ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान
डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही.
मला ईंधन देई नळावर आलेले अनूभव देत आहे. त्यात कसे काय अवधान राखले पाहिजे ते कळेल व त्या द्वारे आपण आपले द्रव्य (ईंधन व मुल्य) कसे वाचेल हे समजेल.
मी एकदा ईंधन देई नळावर दोन चाकी वाहनात ईंधन भरावयास गेलो होतो. पाऊस चालू होता म्हणून काही वाहनांची रांग पण नव्हती. ईंधन देई नळावर वरती छत असल्याने पाऊस लागत नव्हता. माझ्या आधीच्या गड्याने ईंधन विकत घेतले. (ए भाऊ, ३० चे पेट्रोल टाक रे). त्यानंतर माझा क्रमांक होता, म्हणून मी ईंधन टाकीचे झाकण उघडे ठेवून गाडी नळापुढे उभी केली. ईंधन नळ हातात घेवून ईंधन वाटणार्या मनुष्यापुढे एक मुल्य घेणारा मनुष्य हातात एक बुधले घेवून मला "आपल्याला ऑयल कितीचे टाकायचे" असे विचारत होता. माझी गाडी ४ धक्क्याची असल्याने तिस जिवाश्म चिकण द्रव्याची आवश्यकता नव्हती. (फक्त २ धक्के आंतरीक जळण यंत्राच्या वाहनाला जिवाश्म चिकण द्रव्याची आवश्यकता असते.) तेव्हड्या वेळात ईंधन नळ हातात घेवून ईंधन वाटणार्या मनुष्याने ईंधन नळ सुरु करीत ईंधन टाकीत टाकण्यास सुरुवात केली व मजकडे बधून म्हणाला की, "साहेब, कितीचे करू?", तोपर्यंत ईंधन देई नळावरील मोजयंत्रात काही आकडे पडलेले पुढे गेलेले होते. मी त्या मोजयंत्राचे शुन्य वाचन घेतलेले नव्हते. म्हणजेच माझ्या आधीच्या गड्याचेपण मोजलेले आकडे माझ्या ईंधनाच्या मोजलेल्या आकड्यात भरीस पडले होते.
मी घाईघाईत किती मुल्याचे ईंधन टाकायचे ते सांगीतले. नंतर मी त्यास "मोजयंत्र शुन्यवत केले काय? " असे विचारले असता "केल होत" असे उत्तर मिळाले. मी समजुन चुकलो होतो की आपण फसलो गेलो आहे.
मी रोख रक्कम देवून वाहनास पायधक्क्याची खटकी मारुन चालू केले व तेथून मलाच दोष देत निघालो.
त्यानंतर असेच मागील आठवड्यात मी परत दुसर्या एका ईंधन देई नळावर वाहनात ईंधन भरावयास गेलो. ह्या वेळेसपण पाऊस चालू होता. माझा क्रमांक आल्यावर मुल्य घेणार्या मनुष्याकडे मी माझे उधार पत्र दिले व त्यास "दोनशे चे कर" असे सांगितले. त्याने मला, "गुप्त कळ क्रमांक काय आहे?" असे विचारले. मी त्यास विचारले की "गुप्त कळ क्रमांकाची काय आवश्यकता आहे?" त्यावर तो गुप्त कळ क्रमांक न घेता उधार पत्र ओढण्यासाठी उधार पत्र यंत्राकडे चालता झाला. तेव्हढ्या वेळात ईंधन वाटणार्या मनुष्याने ईंधन नळ चालू करून काही ईंधन टाकले होते व त्यावेळी माझ्या आधीच्या गड्याचेपण मोजलेले आकडे माझ्या ईंधनाच्या मोजलेल्या आकड्यात भर पडले होते.
थोडक्यात, ईंधन देई नळावर ईंधन वाटप करतांना ईंधन देई नळावरील कर्मचारी आपल्यास बोलण्यात गुंतवतात व आपला कार्यभाग साधतात. आपण अवधान राखावे हे उत्तम.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा हा ...
:-)
+१
इंधन
दोनदा घासणे
मजेशीर
हा
चांगलाच अनुभव..
विश्वासार
समदु:खी
पेट्रोल भरणे थांबवुन कितीचे भरायचे हे विसरलो असे म्हणतो..
ग्राहकाला
नेहमीचा अनुभव
.
सिंहगडरस्
मस्त
माहितीपूर
मलापण
पेट्रोल भरताना +
<<<<डिस्केमर
बाकी
डोक्यावरून गेले..
बेंगलुरु
उधार पत्रक
उधार पत्रक चूकून दोनवेळा छेदले गेले, तर काय होते?
मला वाटलं
ह्म्म्म होतं खरं असं!
तेच म्हणतो.
दगडफोड्या
सावधगिरी
एकुणच
अनवधानाने
C V V
बर्याच दिवसांनी लेख वाचला.
हा जबर्या लेख वर आलेला
धन्यवाद हो गविकाका...
@हा लेख वाचून आम्हास निर्वाण
म्हणून आम्ही पार्याचे