कविता आवडली. सध्याच्या 'कामात गर्क' पिढीच्या अपत्याचे मनोगत चांगले मांडले आहे. अर्थात, प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू असतातच. पण ही बाजू छान मांडली आहे. संदीप / सलिलच्या 'कोमेजून निजलेली एक परीराणी' या कवितेची आठवण झाली.
जाताजाता: कविता आजकालच्या मुलांच्या इंग्रजीमिश्रित मराठी मधे आहे, पण इंग्रजी शब्द देवनागरीत टंकले असते तर?
बिपिन कार्यकर्ते
कविता चांगली आहे. कदाचित कुठे असे घडतही असेल. पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही.
कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहणार्या आईच्या मनास अपराधी भावनेची बोच असते आणि कित्येकदा त्याची भरपाई घरी आल्यावर जास्तीत जास्त वेळ, प्रेम मुलांना देण्याकडे अशा आयांचा (आईचे अनेकवचन) कल आणि प्रयत्न असतो.
मुलांच्या दृष्टीकोनातून पाहता, त्यांची भावनिक कुचंबणा होते हे मान्य.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
माझ्या मनात देखील असंच काहीसे आले होते कारण मी अनेक घरे अशी पाहीली आहेत ज्या मध्ये आई-वडील दोघे ही कामावर जातात पण दिवसातून वेळात वेळ काढून.... व शनीवार संध्याकाळ व पुर्ण रवीवार आपल्या मुलांच्या सोबतच घालवतात कारण त्यांना वाटते सोमवार ते शुक्रवार पर्यंत जो गॅप पडला आहे आई-वडील व मुलांमध्ये तो भरुन काढता यावा... !
आईतर आई असते... मग गावातली आय.. असो वा शहरातील मॉम.. !
ती मुलांच्या कडे दुर्लक्ष करेल असे वाटत नाही.. हा कधी कधी कामाच्या रगाड्यात थोडा कमी वेळ देत असेल हे शक्य पण मुलाला सकाळी उठवायला विसरणे शक्यच नाही... !
भावनिक शब्दाच्या खेळामुळे एकदा वाचल्यावर कविता आवडू शकते पण पण पुन्हा पुन्हा वाचली की त्यातला फोलपणा जाणवू लागतो...
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
आपल्या प्रतिक्रियेशी मी पूर्णपणे सहमत आहे..
या कवितेमधल्या मुलाची स्थिती अपवादात्मक आहे हे नक्की पण काल्पनिक नाही..
एका परिचयाच्या घरातलं वातावरण पाहिल्यानंतर न राहवून सुचलेली ही कविता आहे..
आवर्जून कविता वाचल्याबद्दल धन्यवाद..
पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही.
नाही, ही कविता समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. हाच विचार याच शब्दात माझ्या मनात आला; पण ज्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष घडते ते पाहून आपल्यालाच वाईट वाटते. आईच्या मनाला असलेली बोच ही तिच्याही सवयीची होउन जाते. मन थोडं बोथट होत असेल. असं काही बघितल्यावर माझी फार तडफड होत असे........आता अशी कुटुंबं असतात आणि असणारच्......आपल्यालाच सवय नाही असं काही बघायची म्हणून सोडून देते.
रेवती
ही कविता समाजाचे प्रतिनिधित्व वगैरे करते असे वाटत नाही. आणि खुद्द कवीनेही तसा कुठे उल्लेख केला नाहीये. समाजात सगळ्याच प्रकारचे लोक असतात, त्यातला हा एक प्रकार. कवि त्या प्रकारात अडकलेल्या अपत्याचे मनोगत मांडतो आहे असे वाटते. पुढे जाऊन असे म्हणतो, की काही असे प्रकार किंवा अगदी जवळ जाणारे प्रकार अगदीच दुर्मिळ नाहीत.
बिपिन कार्यकर्ते
>>पण ही कविता आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करते असे मला वाटत नाही>>
नसेल ही करत. आज अशी परिस्थिती आहे तर उद्या कशी असेल असा कल्पनाविलास करत गेलो तर कवितेत उल्लेखलेली अतिशयोक्ती घडू शकते. त्या दृष्टिकोनातून कविता वाचली तर एक विरंगुळा म्हणून चांगली जमलीये कविता.
अवांतर : अतिशयोक्ती हा पण भाषेचा एक अलंकार आहे .
कविता
कविता छान
+१ असेच म्हणतो.
असेच
आवडली...
+१
कविता
मस्त!!! ही
चांगली...
माझ्या
सहमत आहे.
आपल्या
पण ही
सहमत...
>>पण ही
अतिशय मर्मस्पर्शी कविता ..