माध्यमातुन गाजावाजा झाला तर त्यामुळे तरी लोक या खगोलशास्त्रीय अविष्काराकडे पहाण्याची संधी गमावणार नाहीत असा हेतुतः केलेल्या वैज्ञानिकांच्या "खेळी"चा हा भाग आहे. अजुनही ग्रहण या प्रकाराकडे अंधश्रद्ध नजरेने पहाणा-या लोकांपर्यंत लोकप्रिय माध्यमा द्वारे पोचण्याचा हा प्रयत्न आहे. मग त्यासाठी 'ग्लॅमर' देणे 'गाजावाजा' करणे हे ओघाने आलेच. आता १५ जानेवारी २०१० च्या कंकणाकृती सूर्यग्रहणालाही असाच प्रकार होईल हे भाकीत आम्ही वर्तवतो.
( हे भाकीत वर्तवायला ज्योतिषी कशाला पाहिजे?)
ज्योतिर्दुषण प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
या वेळी ग्रहण आणि भरती हे दोन बुभुक्षित लांडगे एकानंतर एक येणार असल्याचा गाजावाजा सगळ्या प्रसारमाध्यमांनी आधीपासून सुरू केला होता. आपण या लांडग्यांना कांहीही करू शकत नाही हे ठाऊक असल्यामुळे भित्रे ससे बिळात लपून बसले होते तर कांही उत्साही प्राणी त्यांना पाहण्यासाठी कुतूहलाने उंच झाडांवर चढून बसले होते. अपेक्षेप्रमाणे 'ते' आले. त्यांनी सर्वांना आपले दर्शन दिले आणि 'ते' जसे आले तसे चालले गेले. पण 'ते दोघे' मुळात लांडगे नव्हतेच. ते होते सुंदर आणि दिमाखदार काळवीट!
हा हा हा! मस्त लेख... :)
पण घारेसाहेब, एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे ती अशी की त्या दिवशी भरती निश्चितपणे अधिक आली असणार कारण आमच्या ठाण्याच्या खाडीच्या आसपास जी लोकवस्ती आहे त्या वस्तीत भरतीचं पाणी शिरलेलं मी पाहिलं आहे, जे एरवी कधीच कुठल्याही भरतीच्या वेळी शिरत नाही..
आपण म्हणता त्या प्रमाणे दर्याच्या लाटांचं काही फारसं अक्राळविक्राळ रूप पाहायला मिळालं नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी वरील बाबतीत आपण काय खुलासा करू शकाल?
आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.
अमुक इतके मीटर उंच भरती असा जो अंदाज वर्तवला जातो त्याचा अर्थ समुद्राच्या पातळीची त्या वेळची उंची सरासरी पातळीपेक्षा (मीन सी लेव्हलपेक्षा) तितके मीटर उंच असा होतो. त्यामुळे त्यापेक्षा सखल भागत पाणी घुसणे शक्य आहे. याच कारणामुळे सखल भागात राहणार्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता, कांही लोकांना तात्पुरते सुरक्षित अशा ठिकाणी हलवण्यात आले असले तर ते योग्यच होते. पण शतकातली सर्वात मोठी भरती आणि तशाच प्रकारचा मुसळधार पाऊस या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडण्याची शक्यता अत्यल्प असल्यामुळे या वेळी महाप्रलय होईल अशी भीती मला तरी वाटली नव्हती.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
हा हा हा! बिचारे गावकरी. ;)
एक शंका, भरती ओहोटी मोजणारी काही व्यवस्था आहे का? असल्यास खरंच कीती भरती होती ते कळेलच.
पण मला ही, ग्रहण आणि भरती यामध्ये नक्की इतकं काय ग्रेट आहे (सर्वसामान्यकरता) हे कळलेलं नाही, त्यामुळे मी ना ती भरतीची बातमी वाचली ना ग्रहण टीव्हीवर पाहीले.
-अभागी(?) ;)
आपल्याला ग्रेट वाटोत व न वाटोत, ती जरूर पाहण्यासारखी असतात असे मला वाटते. मरुभूमी, निबिड अरण्ये, मुसळधार पाऊस, हिमाच्छादित पर्वतशिखरे, अथांग पसरलेला दर्या या सगळ्या गोष्टी मला सुखावतात इतकेच नव्हे तर अंतर्मुख करतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
मरुभूमी, निबिड अरण्ये, मुसळधार पाऊस, हिमाच्छादित पर्वतशिखरे, अथांग पसरलेला दर्या या सगळ्या गोष्टी मला सुखावतात इतकेच नव्हे तर अंतर्मुख करतात.
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ग्रहणाला दिले गेलेले ग्लॅमर समजू शकते, नव्हे भारतासारख्या देशात जिथे अद्यापही कित्येक जण ग्रहण काळात खाणे, पिणे, फिरणे टाळतात तेथे लोकांनी ग्रहण हे एक खगोलशास्त्रीय घटनाच असून त्याचा (योग्य ती काळजी घेऊन) आस्वाद घ्यावा, यासाठी योग्यदेखिल आहे.
शतकातील सर्वात मोठी भरती वगैरे प्रकार म्हणजे टीआर्पी वाढवण्याचाच प्रकार वाटला!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
ग्लॅमर
या वेळी
मोठी भरती
हा हा हा!
निसर्गाची विविध रूपे
इतकेच
हेच म्हण्तो
+१
ग्लॅमर