Skip to main content

मिपाचा दुसरा वर्धापन दिन....

लेखक तात्या अभ्यंकर यांनी शनिवार, 22/08/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, अर्थात गणेश चतुर्थी...! लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत.. आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना.. सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा! आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व समाधानाचे आयुष्य लाभो हीच त्या विघ्नहर्त्या, सुखकर्त्या-दुखहर्त्या चरणी प्रार्थना..! बोला, गणपतीबाप्पा मोरया.. लालबागच्या राजाचा विजय असो....! आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

वाचने 15537
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

मराठी ही काही फक्त शिष्टा अन्‌ सूज्ञांची माय नाही | इथे मिसळीसाठी पावणार्‍या सज्जनांचीही तीच आई || तिच्या उत्कर्षार्थ कटिबद्ध "मिसळपाव"ही सदा राही | सदा वर्धिष्णू, समर्थ व्हावे, ही शुभेच्छा त्यास माझी || तात्या, नीलकांत आणि सर्व पंच मंडळींना हार्दिक शुभेच्छा! मिसळपावाच्या चाहत्यांस, ग्राहकांस आणि येथल्या सर्व किरदारांना हार्दिक शुभेच्छा!! मायबोलीच्या वावरास हक्काचे संकेतस्थळ मिळवून देऊन, दीर्घकाळ अभंग आणि समर्थ राखण्यात आलेल्या दैदिप्यमान यशाखातर समस्त चालक मंडळींचे मन:पूर्वक अभिनंदन!!!

तात्या आणि सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या दुसर्‍या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मिपाची प्रगती अशीच उत्तरोत्तर होवो ही सदिच्छा. आय.आय.एम मधील एक विद्यार्थी म्हणून येत असलेल्या अनुभवांवर लेख नोव्हेंबरमध्ये लिहायचा मानस आहे.त्यावेळी आम्हाला आठवडाभर सुट्टी असणार आहे.असो. विल्यम जेफरसन क्लिंटन वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८ आय.आय.एम. अहमदाबाद वस्त्रापूर, अहमदाबाद-३८००१५ गुजरात

सर्व मि.पा.करांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा!!!! तात्यांचे आणि सर्व मि.पा. करांचे द्वितिय वर्धापनानिमित्त अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!! खादाडमाऊ

तात्याचे व आम मिपाकराचे अभिनदन दुसरा वर्धापन दिनानिमित्त ....

तात्यानु..मिपाच्या द्वितीय वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा.. गणराची क्रुपा सदैव मिपावर अशीच राहो..

सर्व मिसळपाव करांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा... सर्व मिसळपाव करांना मिसळपावच्या वर्धापनदिनाच्या ही हार्दिक शुभेच्छा... मिसळपावचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनही साजरा होवो या पुढील उत्तुंग वाटचालीच्या शुभेच्छा ... (मिसळपावप्रेमी) सागर

हप्पी बड्डे मिसळपाव ! :B :B :B बाकरवडी :B :B :B

मिपाचे हार्दिक अभिनन्दन..श्रीयुत तात्यान्चे पण अभिनन्दन!! मिपा अशीच व्रुद्धिन्गत होवो ही सदिच्छा...

अभिनंदन आणि शुभेच्छा :)

अभिनंदन आणि शुभेच्छा :)

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचं हार्दिक अभिनंदन! ---नि३.

समस्त मिसळपाव परिवाराचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ( शुभेच्छुक ) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मिपाच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना शुभेच्छा! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा तात्यांचे व सर्व मिपाकराचे दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त मनःपुर्वक अभिनदन ....! :-) मागच्या सप्टेंबरमध्ये प्रथम मायबोलीच्या संपर्कात आलो. तिथे लिहीता लिहीता कुठेतरी मिपाबद्दल वाचले आणि इथे डोकावलो. पहिले काही दिवस फक्त अवलोकन चालु होते. हळु हळु लक्षात आले की हे आपल्या स्वभावाला मानवण्यासारखं आहे. सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट इथे जाणवली असेल तर ती ही की इथे प्रत्येकाला सांभाळुन घेतले जाते, सामावुन घेतले जाते अगदी त्याच्या गुण दोषासकट ! मग कधी मिपाकर होवुन गेलो कळलेच नाही ! माबोपासुन सुरुवात केलेला मी, पण आजकाल माबोवर आठवड्यातुन एक्-दोन वेळाच जाणे होते. पण मिपावर मात्र दिवसरात्र पडिक असतो. पुन्हा एकदा तात्या व सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि मनापासुन धन्यवाद ! मिपाला खुप खुप शुभेच्छा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

तात्या व इतर समस्त सहकार्‍यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचाली करता शुभेच्छा. मोहन

अभिनंदन, तात्या आणी पुढील वाटचालीस शुभेच्च्छा !!!