Skip to main content

मिपाचा दुसरा वर्धापन दिन....

लेखक तात्या अभ्यंकर यांनी शनिवार, 22/08/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, अर्थात गणेश चतुर्थी...! लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत.. आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना.. सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा! आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व समाधानाचे आयुष्य लाभो हीच त्या विघ्नहर्त्या, सुखकर्त्या-दुखहर्त्या चरणी प्रार्थना..! बोला, गणपतीबाप्पा मोरया.. लालबागच्या राजाचा विजय असो....! आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.

वाचने 15537
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा तात्याचे व आम मिपाकराचे अभिनदन दुसरा वर्धापन दिनानिमित्त .... धन्यवाद मामु

In reply to by mamuvinod

श्रीगणेशाच्या कृपेने मिसळपावची अशीच भरभराट होवो.. ! तात्यांचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

गणपतीबाप्पा मोरया.. लालबागच्या राजाचा विजय असो....!
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!

वेगवेगळ्या विचारांच्या सदस्यांना एकत्र बांधुन ठेवणारे हे संस्थळ असेच उंची गाठत राहो.

In reply to by विनायक प्रभू

सरांशी सहमत आहे. दोन वर्षं पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन आणि आगामी अनेक वर्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

मिपाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मिपाची कीर्ती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया!!

In reply to by नंदन

दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल मिपाचे आणि मिपाकारांचे हार्दिक अभिनंदन!!!! आगामी अनेक वर्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by नंदन

सर्वांमागून का होईना पण माझ्याकडूनही अनेक शुभेच्छा!! :)

गणपती बाप्पा मोरया !!! :) इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्धल तात्या अभ्यंकर यांचे सर्व प्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! :) मिपा ने अशीच प्रगती करावी हीच सदिच्छा !!! :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

In reply to by मदनबाण

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! असेच म्हणतो :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! असेच म्हणतो :) --अवलिया ============== काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

In reply to by अवलिया

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! हेच बोल्तो. ;)

In reply to by गणपा

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! हेच बोल्तो. :-)

In reply to by सहज

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! +१ -(मिपावर आपली ओळख णिर्माण केलेला) टारझन

In reply to by टारझन

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!

In reply to by निमीत्त मात्र

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! -अनामिक

In reply to by अनामिक

इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!! सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! गणपती बाप्पा मोरया !! मिपावर तुमचे आशिर्वाद राहुद्या! :)

या चांगल्या संकेतस्थळाची वाटचाल अशीच दिवसेंदिवस बहरत राहो.तसेच सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा .

महाराष्ट्रापासून दूर राहूनही आमचं मराठीपण जपणार्‍या, जागविणार्‍या नि आम्हाला महाराष्ट्राशी बांधून ठेवणार्‍या मिसळपावविषयी सविनय कृतज्ञता. तात्यांचे हे रोप बहरले आहेच, ते अजून बहरो ही सदिच्छा. शिवाय गणेशोत्सवाच्या मिपाला आणि मिपाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा

पुढच्या वाटचालीसाठी. बाप्पाची कृपा आहेच.

गणरायाची कृपा मिपावर आहेच त्यामुळे काळजी नाही. तरीही माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा खास करून तात्याला आणि इतर समस्त मिपाकरांना. इवलेसे रोप लावियले दारी तयाच वेलू गेला गगनावरी...... असेच घडो! तथास्तु! माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

In reply to by प्रमोद देव

तरीही माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा खास करून तात्याला आणि इतर समस्त मिपाकरांना.
काका, आपला आशीर्वाद हवाच.. तो माझा हक्क आहे! त्याचप्रमाणे आपल्याकडून माझे हवे ते आणि हवे तसे लाड पुरवून घेण्याचाही माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच! :) आपला, (प्रमोदकाकांकडून प्रसंगी आऊट ऑफ द वे जाऊनही सपोर्ट मिळण्याची खात्री असलेला) तात्या.
इवलेसे रोप लावियले दारी तयाच वेलू गेला गगनावरी
एक सुधारणा - मूळ शब्द, इवलेसे रोप लावियले दारी तयाच वेलू गेला गगनावेरी असे आहेत. या बाबतीत बर्‍याच जणांचा घोटाळा होतो. हृदयनाथ मंगेशकरांनी याचं एकदा फार सुंदर विवेचन केलं होतं. ते म्हणाले होते की माउली इतकी नम्र आहे की ती 'वरी' च्या ऐवजी मुद्दाम 'वेरी' हा शब्द वापरते. गगनापेक्षा मोठं दुसरं काही नाही याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच ते वरी (गगनाच्याही वर) या पेक्षा वेरी (गगनापर्यंत!) असा शब्द मुद्दाम वापरतात! शेवटी 'वेरी' हा शब्द वापरताना माउलीलाही 'स्काय इज द लिमिट' हेच अभिप्रेत असावं! :) आपला, (ह भ प) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गगनापेक्षा मोठं दुसरं काही नाही याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच ते वरी (गगनाच्याही वर) या पेक्षा वेरी (गगनापर्यंत!) असा शब्द मुद्दाम वापरतात! आपुनको मालूमच नही था. बरं झालं...ह्या निमित्ताने ज्ञानात भर पडली. माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

In reply to by विसोबा खेचर

तात्या, गोरख कल्याणची याद करून दिली. धन्यवाद! वर्धापन दिनाच्या लाखलाख शुभेच्छा!!

द्वितिय वर्षपूर्तीनिमित्त मिपाचे अभिनंदन. हे स्थळ असेच उत्तरोत्तर वर्धिष्णु राहो हीच इच्छा!!! बिपिन कार्यकर्ते

द्वितिय वर्धापन दिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा... :) दिपाली :)

In reply to by सखी

असेच म्हणते,अनेकोत्तम शुभेच्छा! स्वाती

हॅप्पी बर्थडे मिसळपाव!!!! :) तात्या आणि सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन आणि संकेतस्थळ उत्तरोत्तर बहरो अशी शुभकामना. ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ३७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हॅपी बर्थडे टु यु!!!हॅपी बर्थडे टु यु!!! हॅपी बर्थडे मिसळपाव.. हॅपी बर्थडे टु यु!!!!!!...."

द्वितिय वर्धापन दिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन !!! -दिलीप बिरुटे

मिसळपाव ला द्वितिय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्चा चला मंडळी कटटा करु एक अपेयपान निषिध असा फक्त गणेश दर्शन करु मुंबईचे काय तात्या? ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

सर्व मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा.. आणि द्वितिय वर्धापन दिनानिमित्त मिपाचे आणि तात्यांचे हार्दीक अभिनंदन..... "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

केवळ दोनच वर्षात लोकप्रियतेची उत्तुंग उंची गाठणार्‍या मिसळपावचे, त्याच्या मालकांचे आणि सर्व संपादकमंडळींचे मनापासून अभिनंदन !

वा!! आपल्या सर्वांचच अभिनंदन. तात्या पार्टी कधी करायची? :)

तात्यांचे आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन. एवढे सुंदर संस्थळ सुरू केल्याबद्दल आणि स्वखर्चाने ते सुरू ठेवल्याबद्दल तात्यांचे आभार :)

मिपा मालक , मिपा विश्वकर्मा(इथलं आभासी मिपा जग बनवणारा आणि त्यात वेळोवेळी सुधारणारा करणारा अभियांत्रिक),मिपा संपादक वर्ग ह्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आभार इतक्याच साठी की अस सरळसाधं स्थळ मिळणं आणि नव्या सदस्यालाही त्यात लागलिच मोकळेपणानं फिरता येणं हेच त्या संस्थळाचं एक मोठं यश आहे. वेळोवेळी इथं अफाट वैविध्यपुर्ण (अगदी टवाळखोरी पासुन गंभीर विषयावर लिहिणारे सर्व)लेखक ह्यांचं अभिनंदन. वाचकंचाही अशा लिखाणाला प्रतिक्रिया देउन सतत लिहितं ठेवण्यात मोठा हातभार आहे. त्यांचेही आभार. ह्या स्थळाचा प्रवास अशाच योग्य दिशेला सुरु राहिल्यास मिपा केवळ स्थळ न राहता एक मोठी चळवळ किंवा समुदाय(community or activity) म्हणुनही उदयाला येइल हे निश्चित. One day MIPAA will have it's own SAY. It will be heard loud and clear to the greate extent. कुणीही मुद्दाम AGENDA असा न ठरवता सुद्धा बहुतांश सदस्यांची नकळतच (थोडी फार का असेना)सामाजिक जाणिव वृद्धिंगत व्हायला मिपाचं योगदान आहेच. मला स्वतःला आवडणारी इथलं गोष्ट म्हणजे :- तत्काळ येणारे उत्स्फुर्त प्रतिसाद. त्यामुळच चर्चेत जान येते, स्वतःचं लिखाण भरुन पावल्यासारखं वाटतं. तुम्ही काही लिहा हो, तुमच्याशी तत्काळ सहमत होणारी किंवा हक्कानं/तावातावानं भांडाणारी माणसं इथं आहेत. ह्यामुळचं कसं अगदि जिवंतपणा येतो इथल्या चर्चेला आणि नुसतच वाचायचं म्हटलं तरी मजा येते. नक्की सांगता येत नाहिये पण म्हणायचय ते असं:- "मिपा हे एक मर्‍हाटी मधलं आगळं वेगळं रसायन आहे लोक सहभागातुन घडत असलेलं. त्याची स्वतःची अशी काही वैषिष्ट्य आहेत. काही नव्यानं घडताहेत्.इथं सध्या नियमित दिसणारे लेखक हे केवळ व्यक्ती राहिली नसुन व्यक्तिमत्व झाली आहेत. म्हणजेच, व्यक्तींची आयुर्मयादा सान्त असली तरी व्यक्तीम्त्वाला काल मर्यादा नसते. अगदि उच्च पातळीवर बघाय्चं झाल्यास हजारो वर्षा नंतरही कृष्ण्-राधा-रुक्मिणी, कृष्णार्जुन ही व्यक्ती नाहित तर व्यक्तिमत्वं म्हणुनच जास्त जगली आहेत. त्यांच्या आयुष्या नंतरही त्यांचे विचार कुठतरी बोलले जाताहेत्...लिहिले जाताहेत. आपण(व्यक्ती ) आज आहोत , उद्या असु वा नसु ... मात्र आपलं इथलं अस्तित्व/व्यक्तिमत्व कायमच इथं राहिल. कदाचित एखाद्याच्या प्रभावानं दुसर्‍यात प्रवेश करुन त्यानं आधुनिक परकायाप्रवेश केलेला असेल किंवा त्याचा पुनर्जन्म झाला असेल विचांरांच्या रुपात! " एखाद्याच्या व्यक्तिमत्वाला असं दीर्घायुष्य देणार्‍या मिपाचं म्हणुनच कौतुक वाटतं. जियो मिपा... जियो. आपलाच, मनोबा

In reply to by अनिल हटेला

असेच म्हणतो.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मिपाच्या व्दितीय वर्धापन दिना निमित्त तात्या अभ्यंकराचे विशेष अभिनंदन.मराठी संस्थळ काढुन ते व्यवस्थित दोन वर्षे चालवणे ही सोप्पी गोष्ट नाही आही.त्यामुळे तात्यांचे मनपुर्वक अभिनंदन. मिपाचे तांत्रिक सल्लागार निलकांताचे ही अभिनंदन.बाकी सर्व मिपा संपादक व वाचकाचे हार्दिक अभिनंदन. सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. वेताळ

तात्या आणि निल़कांत, मिपाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त त हार्दिक अभिनंदन! अनेक शुभेच्छा! गणपतीबाप्पा मोरया!

तात्याचे, तंत्रज्ञ नीलकांतचे आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन! ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा. गणपतीबाप्पा मोरया!! :) -चतुरंग ता.क. एक राहूनच गेलं. 'गमभन' कर्त्या ॐकारचेही मनःपूर्वक आभार कारण त्याच्या कर्तबगारीनेच आज मराठी संकेतस्थळे मानाने उभी आहेत! :)

In reply to by चतुरंग

तात्याचे, तंत्रज्ञ नीलकांतचे आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन! :) ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा. यातला प्रगल्भ हा शब्द खूप महत्वाचा आहे असं वाटलं. :) 'गमभन' कर्त्या ॐकारचेही मनःपूर्वक आभार कारण त्याच्या कर्तबगारीनेच आज मराठी संकेतस्थळे मानाने उभी आहेत! लाख बोललात! सहमत आहे. जय गणेश!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by चतुरंग

तात्यां, तंत्रज्ञ नीलकांत, ओंकार आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन! ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा. सर्व मिपाकरांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!! गणपतीबाप्पा मोरया!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचं हार्दिक अभिनंदन! :) मिपाच्या आजवरच्या वाटचालीचं कौतुक करावं, तेवढं कमीच. =D> यापुढची घोडदौड अशीच जोसात चालत राहो ही सदिच्छा. :) गणरायाच्या कृपेनं मिपानं असंच उत्तरोत्तर प्रगतीपथावर रहावं! =D> क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ~ शुभेछा!

मिपाच्या द्वितीय वर्षवर्धापनदिना बद्दल हार्दिक शुभेच्छा! अभिनंदन तात्या आणि नीलकांत! अनेक विचारांचे आणि अनेक पद्धतीचे सदस्यांचे वाचताना तसेच त्यांच्याशी संवाद साधत असताना विचारांची समृद्धी येते. त्या बद्दल विशेष आभार!

मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

मिसळपावने गेल्या दोन वर्षांत केलेल्या उत्तम आणि उल्लेखनीय वाटचालीबद्दल तात्या आणि नीलकांत यांचे विशेष अभिनंदन ! मिपाची यापुढील कामगिरी व प्रगती सुध्दा अशीच अखंड जोमात आणि प्रचंड जोषात होवो ही सदिच्छा ! - दिपोटी

तात्या तुझे अभिनंदन करायला माझ्याकडे " शब्दच "नाहीत. " सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन "

' मिसळ ' अगदी उत्तम जमून आली आहे... तिची चव आपल्या सर्वांच्या जीभेवर अशीच रेंगाळत राहो हीच सदिच्छा !! सर्व मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा.. आपला हृषी !!

अभिनंदन आणि शुभेच्छा! -अविनाश ओगले बेळगावकर

तात्या आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

द्वितीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा .. आणि अभिनंदन !!!

तात्यां, तंत्रज्ञ नीलकांत, ओंकार आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन! ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा. सर्व मिपाकरांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!! गणपतीबाप्पा मोरया!!

तात्या. नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेकानेक शुभेच्छा!! (मिपाकर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

या वाटचाली मध्ये आपल्या सर्वांचाच सहभाग असल्याने समाधान व्यक्त करु या. गजानन सर्वांना सदबुद्धी देवो (सश्रद्ध?) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

तात्या,दुस-या वर्धापन दिनानिमित्त तुमचे अभिनन्दन! मिपा रहो हजारो साल...सर्व मिपा सदस्याना आपल्या पुढील वाटचालीसाठी गणेशाच्या आगमना प्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा! मिपाच्या भरभराटीचा साक्षीदार - एकलव्य

आणि अभिनंदन, तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे. पुढील वाटचालही अशीच भरभराटीची राहो.

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन.. मिपा अजुन खुप पुढे जावे !! --टुकुल