वाटेवर मी तिच्या ठेवली
प्राजक्ताची दोन फुले
ह्रदयातून मग लक्ष लागले
प्राजक्तातून प्रीत फुले ?
उगीच ठेवला प्राजक्त तिथे मी
मनात रुजलो आहे किती ?
मधल्या दिवसांमधील अंतर
जाणून घेण्या आहे किती ?
हळवी लागे ओढ अनामिक
मनास हुरुहूर सले खुळी
प्राजक्तातून प्रीत पाहतो
विसरली का मज प्रीतकळी ?
आनंदाने तिने उचलली
रस्त्यावरची दोन फुले
गंध घेउनी प्रेमभराने
मला शोधण्या नजर फिरे
फुले नव्हे ती आमुची प्रीती
प्राजक्तातून फुलली होती
तशीच ताजी तशीच नि॑मळ
प्राजक्तासम उरली होती
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2852
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो
आणी फक्त २
In reply to अहो by पर्नल नेने मराठे
कधी जर
In reply to आणी फक्त २ by पर्नल नेने मराठे
आणी फक्त २
In reply to अहो by पर्नल नेने मराठे
ओंजळ भर?
In reply to आणी फक्त २ by पर्नल नेने मराठे
छे छे
In reply to ओंजळ भर? by पिवळा डांबिस
काका शोधण्या नजर फिरे ... ?
कविता आवडली.
व्वा !
सहमत आहे
In reply to व्वा ! by चन्द्रशेखर गोखले
कविता
वाईट नका वाटुन घेऊ ...
कविता उत्तम ....
मस्त कविता