Skip to main content

वाटेवर मी तिच्या ठेवली--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 20/07/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवर मी तिच्या ठेवली प्राजक्ताची दोन फुले ह्रदयातून मग लक्ष लागले प्राजक्तातून प्रीत फुले ? उगीच ठेवला प्राजक्त तिथे मी मनात रुजलो आहे किती ? मधल्या दिवसांमधील अंतर जाणून घेण्या आहे किती ? हळवी लागे ओढ अनामिक मनास हुरुहूर सले खुळी प्राजक्तातून प्रीत पाहतो विसरली का मज प्रीतकळी ? आनंदाने तिने उचलली रस्त्यावरची दोन फुले गंध घेउनी प्रेमभराने मला शोधण्या नजर फिरे फुले नव्हे ती आमुची प्रीती प्राजक्तातून फुलली होती तशीच ताजी तशीच नि॑मळ प्राजक्तासम उरली होती
लेखनविषय:

वाचने 2852
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अहो .....गुलाब ठेवतात. माझ्या वाटेत पण ठेवला होता... पण काकाने उचलला :( चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

आणी फक्त २ :o काय ठेवताय्..चान्गली ओन्जळ्भर ठेवा ना . (कोब्रा) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

कधी जर प्रेम केलत तर कळेल की वाटेवर दोनच फुल का ठेवली ते

In reply to by पर्नल नेने मराठे

आणी फक्त २ :o काय ठेवताय्..चान्गली ओन्जळ्भर ठेवा ना . (कोब्रा) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

मंदी आहे चुचुबाई! जरा समजून घ्या.... :) (गोब्रा) पिडां

In reply to by पिवळा डांबिस

कागदी ठेवा ... पुन्हा कामास येतील ! :) (चोब्रा) अवलिया

चुचु ने कवितेला दिलेला प्रतिसाद आवडला. अगदी चिमणरावांच्या शब्दातूनच दिला आहे असा क्षणभर भास झाला. पुष्कराज, कविता भारी आहे, पण . . मनास हुरुहूर सले खुळी हे मला जरा ऑड वाटलं. कारण हूरहूर सलत नाही, लागते . . , ओढी सारखी.

त्यातली 'प्राजक्ताच्या फुलासम' असलेली नाजुक, हळुवार भाषाही आवडली.

गोड , लडिवाळ कविता.. आवडली !!

In reply to by चन्द्रशेखर गोखले

(सहमत)बेसनलाडू यावरून काही दिवसांपूर्वी मी लिहिलेली एक त्रिवेणी आठवली - जुन्या शर्टाच्या खिशात सापडली रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी (स्मरणशील)बेसनलाडू

वाटेवर मी तिच्या ठेवली न भरलेली दोन बिले ह्रदयातून मग लक्ष लागले पाकिट किती हलके झाले ? आनंदाने तिने उचलली रस्त्यावरची दोन बिले पेड़ शिक्का न दिसता मला शोधण्या नजर फिरे

खुप मस्त आहे कविता ------------------------------------- जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!