लै भारी!
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
अप्रतिम आठवणी आणि आठवणीतले जाधव सरही. शिक्षक दिनाला आशिर्वाद घ्यावेसे वाटावे असेच शिक्षक. :) अनुभवकथनासहित व्यक्तीचित्र मस्तच रेखाटलेय.
व्हॉलीबॉलच्या एखाद्या रंगलेल्या सामन्याचे असेच रेखाटन वाचायला खूप आवडेल मला. जमवाच लिहायचे. पुलेशु.
आम्हाला खो-खो शिकवणार्या लांडगे सरांची आठवण आली हे अनुभवकथन वाचतावाचता. त्यांनी आणि आईने खूप समजूत घालूनही बाबांनी आंतरशालेय खो-खो स्पर्धेत खेळू दिले नाही मला, या फाल्तू गोष्टीत मी वेळ दवडायला नको नावाखाली. बाबांचा कडवा विरोध असूनही लांडगे सरांनी शाळेतल्या शाळेत होणार्या स्पर्धांसाठीच्या टीममधून मला काढले नाही, हेच खूप होते तेव्हा! खो-खो म्हणजे धम्माल होती अगदी.
प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद वेदश्री. आधी मी अश्या एका सामन्याचं वर्णन "ते दोन क्षण - भाग १" ह्या लेखात केलं आहे. आपण तो http://www.misalpav.com/node/8716 ह्या दुव्यावर जरूर वाचा आणि आपली प्रतिक्रिया द्या. खळानी आयुष्यात काय आणि किती दिलं आहे ह्याची मोजदाद करणं अशक्य आहे हो... म्हणून मनातलं कागदावर उतरवायचा प्रयत्न करतो बस !
व्यक्तिचित्रण आवडलं.
स्वानुभवावरून सांगतोय -- शक्य असेल तर (किंवा शक्य करवून) जाधवसरांना शोधून भेटा. अशी माणसं एकदा दृष्टीआड झाली की मग आयुष्यभराची बोच लागते.
>> तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले
लिम्हण सरांशी संपर्कात आहात का? ते महाराष्ट्रीय मंडळात होते का?
धन्य्व्वाद संदीप. लिम्हण सर पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात कुस्ती शिकवायचे. जाधव सरांइतकेच पूजनीय शिक्षक. त्यांच्यामुळे आमची शाळा गेली तब्बल ३०-३२ वर्षं सलग पुण्यात आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचम अजिंक्यपद मिळवत आली आहे.
आणि हो... जाधव सरांना भेटणार तर नक्की आहे ! जाणीव करून दिल्याबद्दल खरंच धन्यवाद !
फार छान लिहिलेलं व्यक्तिचित्रण वाचून तुमच्या जाधव सरांना शोधून काढावंसं वाटलं, आंतर्जालावर 'Jadhav, volleyball, Pune' अश्या शोधानंतर नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या जागतिक स्पर्धेची ही बातमी मिळाली, त्यात K. J. Jadhav, president, म्हणून उल्लेख सापडला. हेच का ते जाधव सर?
Federation Internationale De Volleyball (FIVB) has selected Pune to be the host of the 15th World Junior Volleyball Men's Championships. The championships will be held from July 31 to August 9, 2009 at the Shiv Chatrapati Stadium at Balewadi and will be organised by the Volleyball Federation of India , The Maharashtra Volleyball Association , the Poona District Volleyball Association and the United Western Sports Foundation. ........
स्पर्धेची आधिक माहिती
या स्पर्धेत भारतीय संघाने म्हणे उत्तम कामगिरी केली. तुमच्यासारखे खेळाडू आणि तुमच्या जाधव सरांसारखे प्रशिक्षक लाभले की हे साहजिकच आहे असं वाटतं!
आमचे जाधव सर ते नव्हेत. आमच्या सरांचं नाव देविदास जाधव. ते देखील त्या स्पर्धेच्या संयोजनात असणार ह्याबद्दल शंका नाही. पण तुम्हाला सांगतो.... ब्राझील वि भारत सामन्याच्यावेळी पाहिलेला थरार मी आयुष्यात विसरू शकणार नाही. व्हॉलिबॉलसाठी इतकं खच्चून भरलेलं प्रेक्षागृह आधी बघितलं नव्हतं !
तुमचे भाग्य, तुम्हाला असे सर लाभले. आमचे दुर्भाग्य आम्हाला असे खेळाचे सर लाभले नाही.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
५ सप्टेंबरला त्यांना भेटून या. त्यानंतर त्यांच्याविषयी अधिक लिहा. हे व्यक्तिचित्र, सुरेख लिहिलेले असले तरी, अपुरे वाटते आहे. अजून येऊ द्या त्यांच्या जगण्याविषयी.
प्रतिक्रिया
डझनावारी
वा..
वा छान, जाधव सर आवडले!
हेय
सुरेख...!
असेच बोल्तो !
छान!
अप्रतिम!
सामन्याचे वर्णन
खूप आवडलं
सुरेख
लिम्हण सर
हेच का ते जाधव सर?
देविदास जाधव
छान...
सुरेख..
व्यक्तिचि
तुमचे भाग्य
छान लिहिले
मस्त
सुंदर
सुरेख
सुरेख
वा..
व्वा !
आवडल..
Khupach Chhan
५ सप्टेंबर
व्यक्तिचि
प्र.का.टा.आ.
व्वा !