कालचा दिवस दिव्याचा अवसेचा. दिव्याच्या अवसेच्या दिवशी मला प्रकर्षाने आठवण होते ती आई करत असलेल्या कणकेच्या उकडलेल्या दिव्यांची आणि चाळीत शेजारी रहाणार्या नलिनीकाकूंची.
लहानपणी गावी चातुर्मासाचे दिवस जाणीवपूर्वक आणि श्रध्देने जपले जायचे. नंतर येणारा श्रावणमहिना आधीच दिव्याच्या अवसेतून हूरहूर लावत असे. दिव्याच्या अवसेला आई आम्हा सर्व भावंडांच्या संख्येइतके कणकेचे गोड, उकडलेले दिवे करत असे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्याची आरती करून देवाला नैवेद्य दाखवित असे. त्या दिवशी खरोखरचे पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा होई. आम्हा भावंडांना देवाच्या पाया पडायला लावून दिव्याच्या कहाणीचे सार सांगत असे. कहाणीतल्या राणीने खोटे वागून उंदरावर आळ घेतल्यामुळे, उंदरांनी राणीला कसा धडा शिकवला हे अगदी मन लावून सांगत असे. कुणी ऐको न ऐको. रात्री जेवणाबरोबर आई प्रत्येकाला कणकेचा दिवा प्रसाद म्हणून खायलाच लावी. आम्हाला दिवसभर हे घरातलं वातावरण अगदी पवित्र वाटत राही.
संध्याकाळी देवासमोर अतिशय मनोभावे " माझी सगळी मुले कायम सुखात ठेव " हे आवर्जून पुटपुटे. आम्हाला तिच्या ह्या देवासमोर केलेल्या मागणीची फार मजा वाटे. आम्ही तिला विचारायचो "खरंच देव तू म्हणते तसं करील कां ग ? " ती विश्वासाने म्हणे "तो नक्की चांगले करेल". मग आम्हाला गजानन महाराजांच्या पोथीतील ओवी म्हणून दाखवी -
| | श्रध्दावंत ज्याचा भाव, त्यासी पावेल स्वामीराव, उपास्यापदी भाव, उपासके ठेवावा ||
आई ज्या विश्वासाने "तो नक्की चांगले करेल " म्हणत असे, तेवढ्याच विश्वासाने आणि श्रध्देने नलिनीकाकूसुध्दा देवाला प्रार्थना करून म्हणत असे कि, देवा माझ्या मुकुंदाला, तो जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव, काही कमी पडू देऊ नकोस.
नलिनीकाकूंचा मुकुंदानं वडलांच्या कडक आणि रागीट स्वभावाला कंटाळून, रागानं एक दिवशी ,भांडण करून घर सोडलं. ते परत कधीही न येण्याचा निश्चय करूनच. मुकुंदासाठी त्या दर सोमवारी पुत्ररक्षणार्थ असलेला शिवलिलामृताचा अकरावा अध्याय न चुकता वाचंत, संपत शनिवारी मुंज झालेला मुलगा जेवायला घालंत. उपास-तापास, व्रत वैकल्ये सर्व काही करंत. दिव्याच्या अवसेला दरवर्षी नलिनीकाकू मुकुंदाच्या नावाने कणकेचा दिवा करंत आणि तुळशीपुढे वृंदावनात ठेवून घरात जाता जाता आईला म्हणंत " मला विश्वास आहे, मुकुंदा जिवंत आहे आणि तो नक्की सुखात आहे". पण मुकुंदाच्या आठवणीमुळे त्यांच्या आणि माझ्या आईच्या डोळ्यातही पाणी येई . मुकुंदा जिवंत आहे कि नाही ? ह्या शंकेची पाल त्यांच्या मनात कायम चुकचुकंत असावी, कारण "मला विश्वास आहे, मुकुंदा जिवंत आहे " ह्या त्यांच्या शब्दातली थरथर सारं काही सांगून जात असे.
ह्या गोष्टीला आता ३५ वर्षे झाली. आम्ही १५ वर्षापूर्वीच गाव सोडून डोंबिवलीला मोठ्या भावाकडे, त्यानंतर नोकरी / कामधंद्याच्या निमित्ताने पुण्यात स्थायीक झालो. गांव सोडल्यापासून आमचा गावाशी संपर्कच राहीला नाही. मुकुंदा घरी आला कि नाही ? हे माहीत नाही. हळूहळू कालपरत्वे आम्हीही विसरंत गेलो. पण ..
दिव्याच्या अवसेच्या दिवशी मला नलिनीकाकू आणि मुकुंदा ह्यांची प्रकर्षाने आठवण होते.
वाचने
7025
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
क्या बात है!
आज
मी ही असाच
In reply to आज by श्रावण मोडक
...
खूप छान
पुरे यार...
In reply to खूप छान by llपुण्याचे पेशवेll
मस्त
सुरेख !
छान
सुरेख लेख
असेच
In reply to सुरेख लेख by सहज
मन
+१,
In reply to मन by विसोबा खेचर
काल
हा पहा ह्या वर्षीचा फोटो....
आभारी आहोत आम्ही.
In reply to हा पहा ह्या वर्षीचा फोटो.... by प्रशु
वा!