply to "कधी न वाटे by पुष्कर
वा! एकदम खास
धन्यवाद.
छानच
"झोपाळ्याच
शुभंकरोति
In reply to "झोपाळ्याच by राजे (verified= न पडताळणी केलेला)
"पुढे
In reply to शुभंकरोति by ऋषिकेश
दिव्या
सुंदर
In reply to दिव्या by प्राजु
वा वा
जग ते होते
नॉस्टाल्जिया !
आवडली..
सुंदर कविता
आवडली
नादमय
सुंदर
कविता . .
एकदम मस्त
प्राजक्त,
घराचं